Hanuman Temples In Maharashtra : जाणून घेऊया कोणती आहेत 11 मंदिरे
Hanuman Temples In Maharashtra : आपल्याला अनेक मारुती मंदिराची ठिकाणी माहिती आहेत. पण आपण आज लेखाच्या माध्यमातून अशी मारुती मंदिरे पाहणार आहोत. जी समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केली आहेत.
11 maruti temples by samarth ramdas swami in maharashtra श्री हनुमान हे शौर्याचे व शक्तीचे प्रतीक आहेत. तरुणांना धर्म रक्षणाचे महत्त्व बळकट शरीर असणे ही प्राथमिक गरज रामदास स्वामींना भासली. हे साध्य करण्यासाठी रामदास स्वामींनी काही गावात मारुती मंदिरे उभारली.
मारुती मंदिरे म्हणजे केवळ अध्यात्म नसून ती बालोपासना केंद्र होती. या मंदिरामध्ये मारुतीचे सतत स्मरण करून त्यांच्यासारखं बलवान आणि येणाऱ्या संकटांवर मात करण्यात मदत व्हावी हा त्यामागचा हेतू होता.
धर्मरक्षणार्थ व संवर्धनार्थ गावोगावी चावडी जवळ किंवा पारा जवळ हनुमान मंदिरे स्थापून तरुणांनी बलोपासना करावी त्याचबरोबर राष्ट्रधर्म जागवावा अत्याचार जुलूम जबरदस्ती सहन करू नये अशी त्यांनी गावोगावी फिरून शिकवण दिली.
चला तर मग आज आपण जाणून घेऊ समर्थ रामदास स्वामींनी कोणत्या गावांमध्ये हनुमान मंदिरे स्थापन केली आणि प्रत्येक गावात त्या मागचा हेतू काय आहे.
जाणून घेऊया कोणती आहेत 11 मंदिरे
11 maruti temples by samarth ramdas swami in maharashtra
चाफळचा मारुती
चाफळ गाव हे एक ऐतिहासिक गाव आहे. सातारा जिल्ह्यात चाफळ गाव आहे. इथे समर्थ रामदास स्वामींनी एक हनुमान मंदिर उभारले. हनुमानाची मूर्ती प्राचीन शैली तयार केली गेली असून ती आजही भक्तांच्या मनात विश्वास आणि श्रद्धा निर्माण करते. हे मंदिर रामदास स्वामींच्या शिकवणीचे प्रतीक आहे.
शहापूरचा मारुती
शहापूर गाव हे सातारा जिल्ह्यात वसलेले गाव आहे. या शहापूर गावात मारुती मंदिर एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. येथील हनुमान मूर्ती खूप मोठ्या आकाराची असेल ती भक्तांना शक्ती आणि आशीर्वाद प्रदान करते. स्वामींनी येथे हनुमानाची मूर्ती स्थापित केली आणि भक्तांना भक्तिमार्गावर चालण्यास प्रेरित केले.
मसूरचा मारुती
मसूर हे गाव मिरज तालुक्यात आहे. येथे हनुमानाची मूर्ती स्थापित केली आहे. येथील हनुमान मूर्ती 5 फूट उंच आहे. पवित्र असलेल्या चून्यापासून ही मूर्ती बनवल्या गेली आहे. सामान्य या ठिकाणी हनुमान मंदिर ची स्थापना केली आहे.
माजगावचा मारुती
चाफळ या गावापासून काही अंतरावर असलेल्या माजगाव मध्ये असलेली हनुमान मूर्ती पवित्रता आणि बलाचे प्रतीक आहे. येथील मंदिर रामदास स्वामींच्या कार्याचे महत्त्व समजावते आणि आजही येथील भक्त या मारुतीची मनोभावे पूजा करतात.
उंब्रजचा मारुती
उंब्रज या गावात समर्थ रामदास स्वामींनी हनुमान मूर्ती स्थापित केली आहे. येथील हनुमान मूर्ती 2 फूट उंच आहे. उंब्रज गावातील या हनुमान मंदिराला त्या भागातील भक्तांमध्ये विशेष प्रतिष्ठा आहे.
शिंगणवाडीचा मारुती
चाफळ या गावापासून 1 किलोमीटर अंतरावर शिंगणवाडी हे एक छोटस गाव आहे. येथे अत्यंत सुंदर हनुमान मूर्ती स्थापित केली आहे. या गावातील हनुमान मूर्ती शांततेचे प्रतीक आहे.
शिराळ्याचा मारुती
सांगली जिल्ह्यातील शिराळा गावाजवळ असलेली हनुमान मूर्ती सूर्यकिरणांनी प्रकाशित होते. भक्तांना आशीर्वाद मिळवण्यासाठी एक महत्त्वाचे स्थान आहे. मंदिराच्या परिसरातील निसर्ग आणि वातावरण भक्तांना अधिक मोहक करतो.
बहे-बोरगाव चा मारुती
सांगली जिल्ह्यातील बहे गावामध्ये असलेली हनुमान मूर्ती विशेषतः एक साधी आणि आकर्षक आहे. ही मूर्ती समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली आहे.
मनपाडळेचा मारुती
कोल्हापूर जिल्ह्यात मनपाडळी गाव आहे. त्या गावातील हनुमान मूर्ती अत्यंत साधी व अत्यंत सुबक सुंदर आहे. समर्थ रामदास स्वामींनी या गावांमध्ये हनुमानाची मूर्ती स्थापन केली आहे.
पारगावचा मारुती
पारगाव येथील हनुमान मंदिर हे एक छोटी मूर्ती असलेले स्थान आहे. या ठिकाणी भक्तगण हनुमानाची पूजा करून आशीर्वाद घेतात. सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी या मारुतीला प्रार्थना केली जाते.
मसूरचा मारुती
मसूर गावातील हनुमान मूर्ती भक्तांना बल, शक्ती आणि मानसिक शांती देण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील मंदिरात शांती आणि अध्यात्मिक अनुभव देते.