Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2024 In Marathi : गाळयुक्त शिवारमुळे वाढणार शेतीचे उत्पन्न

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2024 Information In Marathi : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना 2024 मराठी माहिती

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2024 : महाराष्ट्रातील धरणामध्ये साठत चाललेल्या गाळामुळे पाणी साठवण्याची क्षमता कमी होत आहे. धरणामध्ये साचलेल्या गाळ्याचा उपसा करून शेतात पसरल्यास धरणाची साठवणूक क्षमता वाढवण्याबरोबरच कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने 2017 ला गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2024 : या योजनेसाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे राज्यातील बुलढाणा आणि यवतमाळ येथे प्रशासकीय व लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या योजनेची यशस्वीता पाहता ही योजना राज्यभर कशी राबवता येईल यावर सरकारने भर दिलेला दिसतो. ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत चालवली जाते. या योजनेचा लाभ अल्पभूधारक, दिव्यांग, विधवा व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुदान देण्यात येते. असरकारी संस्थांना गाळ धरणातून काढण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री व इंधनासाठी 31 रुपये प्रति घनमीटर आणि पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी 35.75 रुपये प्रति घनमीटर प्रमाणे एकरी 15000 रुपये च्या मर्यादित व अडीच एकराला 37 हजार 500 रुपये अनुदान देण्यात येते.

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना धरणातील गाळ नेण्यासाठी व शेतात पसरविण्यासाठी सरकारच्या वतीने अनुदान देण्यात येत आहे तर अन्य शेतकरी हा गाळ शेतात मोफत घेऊन जाऊ शकतात.

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत मागील वर्षी राज्यातील जलसाठ्यामध्ये जवळपास 51.80 कोटी घनमीटर गाळा असल्याचे स्पष्ट झाले होते. डिसेंबर 2023 च्या अखेर विविध प्रकारच्या 7504 जलाशयातून 7.17 कोटी घनमीटर गाळ उपवासण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होत आहे याबरोबरच अनेक गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायमस्वरूपी सुटताना दिसत आहे.

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra योजनेमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे, पिकाचा मोबदला म्हणून रक्कम अदा करणे यामध्ये देखील कपात होऊ शकते. या योजनेच्या माध्यमातून जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धतेमुळे दूध उत्पादनात मोठी प्रमाणात वाढ होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढू शकते. धरणातील गाळ शेतात टाकल्यामुळे शेतीसाठी वापरणारी खतांच्या खर्चात सुमारे 50% पर्यंत घट होण्याचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेले कर्जही शेतकरी वेळेवर परतफेड करेल असा सरकारचा दावा केला आहे.

बदलत्या हवामानामुळे सध्या पावसाच्या सरासरी मध्ये घट होऊन कमी पाऊस पडताना दिसत आहे तसेच अवेळी होणाऱ्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतीला आवश्यक वेळी सिंचनाद्वारे पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते पण वारंवार पावसात पडणाऱ्या खंडामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे या योजनेचा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील अवर्षण प्रवन जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकतो धरणात जलस्त्रोतांमध्ये गाळ साठवण्याची प्रक्रिया ही सतत चालू असते त्यामुळे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राज्यभर राबवण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे वारंवार धरणातील गाळ काढून शेतीत टाकल्याने एका बाजूला शेतीचा विकास होईल आणि दुसऱ्या बाजूला धरणांची पाणी साठवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना म्हणजे काय?

What Is Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra

बदलत्या हवामानामुळे निसर्गाच्या चक्रामध्ये सतत बदल होत आहे. त्यामुळे देशभरात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. मात्र पावसाचे पाणी साठवण्यासाठी निर्माण केलेल्या धरण जलसाठ्यांमधील गाळ काढण्यासाठी सरकारची ही योजना प्रभावी म्हणावी लागेल, कारण जलसाठ्यामधील गाळ काढायचा आणि दुसऱ्या बाजूला तोच गाळ शेतात पसरवायचा यामुळे पाण्याची क्षमता आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे.

