आता असंघटित क्षेत्रातील कामगार आणि दुकानदार उघडू शकतील PF खाते
EPFO Scheme : ईपीएफ असंघटित क्षेत्रातील कामगार आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी नवीन युनिव्हर्सल पीएफ स्कीम आणण्याच्या तयारीत आहे. ही योजना आणल्यानंतर देशभरातील असंघटित क्षेत्रातील कामगार आणि दुकानदारांनाही आपले पीएफ खाते उघडता येणार आहे.
Universal PF Scheme देशभरातील कोट्यावधी असंघटित क्षेत्रातील कामगार आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटन epfo नवीन योजनेवर काम करत आहे. या अंतर्गत लोकांना प्रो-वेडिंग फंड पीएफशी जोडले जाऊ शकतील. जे यातून बाहेर आहेत. त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
EPFO चे मोठे पाऊल
ईपीएफओ सुरू करत असलेल्या नवीन युनिव्हर्सल पीएफ स्कीम या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक वर्गातील कामगाराना निवृत्तीनंतर सुरक्षित बचत पर्याय उपलब्ध करून देणे हा आहे. ते फ्रीलान्सर असोत, डिलिव्हरी एजंट असोत किंवा स्वतःचा व्यवसाय करत असोत अशा व्यक्तींना पीएफ खात्याशी जोडणे हा या योजनेचा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे.
EPFO चे मोठे पाऊल
या नवीन व्यवस्थेमुळे खातेधारकांना आपले उत्पन्नाचा एक हिस्सा पीएफ मध्ये जमा करण्याची सुविधा मिळणार आहे. ही योजना खूप सुटसुटीत असेल जेणेकरून सर्वांना याचा लाभ घेता येईल. लोक आपल्या सुविधेनुसार दररोज, मासिक किंवा वर्षाला योगदान देऊन पैसे जमा करू शकतात. ही योजना सध्याच्या ईपीएफओ मॉडेलवर आधारित असेल म्हणजेच जमा रकमेवर वर्षाला व्याज मिळेल आणि टॅक्स मधूनही सुट मिळेल.
मिळालेल्या माहितीनुसार वर्षाला अडीच लाख रुपये पर्यंत रक्कम तुम्ही यात जमा करू शकता आणि त्यावर मिळणाऱ्या व्याज आयकर मुक्त असेल. यामुळे ही योजना गुंतवणुकीसाठी आकर्षक बनेल.
पैसे काढणे हा अधिक सोपे
या योजनेचा सर्वात मोठा बदल म्हणजे विड्रॉल सिस्टीम मध्ये दिसणार आहे. ईपीएफ अशा मॉडेलवर काम करत आहे. यामध्ये निवृत्तीनंतर खातेधारक आपला पैसा फंडामध्ये जमा करून शकतील. याबरोबरच त्यांना सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन सारखा पर्याय दिला जाणार आहे. याद्वारे ते आपल्या आवश्यकतेनुसार एकत्र किंवा टप्प्याटप्प्याने रक्कम काढू शकतील.
आंतरराष्ट्रीय मॉडेल कडून प्रेरणा
ही योजना संपूर्ण सेल्फ फंड असेल म्हणजेच यामध्ये सरकारकडून कुठल्याही प्रकारचे आर्थिक योगदान राहणार नाही. त्यामुळे ही योजना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना पेक्षा वेगळी आहे. त्या योजनेत सरकार आपले योजना योगदान देते. इपीएफओ हे मॉडेल तयार करण्यासाठी सिंगापूर सारख्या देशाच्या सिस्टीमचा अभ्यास करत आहे जेणेकरून ही योजना प्रभावी आणि व्यवहारिक बनवली जाऊ शकेल.
या योजनेला सध्या अजून संपूर्णपणे मंजुरी मिळालेली नाही. मात्र ईपीएफओ यासाठी आयटी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या दिशेने काम करत आहे.