Anathacha Nath Rickshaw Yojana : 90% कर्ज, 10% अनुदान; जाणून घ्या पात्रता
Drought Affected Farmers Rickshaw Scheme in marathi : राज्य सरकार राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना घेऊन आले आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार 2027 ते 2031 या काळात 1 लाख रिक्षांचे वाटप करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेसाठीची पात्रता काय आहे? अर्ज प्रक्रिया काय असेल याची माहिती..
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा देण्यासाठी रिक्षावाटप करण्यात येणार आहेत. दुष्काळग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी सरकारने पुढाकार घेतला असून पुढील पाच वर्षांमध्ये तब्बल 1 लाख प्रवासी रिक्षांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
या योजनेला ‘अनाथाचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना’ असे नाव देण्यात आलेले आहे. ही योजना 2027 ते 2031 या कालावधीत राबवली जाणार आहे. सध्या राज्यातील 310 पेक्षा अधिक तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना रिक्षाच्या एकूण किमतीपेक्षा दहा टक्के रक्कम कल्याणकारी मंडळाकडून अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. तर उर्वरित 90% रक्कम बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे कमी आर्थिक परिस्थिती असलेल्या शेतकरी कुटुंबांनाही रिक्षाचा व्यवसाय सुरू करता येणार आहे. त्यांच्यासाठी अनाथाचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना महत्त्वाची ठरणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून पहिल्या वर्षात 20000 पात्र शेतकऱ्यांना रिक्षा देण्याचे उद्दिष्ट सरकारकडून ठेवण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात सरासरी 60 लाभार्थ्यांची निवड रिक्षा वाटपासाठी करण्यात येणार आहे. तसेच पात्र अर्जदारांची संख्या कमी असल्यास उर्वरित रिक्षा त्याच जिल्ह्यातील इतर तालुक्यांना दिले जाणार आहेत.
आयुष्मान भारत योजनेचा मोठा टप्पा!
या योजनेची लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून अर्ज मागवली जाणार आहेत. तसेच अर्ज केल्यानंतर अर्जाची तपासणी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची निवड संगणकीय लॉटरी पद्धतीने केली जाईल. त्यानंतर बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यावर अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच 9 फेब्रुवारी 2027 रोजी निवड झालेल्या पात्र शेतकऱ्यांना रिक्षांच्या चाव्या देण्याची नियोजन असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेती सोबत उत्पन्नाचा दुसरा मार्ग मिळेल. रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबांना नियमित उत्पन्न मिळण्याची संधी निर्माण होऊन ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासही मदत होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
अर्ज कसा करायचा?
या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कल्याणकारी मंडळामार्फत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येणार आहेत.
पहिल्या वर्षात 20 हजार रिक्षांचे वाटप
या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षात 20 हजार पात्र शेतकरी लाभार्थ्यांना रिक्षा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानंतर पुढील चार वर्षांत उर्वरित रिक्षांचे वाटप करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक तालुक्यात सरासरी 60 लाभार्थ्यांना रिक्षा देण्याचा विचार आहे. निवड झालेल्या पात्र शेतकऱ्यांना 9 फेब्रुवारी 2027 रोजी रिक्षांच्या चाव्या देण्याचे नियोजन असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
ही शेतकऱ्यांची थट्टा
दुष्काळग्रस्त शेतकरी आधीच चिंतेत असताना सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा करण्यात येत आहे. रिक्षा वाटपाची योजना म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असण्याची टीका विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.
दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना FAQs
1. दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना काय आहे?
या योजनेअंतर्गत दुष्काळग्रस्त तालुक्यांतील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना स्वयंरोजगारासाठी प्रवासी रिक्षा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
2. या योजनेत किती रिक्षा मिळणार आहेत?
2027 ते 2031 या पाच वर्षांत एकूण 1 लाख प्रवासी रिक्षांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे.
3. रिक्षा खरेदीसाठी किती अनुदान मिळणार आहे?
रिक्षाच्या किमतीच्या 10 टक्के रक्कम अनुदान म्हणून आणि उर्वरित 90 टक्के रक्कम बँक कर्जाच्या स्वरूपात मिळणार आहे.
4. या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
शासनाने घोषित केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबातील पात्र सदस्यांना अर्ज करता येणार आहे. अंतिम अटी अधिकृत जाहिरातीनंतर स्पष्ट होतील.
5. रिक्षा योजनेचा अर्ज कुठे करायचा?
अद्याप अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. अधिकृत जाहिरात आणि अर्जाची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज करता येईल.
Read About : 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर!
PM Kisan Yojana च्या 24 व्या हप्त्यापूर्वी कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ संदेश
website : yojanamazi.com
अशाच विविध केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची सविस्तर व अधिकृत माहिती मिळवण्यासाठी योजना माझी (yojanamazi.com) या वेबसाइटला भेट द्या. सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी आमचे Facebook आणि Instagram पेज फॉलो करा.