त्यामुळे ही योजना आहे त्या स्वरूपात राज्यभरात पुन्हा राबविण्यासाठी 16 जानेवारी 2023 रोजी मृद व जलसंधारण विभागाच्या जलसाठ्यातील गाळ काढणे आणि तो गाळ शेतात पसरविणे ही गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना पुढील तीन वर्षांसाठी राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे.

यंदा 1 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच 106% पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हा अंदाज जर खरा ठरला तर सरकारची गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना यशस्वी होईल आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.

आजही राज्यातील अनेक गावांमध्ये पाण्याच्या भीषण समस्याचा सामना नागरिक करत आहेत. त्यामुळे राज्यातील 5 हजाराहून अधिक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली आहे. राज्यभरातील 2,994 धरणामध्ये केवळ 33% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाडा विभागात सर्वाधिक म्हणजे 868 गावे टंचाईग्रस्त आहेत. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र टँकर ग्रस्त गावांचे प्रमाण अधिक आहे. मराठवाड्यातील धरणामध्ये 16 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. या भागातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. देशात या वर्षी 106% पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे यावर्षी या धरणामध्ये पाणीसाठा साठवून शेतकऱ्यांचा लाभ होईल.

ठळक मुद्दे :

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना 2024 मराठी माहिती

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2024 Information In Marathi

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना म्हणजे काय?

What Is Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची थोडक्यात माहिती

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana In Short

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची वैशिष्ट्ये

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2024 Features

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या अनुदानाचे स्वरूप

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra

यादी तयार करण्याची निवड प्रक्रिया

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2024

शेतकऱ्यांना अनुदानाची मर्यादा

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी संदर्भातील मार्गदर्शक व कार्यपद्धती

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2024 Online Apply

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची थोडक्यात माहिती

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana In Short

योजनेचे नावगाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
कधी सुरू केली2017
लाभार्थीशेतकरी आणि अशासकीय संस्था
अर्ज प्रक्रियाऑनलाइन / ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://wcdmh.mahaonline.gov.in/
Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची वैशिष्ट्ये

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2024 Features

  • या योजनेसाठी स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये ते स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयार असणे ही प्राथमिक अत्यावश्यक स्वरूपाची अट आहे.
  • धरणातील गाळ उपसण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व इंधनावरील खर्च सरकारकडून करण्यात येईल आणि सीएसआर च्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधी मधून हा खर्च करण्यात येणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामाचे जिओ टॅपिंग पद्धतीने मोजमाप करण्यात येणार आहे.
  • या योजनेची संगणक प्रणाली वर माहिती संकलित करण्यात येणार आहे.
  • या योजनेसाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
  • गाळमुक्त धरण व गावयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाचे त्रिस्तरीय यंत्रणेमार्फत मूल्यमापन करण्यात येणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून 250 हेक्टर पेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या आणि 5 वर्षापेक्षा जुन्या तलावांना प्राधान्य दिले जाणार आहे.
  • गाळमुक्त धरण व गावयुक्त शिवार योजनेची संपूर्ण जबाबदारी उपविभागीय अधिकारी महसूल विभाग यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.
  • गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसाठी Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2024 ऑफलाइन पद्धतीने तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला जाऊ शकतो. याबरोबरच ऑनलाइन पद्धतीने हे राज्य सरकारच्या आपले सरकार या पोर्टलवरही या योजनेसाठी अर्ज करता येतो.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या अनुदानाचे स्वरूप

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत विधवा, अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकरी, सीमांत अल्पभूधारक 1 हेक्टर पर्यंत व लहान 1 ते 2 हेक्टर शेतकऱ्यांना एकरी 15000 रुपये याप्रमाणे 2.5 एकर क्षेत्रासाठी 37 हजार 500 रुपयांचे अनुदान सरकारच्या माध्यमातून दिले जाते.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

अंत्योदय अन्न योजना

स्वामित्व योजना

कन्यादान योजना

बांधकाम कामगार योजना

महात्मा फुले जन आरोग्य योजना

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना

पीएम श्री योजना

यादी तयार करण्याची निवड प्रक्रिया

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2024

धरणातील गाळ घेऊन गेलेले सीमांत अल्प भूधारक (1 हेक्टर पर्यंत) व लहान (एक ते दोन हेक्टर पर्यंत) जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी करण्यात येईल.

