Diwali Padwa 2024 Information In Marathi : जाणून घ्या बलिप्रतिपदेची संपूर्ण माहिती…
Diwali Padwa 2024 : दिवाळीच्या दिवसांमध्ये बलिप्रतिपदा असते. यावर्षी 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा म्हणजेच यावर्षी 2 नोव्हेंबरला कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे.
Diwali Padwa 2024 जगभरात पती-पत्नीच्या नात्यातील अतूट प्रेमाच्या या सणाला फार महत्त्व आहे. या दिवशी पत्नीकडून पतीला ओवाळून त्याच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते. बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीची पंचरंगात रांगोळी काढून पूजा केली जाते. यावेळी इडा- पिडा- टळो आणि बळीचे राज्य येऊ असे अशी प्रार्थना केली जाते. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दिवाळी पाडव्याचे महत्त्व आज आपण जाणून घेऊ..
बलिप्रतिपदा पाडव्याचे महत्त्व
Diwali Padwa 2024 Information In Marathi
Diwali Padwa 2024 बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा हा तो सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो आणि अन्यायावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
Diwali Padwa 2024 कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा. या दिवसापासून विक्रम संवत्सराचा प्रारंभ होतो. या दिवशी गोवर्धन पूजा देखील केली जाते. या दिवशी अभ्यंग स्स्नान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. या दिवशी सोने खरेदी करतात. सुवासिनीकडून पतीचे औक्षवन करतात. दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी पती-पत्नीचे औक्षवन करते व पती-पत्नीला ओवाळणी स्वरूपात काही भेटवस्तू देतो.
नवविवाहित दांपत्यांसाठी पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी केली जाते. याला दिवाळसण असे म्हणतात. यानिमित्त जावयास सासरवाडी कडून निमंत्रण दिले जाते. आणि त्यांना आहेर केला जातो. त्या पूर्वी पत्नी आपल्या पतीला तेलाची मालिश करून उठणे लावून स्नान घालते आणि त्यानंतर पतीचे औक्षवन करते हा सण राजा बळीच्या कथेचे स्मरण करतो, अशा पद्धतीने अत्यंत धूमधडाक्यात आपण दिवाळी हा सण साजरा करतो. त्याचबरोबर बलिप्रतिपदा हा सण अत्यंत उत्साहाने साजरा करतो.