Free Silai Machine Yojana 2024 in marathi महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

Maharashtra Free Silai Machine Yojana 2024 :

केंद्र आणि राज्य सरकारने मिळून महाराष्ट्रातील महिलांसाठी महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र Free Silai Machine Yojana Maharashtra सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना सरकारकडून मुफ्त फ्री शिलाई मशीन योजना देण्यात येणार आहे. फ्री शिलाई मशीन योजना Free Silai Machine Yojana देशातील अनेक राज्यात सुरू करण्यात आलेली आहे आपण आज या लेखाच्या माध्यमातून फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 संबंधित माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सरकारकडून मोफत शिलाईचे वाटप केले जाते, या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आहे. यातून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल आणि त्या आपल्या पायावर उभ्या राहू शकतील. या योजनेचा लाभ राज्यभरातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्हीही महिलांना दिला जातो. केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून देशातील 50,000 पेक्षा अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन वाटण्याचा हेतू आहे.

Free Silai Machine Yojana 2024
https://www.india.gov.in/

PM free silai machine yojana महाराष्ट्र प्रमाणे देशातील इतर राज्यातही ही योजना लागू करण्यात आली आहे. यामध्ये गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, अधिराज यांचा समावेश आहे. सरकार ही योजना या राज्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण देशात लागू करणार आहे. गरीब महिलांना महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना 2024 द्वारे रोजगार मिळेल आणि ही योजना विशेष करून गरीब महिलांसाठी आहे. या योजनेसाठी पात्रता पूर्ण केल्यानंतर ऑनलाईन अर्ज करता येतो.

ठळक मुद्दे :-

  • फ्री शिलाई मशीनची थोडक्यात माहिती
  • फ्री शिलाई मशीन योजनाचे उद्दिष्ट
  • फ्री शिलाई मशीन योजनेची वैशिष्ट्ये
  • फ्री शिलाई मशीन योजनेचा कोणाला मिळतो लाभ
  • फ्री शिलाई मशीन योजनेचे फायदे
  • फ्री शिलाई मशीन योजनेसाठी काय आहे पात्रता
  • या योजनेचे नियम व अटी
  • फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र साठी आवश्यक कागदपत्रे
  • या राज्यांना मिळतो फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ
  • पात्रता पूर्ण न केल्यास अर्ज होतो रद्द
  • फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र नोंदणीची पद्धत
  • महाराष्ट्राची फ्री मशीन योजना हेल्पलाइन नंबर
  • FAQ’S

फ्री शिलाई मशीनची थोडक्यात माहिती

योजनेचे नावमोफत शिलाई मशीन योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार  
कधीपासून सुरू झाली2019
योजनेचे लाभार्थीगरीब महिला
अर्ज कसा करावाऑनलाइन अर्ज उपलब्ध आहे
योजनेचा उद्देशगरीब महिलांना आत्मनिर्भर बनवणे
लाभमोफत शिलाई मशीन देणे
अधिकृत वेबसाइटhttps://www.india.gov.in/

राज्यातील अनेक कुटुंब गरिबी रेषेखालील असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या योजनेतून महिलांना सक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. महिलावर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असते. रोजगारासाठी शहरात किंवा अन्य ठिकाणी जाऊन नोकरी करणे त्यांना कठीण असते, त्यामुळे महिलांना घरातच काम करून छोटासा व्यवसाय करून पैसे मिळवायचे असतात, या महिलांसाठी शिवणकाम हा एक चांगला पर्याय समजला जातो. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी पैशाची अडचण असते. ही अडचण लक्षात घेऊन सरकारने या महिलांना मोफत शिलाई मशीन देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