राज्यभरातील विधवा, अपंग व अपंगग्रस्त शेतकरी अनुदानास पात्र असतील. सदर नागरिक बहुभूधारक असले तरीही अनुदानास पात्र ठरतील.

शेतकऱ्यांना अनुदानाची मर्यादा

शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी गाळाच्या 35.75 प्रति घनमीटर प्रमाणे एकरी 15,000 रुपयांच्या मर्यादेत म्हणजेच एकरामध्ये 4 घनमीटर गाळाच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान केवळ 2.5 एकर पर्यंतच म्हणजे 37 हजार 500 अधिक रकमेपर्यंत राहील. तसेच विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनाही ही मर्यादाची अट कायम असेल.

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी संदर्भातील मार्गदर्शक व कार्यपद्धती

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2024 Online Apply

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत गावात काम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन अशासकीय संस्थांनी जिल्हास्तरीय समितीस प्रस्ताव पाठवावा. या प्रस्तावामध्ये संबंधित जलसाठ्यामध्ये अंदाजे किती गाळ आहे याची माहिती असणे आवश्यक आहे.

जिल्हास्तरीय समितीने सदर प्रस्तावावर विचार करून संबंधित संस्थेत कार्यकारी यंत्रणा व नमूद केलेल्या गळ्याचे प्रमाण उपसण्यास प्रशासकीय मान्यता द्यावी.

या योजनेला मान्यता देण्यासाठी जिल्हास्तरीय समिती बैठकी अभावी मान्यता देण्याचा कालावधी लागण्याची शक्यता असल्यास अध्यक्ष व सचिवांच्या मान्यतेने संबंधित संस्थेस कार्यकारी यंत्रणा म्हणून प्रशासकीय मान्यता द्यावी. त्यानंतर समितीच्या अवलोकनार्थ हा प्रस्ताव ठेवावा.

एका धरणातून गाळ काढण्यासाठी एकापेक्षा अधिक अशासकीय संस्थेचे अर्ज आले असल्यास संबंधित संस्थांची क्षमता तपासून घ्यावी. त्यातून जिल्हा समितीने एका अशासकीय संस्थेची निवड करावी आणि त्यांना गाळ काढण्याची प्रशासकीय मान्यता द्यावी. ज्या संस्थेला ही जबाबदारी देण्यात आली आहे त्यांनी जलसाठ्यातून गाळ काढण्या वेळी जलसाठ्याची माहिती ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे आणि देण्यात येणारी माहिती बरोबर असल्याचे संबंधित संस्थेतील कार्यरत इतर व्यक्तीकडून प्रमाणित करण्यात येईल. प्रशासकीय संस्थेमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना अवनी ॲप चे प्रशिक्षण ATE chandra foundation यांच्यामार्फत देण्यात येईल.

प्राप्त झालेल्या प्रस्तावावर संबंधित शासकीय यंत्रणेमार्फत जलसाठ्यातील गाळ उपसा परिणाम बाबींचा विचार करून उपअभियंता द्वारे अंदाजपत्रक तयार केले जाईल आणि त्यासंबंधीची माहिती संबंधित संस्थेला देण्यात येईल कार्यकारी अभियंता स्तरावर उपअभियंता मार्फत प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाची तपासणी करून संबंधितांना तांत्रिक मान्यता देईल.

कार्यकारी अभियंत्याने मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्ष गाळ उपसा करता येईल.

