30 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2,000
PM Kisan 24th Installment 2026 in marathi : पीएम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा देशभरातील शेतकऱ्यांना लागली होती. मात्र आता एग्रीकल्चर इंडिया या ट्विटर अकाउंट वरून सरकारने 30 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 24 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती दिली आहे.
PM Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. योजनेच्या 24व्या हप्त्याबाबत 30 ऑक्टोबर 2026 ही तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, पैसे खात्यात जमा होण्यापूर्वी लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी आणि बँक खात्याची स्थिती तपासून घ्यावी.
30 ऑक्टोबरला मिळणार पीएम किसानचा 24वा हप्ता
पीएम किसान योजनेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर 23 ऑक्टोबर रोजी 24वा हप्ता 30 ऑक्टोबर 2026 रोजी जारी होणार असल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे या हप्त्याकडे लक्ष लागले आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला 6,000 आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2,000 च्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते.
पीएम-किसान योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबर २०२६ रोजी वितरित होणार असून, त्यामुळे आपल्या अन्नदात्यांना निरंतर आर्थिक सहाय्य मिळून ते अधिक सक्षम होतील. असे ट्विट केले आहे.
शेतकऱ्यांना मिळणार 2000
पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी वितरित करण्यात आला होता. या हप्त्यांतर्गत देशातील 9.44 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे 18,880 कोटींची मदत देण्यात आली होती. आता 24व्या हप्त्याच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना 2,000 मिळण्याची अपेक्षा आहे.
हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी आवश्यक
पीएम किसान योजनेचा लाभ सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील बाबी तपासाव्यात:
ई-केवायसी: आधार आधारित ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे.
बँक खाते: लाभार्थ्याचे बँक खाते सक्रिय असावे.
आधार लिंकिंग: बँक खात्याशी आधार लिंक आणि आवश्यक DBT सुविधा सुरू असल्याची खात्री करा.
जमिनीची पडताळणी: योजनेशी संबंधित जमीन अभिलेखांची पडताळणी पूर्ण असल्याची खात्री करा.
यापैकी कोणतीही प्रक्रिया अपूर्ण असल्यास हप्ता जमा होण्यास अडचण येऊ शकते.
पीएम किसानचा हप्ता स्टेटस कसा तपासायचा?
- सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- वेबसाइटवरील Know Your Status हा पर्याय निवडा.
- आवश्यक नोंदणी क्रमांक आणि मागितलेली माहिती भरा.
- स्क्रीनवर दिसणाऱ्या सूचनांनुसार तुमच्या हप्त्याची आणि ई-केवायसीची स्थिती तपासा.
- अधिकृत अपडेट कुठे पाहायचे?
- पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबतची अधिकृत माहिती आणि लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी pmkisan.gov.in या सरकारी वेबसाइटचा वापर करा.
Read About : PMFME Scheme In Marathi : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात संभाजीनगर देशात दुसरे
website : yojanamazi.com