Antyodaya Anna Yojana 2024 Information In Marathi : अंत्योदय अन्न योजना 2024 मराठी माहिती
Antyodaya Anna Yojana (AAY) : केंद्र सरकार राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी विविध कल्याणकारी योजना सुरू करत असते. आजच्या लेखाच्या माध्यमातून अशाच एका योजनेची आपण माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अंत्योदय अन्न योजना. देशातील गरीब कुटुंबांना अत्यंत कमी दरात रेशन उपलब्ध करून देणे हा अंत्योदय अन्न योजनेचा उद्देश आहे. ही योजना दिनांक 25 डिसेंबर २००२ रोजी सुरू करण्यात आली. ही योजना केंद्र सरकार मार्फत संपूर्ण देशभरात राबवण्यात येते. आमच्या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना दरमहा रेशन मिळते. त्यामध्ये गहू व तांदूळ मिळतात दरमहा गरीब कुटुंबाला सरकारमार्फत ३५ किलो धान्य मिळते. त्यामध्ये गहू 2 रुपये प्रति किलो तर तांदूळ 3 रुपये प्रति किलो या दराने रेशन नागरिकांना मिळते.
Antyodaya Anna Yojana आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण अंत्योदय अन्न योजना म्हणजे काय?, अंत्योदय अन्न योजनेचा कोणाला मिळतो लाभ?, अंत्योदय अन्न योजनेसाठी कोण आहे पात्र? अंत्योदय अन्न योजनेसाठी लागणारी काय आहेत आवश्यक कागदपत्रे, अंत्योदय अन्न योजनेचा कसा करावा अर्ज? या संपूर्ण प्रश्नांची माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी आजचा हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.
अंत्योदय अन्न योजना म्हणजे काय
What Is Antyodaya Anna Yojana
Antyodaya Anna Yojana अंत्योदय अन्न योजना रेशन कार्ड ही देशातील सर्व गरीब कुटुंबाला तसेच असुरक्षित कुटुंबांना मदत करण्यासाठी भारत सरकारने योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत भारतातील गरीब दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना 35 किलो धान्य शासनामार्फत मिळते. यामध्ये गहू 2 रुपये प्रति किलो तर तांदूळ 3 रुपये प्रति किलो या दराने महिन्याला 35 किलो धान्य गरीब कुटुंबांना या योजना अंतर्गत उपलब्ध करून दिले जाते. AAY अंत्योदय अन्न योजनेचे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक राज्याच्या लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच TPDS मध्ये सूचीबद्ध केल्याप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबांना आधार देणे हा आहे. या योजनेअंतर्गत कुटुंबाला स्वस्त दरात तांदूळ आणि गहू दिले जाते. अंत्योदय अन्न योजना रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे कार्ड आहे या कार्डमुळे नागरिकांना केवळ अन्नच नाही तर देशातील समाजाला चांगली मदत देखील मिळते.
Antyodaya Anna Yojana Scheme अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत जे कार्ड मिळते त्या कार्डचा रंग हा नेहमीच्या रेशन कार्डच्या रंगापेक्षा वेगळा असतो. यामुळे ते कार्ड अंत्योदय अन्न योजनेचे आहे हे सहजपणे ओळखता येते. भारतातील गरिबी दूर करण्यासाठी अंत्योदय अन्न योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा मुख्यत्वे करून विधवा, विवादित कुटुंबे, अपंग व्यक्ती या अशा नागरिकांना अधिक प्राधान्य दिले जाते अशा नागरिकांना समोर ठेवून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे समाजाला सक्षम बनवून गरिबी दूर करणे हा आहे.
ठळक मुद्दे :
अंत्योदय अन्न योजना मराठी माहिती
Antyodaya Anna Yojana 2024 Information
अंत्योदय अन्न योजना म्हणजे काय
What Is Antyodaya Anna Yojana
अंत्योदय अन्न योजनेविषयीची थोडक्यात माहिती
Antyodaya Anna Yojana In Short
अंत्योदय अन्न योजनेची उद्दिष्टे
Antyodaya Anna Yojana Purpose
अंत्योदय अन्न योजनेचे फायदे
Antyodaya Anna Yojana Benefits
अंत्योदय अन्न योजनेची वैशिष्ट्ये
Antyodaya Anna Yojana Features
अंत्योदय अन्न योजणेसाठीची पात्रता
Antyodaya Anna Yojana Eligibility
अंत्योदय अन्न योजना रेशन कार्ड साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
Antyodaya Anna Yojana Documents
अंत्योदय अन्न योजनेची अर्ज प्रक्रिया
Antyodaya Anna Yojana Apply
अंत्योदय अन्न योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
Antyodaya Anna Yojana Online Apply
अंत्योदय अन्न योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
Antyodaya Anna Yojana Application
असा असतो अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकेचा रंग
Antyodaya Anna Yojana Scheme
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
अंत्योदय अन्न योजनेविषयीची थोडक्यात माहिती
Antyodaya Anna Yojana In Short
योजनेचे नाव | अंत्योदय अन्न योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
कधी सुरू केली | 25 डिसेंबर 2002 |
लाभार्थी | देशातील नागरिक |
लाभ | दरमहा 35 किलो धान्य |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://dfpd.gov.in |
अंत्योदय अन्न योजनेची उद्दिष्टे
Antyodaya Anna Yojana Purpose
- अंत्योदय अन्न योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील गरिबी दूर करणे.