ज्या धरणातील गाळ काढायचा आहे, ते गाळ काढण्याचे काम सुरू करण्यापूर्वी जलसाठ्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते जिओ टॅगिंग करण्यात येतील.

या योजनेच्या माध्यमातून पहिले आओ पहिले पाव या तत्त्वाप्रमाणे गळाची वाटणी शेतकऱ्यांमध्ये करण्यात येईल मात्र विधवा, अपंग, आत्महत्याग्रस्त, अत्यल्प आणि अल्पभूधारक हा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

पात्र शेतकऱ्यांची यादी अवनी ॲपवर मिळेल यासाठी सातबारा उतारा, शेतकरी, विधवा, अपंग, आत्महत्याग्रस्त, अत्यल्प आणि अल्पभूधारक या यात मोडतात. याबाबतीत पंचनामा सादर करावा लागेल. सदर पंचनाम्यात ग्रामसेवक, जिल्हा परिषद शिक्षक, तलाठी यापैकी कोणत्याही एका कर्मचाऱ्याचा समावेश असणे आवश्यक आहे.

संबंधित सातबारा आणि पंचनामा अवनी अँप वर अपलोड केला जाईल आणि ते बंद असल्यास किंवा काही अडचण असल्यास अशासकीय संस्थेने सर्व बाबींची तपासणी करावी.

प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी दिलेली गाळाची माहिती काढून ती उत्खनन केलेल्या गाळाच्या प्रमाणाशी दर दिवशी ताळेबंद करावी.

धरणातून नेण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात टाकणे बंधनकारक आहे. अशा गळ्याची विक्री किंवा त्याचा वापर इतर कोणत्याही कारणासाठी केल्यास कारवाई होऊ शकते.

गाळ काढण्याचे कार्य पूर्ण झाल्यानंतर अंतिम अहवालावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा घेण्यात यावी ग्रामसभेचे मान्यता घ्यावी.

उपाभियंता यांनी पास फोर पेमेंट शेतकऱ्याचे नाव, गाळाचे प्रमाण, अनुदान नमूद करून कार्यकारी अभियंता यांच्याकडे देयक आदर करण्यासाठी सादर करावा.

त्यानंतर कार्यकारी अभियंता यांनी रक्कम मान्यता प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. मान्यतेनंतर संबंधित रक्कम अशासकीय संस्थांना अदा करावी अदा करताना यंत्रसामग्रीचे देयक अशासकीय संस्थेस द्यावे. शेतकऱ्यांना देण्यात येणारे सवलतीचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करावे किंवा ग्रामपंचायतच्या अकाउंट नंबर वर हे अनुदान जमा करावे आणि संबंधित ग्रामपंचायतीने एका आठवड्याच्या आत शेतकऱ्यांना ही रक्कम द्यावी.

अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असल्यास सरकारच्या मागील त्याला ठिबक योजनेची त्यांना पुरेशी माहिती देऊन. त्यांच्याकडून घोषणा स्वरूपात वचनबद्धता लेखी घेण्यात येईल की पुढील हंगामापूर्वी ठिबक लावून घेऊन ते सिंचन करणार आहेत अशी ती हमी असेल.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: गाळमुक्त धरण गायुक्त शिवार योजना म्हणजे काय?

उत्तर: या योजनेच्या माध्यमातून लोक सहभागातून शेतकरी बांधवांना तलावातील गाळ त्यांच्या शेतात पसरण्यासाठी अनुदान देण्यात येते. त्यामुळे धरणातील गाळ काढला जाऊन धरणाची पाणी साठवण्याची क्षमता वाढते आणि दुसरीकडे शेतात धरणातील गाळ टाकल्यामुळे शेतीची सुपीकता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यात मोठी मदत होते.

प्रश्न: गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

उत्तर: या योजनेसाठी शेतकरी आणि अशासकीय संस्था अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

प्रश्न: गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेसाठी अर्ज कुठे करावा?

उत्तर: या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो सरकारच्या आपले सरकार या पोर्टल वर जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA