FASTag Annual Pass Price Hike : फास्टॅग पासच्या किमती 1 एप्रिल पासून वाढल्या

FASTag Annual Pass Price Hike In Marathi : आता किती पैसे मोजावे लागणार

FASTag Annual Pass Price Hike : राष्ट्रीय महामार्गावरून वारंवार प्रवास करत असलेल्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करण्यासाठी तुम्हाला टोल पास उपयोगी ठरतो. मात्र आता या पास ची किंमत वाढणार आहे. 1 एप्रिल पासून तुम्हाला वार्षिक फास्टॅग पास साठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे.

नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया ने याबाबतचा निर्णय घेतला आहे. या टोल किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता आज आपण यामध्ये किती रुपयांची वाढ झाली हे पाहू.

किती पैसे मोजावे लागणार?

FASTag Annual Pass Price Hike From 1st April 2026

भारतीय राष्ट्रीय महामार्गाच्या वार्षिक टोल पासची किंमत 3000 रुपये होती. आता ती वाढवून 3075 रुपये करण्यात आली आहे. हे दर वार्षिक आर्थिक वर्ष 2026-27 साठी आहेत. हा पास फक्त खाजगी वाहनांसाठी असतो.

हा पास एका वर्षासाठी आपण वापरू शकतो. त्यानंतर तो तुम्हाला रिन्यू करावा लागतो. 1 एप्रिल 2026 पासून या पासच्या नवीन किमती लागू होणार आहेत नवीन नियमानुसार हा वार्षिक पास आता 3075 रुपयांना असेल.

हा पास एक वर्षासाठी वापरता येईल. त्याबरोबर 200 वेळा टोल क्रॉसिंग असणार आहे. जर तुम्ही 200 वेळा टोल क्रॉस केला तर या पासची वैद्यता संपेल आणि जर असे केले नाही तर एक वर्षात ही मुदत संपून जाईल.

NHAI ने दिले अधिकाऱ्यांना निर्देश

FASTag Annual Pass Price Hike

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व टोल प्लाझा आणि अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. टोल वरून जाणाऱ्या प्रवाशांना ही माहिती देण्यास सांगितले आहे. 1 एप्रिल 2026 पासून हे नवीन नियम लागू होणार आहेत. पुढच्या एक वर्षासाठी या टोल पासची किंमत 3075 रुपये असेल.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार टोल संबंधित दरांचे दरवर्षी पुनरावलोकन होणार आहे. यामध्ये सुधारणा केली जाईल असे सांगितले आहे.