- लक्ष्य सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच TPDS ची लोकप्रियता वाढवणे.
- भारतातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना अत्यंत कमी दरात अन्नधान्य उपलब्ध करून देणे.
- मुख्य खाद्यपदार्थांसाठी अनुदानित किंमत धोरणांची अंमलबजावणी करणे.
अंत्योदय अन्न योजनेचे फायदे
Antyodaya Anna Yojana Benefits
- अंत्योदय अन्न योजने AAY अंतर्गत लाभार्थ्यांना स्वस्त दरात खाद्यपदार्थ पुरवले जाते.
- या योजनेचा लाभ देशातील सर्व गरीब कुटुंबांना दिला जाणार आहे.
- अंत्योदयांना योजनेअंतर्गत AAY लाभार्थ्यांना दरमहा 35 किलो रोशन मिळणार आहे.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गहू 2 रुपये प्रति किलो तर तांदूळ 3 रुपये प्रति किलो या दराने धन्य मिळते.
- अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत 2.5 कोटी गरीब कुटुंबांचा समावेश आहे.
- अंत्योदय अन्न योजनेचा AAY लाभ हा ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब कुटुंबांना मिळेल.
- अंत्योदय अन्न योजनेमध्ये राज्यातील TPDS अंतर्गत समाविष्ट असलेल्या BPL कुटुंबाच्या संख्येनुसार एक कोटी गरीब कुटुंब समाविष्ट आहे.
- अंत्योदय अन्न योजना Antyodaya Anna Yojana Scheme रेशन कार्ड अंतर्गत लाभार्थी कुटुंबाला एका वेगळ्या रंगाचे शिधापत्रिका कार्ड मिळते.
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
अंत्योदय अन्न योजनेची वैशिष्ट्ये
Antyodaya Anna Yojana Features
- या योजनेअंतर्गत शिधापत्रिका धारकांना अत्यंत कमी दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते.
- या योजनेअंतर्गत विधवा, बेघर व्यक्ती, अपंग व्यक्ती, निराधार कुटुंबे तसेच गरीब कुटुंबे यांना प्राधान्य दिले जाते.
- Antyodaya Anna Yojana Scheme योजनेअंतर्गत कुटुंबांच्या रचनेवर आधारित त्यांना दर महिन्याला एका विशिष्ट प्रमाणात धन्य मिळते.
- अंत्योदयांना योजनेच्या रेशन कार्डचा रंग हा इतर रेशन कार्ड पेक्षा वेगळा असल्यामुळे ते त्वरित लक्षात येते यामुळे अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी ओळखणे सोपे जाते.
- योजनेमुळे देशातील गरिबी दूर होते.
- योजनेमुळे गरीब कुटुंबांना उपासमारीची वेळ येत नाही.
- योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना अत्यंत कमी दरात रेशन उपलब्ध होते.
- अंत्योदय अन्न योजनेचा लाभ हा मुख्यत्वे करून विधवा, अपंग व्यक्ती, निराधार कुटुंब, गरीब कुटुंबे, अशांना प्राधान्य दिले जाते.
- या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना अत्यंत कमी दरात अन्नधान्य पुरवून अन्नसुरक्षा मिळते
- या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ येत नाही.
- अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गहू व तांदूळ यांचे अत्यंत कमी दराने वाटप होते
- या योजनेमुळे कुटुंबावरील आर्थिक भार कमी होतो.
- या योजनेमुळे गरीब कुटुंब सुधारते त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था होते.
- या योजनेमुळे गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता आणि लहान मुलांना या योजनेअंतर्गत मिळालेले अन्न हे त्यांच्या पोषण आधारासाठी उपयोगी पडते.
- या योजनेमुळे देशातील गरिबी दूर होते.
- या योजनेचे लक्ष हे आर्थिक दृष्ट्या असुरक्षित कुटुंब तसेच उदरनिर्वाहाचे नियमित साधन नसणारे कुटुंब यांच्यावर केंद्रित केले आहे.