https://yojanamazi.com/pm-suraksha-bima-yojana-2024/

फ्री शिलाई मशीन योजनाचे उद्दिष्ट

  • देशभरातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या महिलांना फ्री शिलाई मशीन वाटप करून त्यांना या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
  • महिलांना आत्मनिर्भवण बनवण्यासाठी सरकारच्या वतीने ही योजना राबवली जात आहे. यातून महिला आपल्या पायावर उभा राहून कुटुंबाची सक्षम पणे जबाबदारी पेलु शकतील.
  • गरीब महिलांचे जीवनमान सुधारणे.
  • या योजनेच्या माध्यमातून रोजगार देऊन महिलांचे उत्पन्न वाढवणे महिलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.
  • आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तिला आत्मनिर्भर करणे.
  • शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी तिला खाजगी किंवा बँकेतून कर्ज घेण्याची आवश्यकता पडू नये यासाठी ही योजना काम करत आहे.
  • महिलांचा आर्थिक विकास करणे.
Free Silai Machine Yojana 2024

फ्री शिलाई मशीन योजनेची वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून फ्री शिलाई मशीन योजना Free Silai Machine Yojana सुरू करण्यात आलेली आहे.
  • राज्यातील महिलांना घरबसल्या रोजगार मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेचा देशभरातील तब्बल 50 हजारापेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.
  • देशभरातील शहरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येतो.
  • राज्यातील महिलांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येते.
  • फ्री शिलाई मशीन मिळवण्याचा अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना कुठल्याही समस्येला तोंड देण्याची आवश्यकता नाही. त्या योजनेचा सहज पद्धतीने लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेतून महिलांना आत्मनिर्भरून त्यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभे करणे हा या योजनेचा आणि सरकारचा हेतू आहे.
  • यातून महिला आणि तिच्या कुटुंबाचे आर्थिक स्थर सुधारण्यास मदत होईल.

फ्री शिलाई मशीन योजनेचा कोणाला मिळतो लाभ

महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी त्यांना सरकारने घालून दिलेल्या अटी आणि शर्ती पूर्ण कराव्या लागतात.

महिलांना या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीनचे Free Silai Machine वाटप करण्यात येते.

फ्री शिलाई मशीन योजनेचे फायदे

  • देशभरातील प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन देण्यात येत असल्यामुळे या महिलांना कुठल्याही प्रकारचे कर्ज घेण्याची आवश्यकता भासत नाही आणि त्या सहज आपला व्यवसाय सुरू करू शकतात.
  • शिवणकामाच्या माध्यमातून महिलाना रोजगार मिळतो.
  • यातून महिला आत्मनिर्भर बनवून कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी खंबीरपणे पेलु शकतात.
  • महिलेचा आर्थिक विकास होण्यासही हातभार लागतो.
  • देशाच्या आत्मनिर्भर भारत या योजनेला फ्री शिलाई मशीन योजनेतून वाटचालीला चालना मिळते.
  • शिवणकाम करून महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यास या योजनेचा मोठा हातभार लागतो.
  • महिला सशक्तिकरणाला यातून बळ मिळते.
  • महिलांच्या कला कौशल्यात यातून भर पडते तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
  • महिलांचा आत्मविश्वास वाढवून त्या स्वावलंबी बनतात.

लखपती दीदी योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

https://yojanamazi.com/lakhapati-didi-yojana-2024-in-marathi/#more-258

फ्री शिलाई मशीन योजनेसाठी काय आहे पात्रता

  • महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा फायदा केवळ महिलाच घेऊ शकतील.
  • महाराष्ट्रातील 20 ते 40 वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असतील.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजारापेक्षा कमी असावे.

या योजनेचे नियम व अटी

  • महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना फ्री शिलाई मशीन योजनेचा Free Silai Machine Yojana लाभ दिला जातो.
  • राज्य बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 20 ते 40 वर्ष दरम्यान असावे.
  • 40 वर्षावरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • ज्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारापेक्षा अधिक आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेसाठी अर्ज करताना महिलेकडे शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
  • विधवा, अपंग असलेल्या महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.
  • जर एखाद्या महिलेने केंद्र सरकारच्या योजनेतून फ्री शिलाई मशीन मिळवली असेल तर तिला राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत असल्यासही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • महिला विधवा असल्यास या योजनेचा अर्ज करताना त्या महिलेने पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • महिला जर अपंग असेल तर तिला आपल्या अर्जासोबत अपंग असल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागते.
  • या योजनेसाठी केवळ महिलाच पात्र असतील पुरुषांना यासाठी अर्ज करता येणार नाही.

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र साठी आवश्यक कागदपत्रे Document of free silai machine yojana

  • अर्जदार महिलेकडे आधार कार्ड असावे.
  • उत्पन्नाचा दाखला काढलेला असावा. (वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजारापर्यंत असावे.)
  • जन्म दाखला( शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे)
  • महिलेचा पासपोर्ट फोटो
  • मोबाईल क्रमांक
  • महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र
  • महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र असावे
  • रेशन कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र

या राज्यांना मिळतो फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ

महाराष्ट्र

हरियाणा

गुजरात

उत्तर प्रदेश

मध्य प्रदेश

कर्नाटक

राजस्थान

बिहार

छत्तीसगड आदी…

पात्रता पूर्ण न केल्यास अर्ज होतो रद्द

अर्जदार महिलेने अर्ज संपूर्ण भरला नसल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

अर्जात चुकीची माहिती भरल्यासही अर्ज रद्द होतो.

महिला महाराष्ट्रातील रहिवासी नसल्यासही अर्ज रद्द केला जातो.

महिला आर्थिक दृष्ट्या गरीब नसल्यास आणि तिच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती सरकारी नोकरीचा लाभ घेत असल्यास अशा महिलेचाही अर्ज सरकारकडून रद्द करण्यात येतो.

अर्जदार महिलेने केंद्र सरकारच्या यापूर्वीच्या कुठल्या योजना अंतर्गत फ्री शिलाई मशीन मिळवली असेल तर अशा महिलेचाही अर्ज राज्य सrकारकडून रद्द करण्यात येतो.

अलीकडे शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र नसल्यासही अर्ज रद्द केला जातो.

Free Silai Machine Yojana 2024

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र नोंदणीची पद्धत

फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या नगरपालिका किंवा जिल्हा महिला व बालविकास विभागात जाऊन अर्ज करता येतो, अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत.

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र फॉर्म https://www.india.gov.in/   या ऑनलाइन वेबसाईटवरही तुम्हाला अर्ज मिळेल तो डाउनलोड करून त्यात विचारलेली सर्व माहिती योग्य पद्धतीने भरून सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून सदर अर्ज जमा करावा.

या योजनेच्या संबंधित अधिकाऱ्याकडून तुमच्या अर्जाची तपासणी होईल. त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीनचे मोफत वाटप होईल.

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र https://www.india.gov.in/ ही शासनाची अधिकृत वेबसाईट आहे.

महाराष्ट्राची फ्री मशीन योजना हेल्पलाइन नंबर

टेक्निकल टीम नॅशनल इन्फॉर्मेशन ए फॉर बी फॉर तिसरा मजला ए ब्लॉक सी जिओ कॉम्प्लेक्स लोधी रोड नवी दिल्ली 110003

FAQ’S

या योजनेअंतर्गत विचारली जाणारी प्रश्न

  • फ्री शिलाई मशीन योजना म्हणजे काय ?
  • देशातील अर्थी दृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना सरकार कडून फ्री शिलाई मशीन उपलब्ध होणार आहे. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जेणेकरूण त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आणि त्या घरबसल्या शिवणकाम करून उत्पन्न वाढवू शकतील.
  • फ्री शिलाई मशीन योजनेचा अर्ज कसा करावा ?
  • फ्री शिलाई मशीन योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन फॉर्म डाउनलोड करून घ्या. किंवा तुमच्या जवळच्या नगरपालिकेत जाऊन या योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करा.
  • फ्री शिलाई मशीन योजनेसाठी कोण आहे पात्र ?
  • या योजनेसाठी गरीब महिला आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलाच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय आहे वयोमर्यादा ?
  • फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 20 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान असावे.
  • कोणकोणत्या राज्यांना मिळतो फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ?
  • महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, बिहार, छत्तीसगड या राज्यांना मिळतो या योजनेचा लाभ.