Dr. Manmohan Singh Passes Away : वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Dr. Manmohan Singh Passes Away : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी दुखद निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगभरात अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले मनमोहन सिंह होते.
Manmohan Singh Passes Away वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन झालं होतं म्हणून त्यांचे निधन झाले. 2004 ते 2014 पर्यंत भारताचे सलग 10 वर्ष पंतप्रधान राहिले.
Manmohan Singh Passes Away स्वातंत्र्यपूर्वी जन्मलेले हे पहिले पंतप्रधान होते. 26 सप्टेंबर 1932 साली पाकिस्तानच्या गाहमध्ये त्यांचा जन्म झाला. पंजाब, केंब्रिज आणि ऑक्सफर्ड यासारख्या नामांकित विद्यापीठात त्यांचे शिक्षण झालं.
Manmohan Singh Passes Away : 1957 ते 1965 या काळात ते पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून होते. मनमोहन सिंह 1969-71 या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर 1976 मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
Manmohan Singh विशेष म्हणजे 1982 ते 1085 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर 1985-87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. तसेच 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते. Manmohan Singh