अंत्योदय अन्न योजणेसाठीची पात्रता
Antyodaya Anna Yojana Eligibility
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
- ज्या कुटुंबामध्ये आजारी व्यक्ती, अपंग व्यक्ती, विधवा स्त्रिया किंवा वयोवृद्ध म्हणजेच 60 वर्षावरील नागरिक आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे 1 लाख 50 हजार पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ हा भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, कुंभार, चांभार, मोची, विणकर, सुतार, लोहार, झोपडपट्टीतील रहिवाशी, रोजंदारी करणारे नागरिक, हमाल, मालवाहक, सायकलरिक्षा चालवणारे, हातगाडी चालवणारे, फळ विक्रेते, फुल विक्रेते, गारुडी, कचऱ्यातील वस्तू गोळा करणारे तसेच निराधार असे नागरिक या योजनेच्या लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
- कुष्ठरोगी कुटुंब किंवा कुष्ठरोगातून बरे झाले कुटुंब या योजनेस पात्र ठरतील.
अंत्योदय अन्न योजना रेशन कार्ड साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
Antyodaya Anna Yojana Documents
आधार कार्ड
बीपीएल प्रमाणपत्र
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
रहिवासी प्रमाणपत्र
मतदान ओळखपत्र
यापूर्वी कोणतेही रेशन कार्ड अर्जदाराकडे नाही असे प्रतिज्ञापत्र
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
अंत्योदय अन्न योजनेची अर्ज प्रक्रिया
Antyodaya Anna Yojana Apply
अंत्योदय अन्न योजनेचा अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येतो. या योजनेच्या दोन्ही पद्धती आपण आजच्या लेखात पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण ऑनलाइन पद्धतीने कसा अर्ज करावा याची प्रक्रिया पाहू
अंत्योदय अन्न योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
Antyodaya Anna Yojana Online Apply
अंत्योदय अन्न योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अंत्योदय अन्न योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज होम पेज ओपन होईल.
त्यामध्ये नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करा हा पर्याय असेल या पर्यायावर क्लिक करा.
या पर्यावर क्लिक करताच तुमच्या समोर एक पेज ओपन होईल.
त्यामध्ये राज्य केंद्रशासित प्रदेश अन्न पोर्टल यादी यावर पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या संबंधित राज्य निवडा.
त्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 2024 अर्जाचा फॉर्म दिसेल तो अर्ज भरा.
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरा.
तुम्ही अचूक अर्ज भरला आहे ना याची खात्री करून घ्या.
त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा.
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अंत्योदय अन्न योजनेचा अर्ज करून लाभ घेऊ शकता.
अंत्योदय अन्न योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
Antyodaya Anna Yojana Application
अंत्योदय अन्न योजनेचा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना संबंधित ग्रामसभेला भेट द्यावी लागेल.
शहरी भागातील अर्जदारला संबंधित नगरविकास विभागाला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर त्या क्षेत्रातील अन्नपुरवठा विभागात जावे लागेल.
त्यानंतर अर्जदाराला तेथील संबंधित अधिकाऱ्याकडून अंत्योदय अन्न योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.
त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत जोडावे लागतील.
त्यानंतर अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे ही कार्यालयात जमा करावी लागतील.
त्यानंतर तुमचा अर्ज अधिकारी तपासतील त्यानंतर तुम्हाला अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकेचा लाभ मिळेल.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
असा असतो अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकेचा रंग
Antyodaya Anna Yojana Scheme
AAY अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकेचा रंग हे राज्य सरकार ठरवते. केरळमध्ये अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकेचा रंग हा पिवळा आहे. तसेच तेलंगणामध्ये गुलाबी रंगाचे शिधापत्रिका कार्ड आहे.
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न: AAY चे पूर्ण नाव काय?
उत्तर: AAY म्हणजे अंत्योदय अन्न योजना होय.
प्रश्न: नियमित शिधापत्रिका आणि अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका मध्ये काय फरक आहे?
उत्तर: नियमित शिधापत्रिका ही सामान्य कुटुंबासाठी आहे, तर अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका ही गरिबातील गरीब कुटुंबासाठी तयार करण्यात आलेली योजना आहे.
प्रश्न: अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत AAY कसे मिळते अन्नधान्य?
उत्तर: अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दरमहा 35 किलो धान्य मिळते. यामध्ये गहू 2 रुपये प्रति किलो तर तांदूळ 3 रुपये प्रति किलो या दराने धन्य मिळते.
प्रश्न: अंत्योदय अन्न योजनेचा AAY कसा करावा अर्ज?
उत्तर: अंत्योदय अन्न योजनेचा अर्ज हा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येतो.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA