E-Shram Card : नोंदणी कशी करायची? पात्रता, फायदे आणि संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
E-Shram Card Registration in marathi : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. ई-श्रम कार्डसाठी नोंदणी करताना आधार क्रमांक, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि बँक खात्याची माहिती आवश्यक असते. जाणून घ्या ई-श्रम योजनेची पात्रता, फायदे आणि ऑनलाइन नोंदणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया.
नवी दिल्ली : E-Shram Card काढण्यासाठी तुमच्याकडे तीन गोष्टी असणे आवश्यक आहेत. यामध्ये आधार क्रमांक आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि लाभार्थ्याचे वय 16 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया नोंदणीसाठीची संपूर्ण प्रक्रिया..
केंद्र सरकारने E-Shram Card योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. ई-श्रम नोंदणी करून असंघटित क्षेत्रातील कामगारांचा राष्ट्रीय डिजिटल डेटाबेस ठेवला जातो. या योजनेची सुरुवात ऑगस्ट 2021 मध्ये झाली.
यामध्ये असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना डिजिटल ओळख देण्यात आली. याव्यतिरिक्त कामगारांना सरकारी योजनेचा लाभ घेणेही सोपे झाले. केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेची आतापर्यंत 30 कोटीपेक्षा अधिक श्रमिक जोडले गेले आहेत. चला मग जाणून घेऊया या योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
ई-श्रम योजना म्हणजे काय?
देशभरातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू केलेली ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना विमा संरक्षण दिले जाते. त्याबरोबरच पेन्शन आणि आर्थिक योजनेची जोडण्याची संधीही या योजनेमुळे कामगारांना मिळते.
ई-श्रम कार्डाच्या नोंदणीची पात्रता
- कुठलाही व्यक्ती असंघटित क्षेत्रातील कर्मचारी ज्याचे वय 16 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे तो यासाठी अर्ज करू शकतो.
- असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये टॅक्सी चालक, घरगुती कामगार, प्रवासी मजूर, मजुरी करणारा कामगार इत्यादींचा सहभाग होतो.
- या योजनेचा लाभ इन्कम टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीला दिला जात नाही.
- इपीएफओ, इएसआयसीचा लाभ घेणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळत नाही.
ई-श्रम कार्डचा काय मिळतो लाभ?
योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते. जर एखादे काम करताना कामगाराचा अपघात झाला आणि त्यात त्याला अपंगत्व आले तर एक लाख रुपये मदत दिली जाते. या व्यतिरिक्त सामाजिक सुरक्षा योजनेची जोडण्याचा लाभही मिळतो. यामध्ये कौशल्य विकास ते पेन्शन आणि इमर्जन्सी आर्थिक योजनाशी जोडण्याची संधी या योजनेतून दिली जाते.
ई-श्रम कार्डसाठी असा करा अर्ज
E-Shram Card Registration in marathi : या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कुठलाही कर्मचारी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतो. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे तीन गोष्टी असणे आवश्यक आहेत. त्यामध्ये आधार नंबर, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि बँक खाते याची माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील श्रमिक ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतो किंवा तुम्ही जवळच्या तुमच्या सीएससी केंद्रावर जाऊनही यासाठी अर्ज करू शकता. नोंदणी करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता अटी नियम बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमचा अर्ज नाकारला जाऊ नये. श्रम व रोजगार मंत्रालयाद्वारे चालल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत 30 कोटीपेक्षा अधिक श्रमिक कामगार जोडल्या गेले आहेत.
थोडक्यात माहिती
- वयोमर्यादा: ई-श्रम नोंदणीसाठी सामान्यतः 16 ते 59 वर्षे वयोगटातील पात्र असंघटित कामगार अर्ज करू शकतात.
- आवश्यक माहिती: आधार क्रमांक, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि बँक खात्याची माहिती तयार ठेवा. मोबाईल नंबर लिंक नसल्यास CSC केंद्रावर बायोमेट्रिकद्वारे नोंदणीचा पर्याय उपलब्ध असू शकतो.
- लाभ: ई-श्रम कार्ड मिळाल्याने प्रत्येक लाभार्थ्याला आपोआप विमा, पेन्शन किंवा ठरावीक आर्थिक मदत मिळते असे नाही. लाभ संबंधित योजनेच्या पात्रतेवर आणि लागू नियमांवर अवलंबून असतात.
Read About : शेतकरी होणार मालामाल
website : yojanamazi.com