Train Ticket Rules : तिकीट दलालांचा खेळ समाप्त!

रेल्वेने बदलला काउंटर बुकिंगचा नियम, यांनाच बुक करता येणार तत्काळ तिकीट

Train Ticket Rules : रेल्वे लवकरच संपूर्ण देशामध्ये काउंटरवर मिळणारी तत्काळ तिकीटवर ओटीपी आधारित व्हेरिफिकेशन लागू करणार आहे. ही सिस्टीम पायलेट प्रोजेक्ट म्हणून देशातील 52 रेल्वे स्टेशनवर यशस्वी सिद्ध झाली आहे. प्रवासांच्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपी द्वारेच तत्काळ तिकीट बुक करता येणार आहे. यामुळे दलालांचा खेळ समाप्त होणार आहे आणि सर्वसामान्य प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.

Indian Railways ने प्रवाशांना अधिक पारदर्शक आणि सुरक्षित तिकीट बुकिंग सुविधा देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. आता खिडकीवर मिळणारे तात्काळ तिकिटावरही ओटीपी आधारित व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात आले आहे. हा नवीन नियम लवकरच देशभरातील सर्व रेल्वे स्टेशन वरील तत्काळ तिकीट खिडकीवर लागू होणार आहे.

रेल्वेने दावा केला आहे की ही व्यवस्था तत्काळ तिकीटचा दुरुपयोग जवळपास समाप्त करेल आणि योग्य प्रवासांना त्यांचे तिकीट बुक करण्यास मदत होईल.

यापूर्वी रेल्वेने जुलै 2025 मध्ये ऑनलाईन तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार व्हेरिफिकेशन बंधनकारक केले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2025 चा पहिला दिवशी सामान्य बुकिंगसाठी ओटीपी आधारित ऑनलाइन सिस्टीम सुरू करण्यात आली. प्रवाशांनी या दोन्ही निर्णयाचे स्वागत केले. आणि रेल्वेला तिकीटच्या प्रोसेस मध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी यश मिळाले.

काउंटर बुकिंगमध्ये आता मोठा बदल

रेल्वेने 17 नोव्हेंबर 2025 पासून ओटीपी आधारित तात्काळ तिकीट काउंटिंग बुकिंगचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. सुरुवातीच्या यशस्वी परिणाम नंतर ही सुविधा 52 स्टेशनवर लागू करण्यात आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही सिस्टीम खूप प्रभावी दिसून आली. कारण याद्वारे बनावट बुकिंगवर लगाम लागला आहे आणि दलालांची सक्रियता ही कमी झाली आहे.

आता रेल्वेने ही सिस्टीम संपूर्ण देशातील रेल्वे स्थानकावर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच देशातील प्रत्येक आरक्षण केंद्राच्या खिडकीवर तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळी प्रवाशांना फॉर्म सोबत दिलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल आणि त्यानंतरच त्यांचे तात्काळ तिकीट बुक केले जाईल. ओटीपी शिवाय तात्काळ तिकीट बुक करता येणार नाही.

कशी असेल नवीन प्रोसेस

नवीन व्यवस्थेनुसार प्रवाशांना तात्काळ तिकीट घेण्यासाठी सामान्य फॉर्म प्रमाणेच फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मवर मोबाईल नंबर टाकणे बंधनकारक आहे. काउंटर कर्मचारी फॉर्म वरील माहिती सिस्टीम मध्ये टाकताच प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी लगेच तुम्ही काउंटरवर द्यायचा आहे. जसा हा ओटीपी मॅच होईल तसे तुमचे तिकीट कन्फर्म होऊन प्रिंट होईल. जर ओटीपी चुकीचा आहे तर तिकीट जारी होणार नाही.

रेल्वेचे म्हणणे आहे की ही पूर्ण प्रोसेस कठीण नाही तर खूप सोपी आणि वेगवान आहे. हे ऑनलाइन टिकिट सारखेच काम करणार आहे फक्त ही सुविधा आता केवळ रेल्वे स्टेशन वरील तत्काळ तिकीट खिडकीवर लागू करण्यात आली आहे.

तत्काळ तिकीट मध्ये वाढती पारदर्शकता

रेल्वेचा उद्देश म्हणजे तत्काळ तिकीट प्रणालीमध्ये होणारी फसवणूक थांबवणे हा आहे. अनेकांच्या तक्रारी येतात की तात्काळ तिकीट दलालाद्वारे ब्लॉक करण्यात येतात आणि खऱ्या प्रवाशांना तात्काळ तिकीट मिळत नाही. मात्र ओटीपी सिस्टीम लागू झाल्यानंतर आता कुठलाही व्यक्ती बनावट ओळखीद्वारे किंवा चुकीच्या नंबर द्वारे तिकीट बुक करू शकणार नाही.

टीपी केवळ प्रवाशांच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरच येईल. याद्वारे हे निश्चित होईल की तिकीट त्याच व्यक्तीला मिळत आहे. ज्याला प्रवास करायचा आहे. यामुळे तिकीट ब्लॉकिंगची प्रवृत्ती कमी होईल.

प्रवाशांसाठी मोठा फायदा

ओटीपी आधारित तात्काळ तिकीट सिस्टीम लागू झाल्यानंतर प्रवाशांना अनेक मोठे फायदे होणार आहेत. सर्वात मोठा फायदा हा म्हणजे दलांची संख्या कमी होईल आणि तिकीट योग्य प्रवासांना मिळेल. दुसरा फायदा असा की तत्काळ तिकिटाची बुकिंग पारदर्शक पद्धतीने होईल.

तिसरे कारण म्हणजे तिकीट मध्ये कुठलीही चूक झाली किंवा तिकीट रद्द करण्यात येते. त्यामुळे आता संपूर्ण पुढील प्रक्रिया मोबाईलद्वारेच होईल. यामुळे सुरक्षा अधिक वाढेल रेल्वेचे मान्य आहे की ही व्यवस्था येणाऱ्या वर्षांमध्ये भारतीय रेल्वे तिकीट प्रणालीला अधिक मजबूत डिजिटल आणि सुरक्षित बनवेल.

कधीपासून लागू होणार संपूर्ण देशात नियम

आतापर्यंत ओटीपी आधारित तत्काळ टिकीट सिस्टीम देशातील 52 रेल्वे स्टेशनवर लागू करण्यात आली आहे. मात्र रेल्वेने स्पष्ट केले आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये देशभरातील सर्व रेल्वे स्टेशनवर तत्काळ तिकीट खिडकीवर हे नियम लागू होणार आहेत. म्हणजेच आता तुम्ही कुठल्याही राज्यात राहत असाल मात्र तुम्हाला तात्काळ तिकीट बुक करायचे असेल तर ओटीपी बंधनकारक असेल. नवीन सिस्टीम डिसेंबर 2025 च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत संपूर्ण देशात लागू होण्याचा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

प्रवाशांची प्रतिक्रिया

ज्या रेल्वे स्टेशनवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. तेथील प्रवाशांनी ही चांगली सुविधा असल्याचे म्हणले आहे. त्यांचे म्हणणे आहे की यामुळे दलालांचा धबधबा कमी झाला आणि काउंटर उघडतात तिकीट काही मिनिटांमध्ये समाप्त होत होते मात्र आता ओटीपी सिस्टीम केल्यामुळे आता तिकीट सर्वांना मिळत आहेत.

आता प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळत आहे आणि तिकीट मिळवणे आता अधिक सोपे झाले आहे. त्याबरोबरच मोबाईल ओटीपी असल्याच्या कारणामुळे त्यांना आवश्यकता नाहीत असे व्यक्ती तत्काळ तिकीट बुक करत नाहीयेत. यामुळे गर्दी कमी झाली आणि प्रक्रिया अधिक व्यवस्थित दिसत आहे.

रेल्वेचे मोठे लक्ष

रेल्वेचे संपूर्ण टिकीट पारदर्शक पद्धतीने बुक व्हावे हा सर्वात मोठा उद्देश आहे. यामुळे दलालांना संपूर्णपणे कसे संपवता येईल यासाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. ओटीपी आधारित तत्काळ तिकीट बुकिंग हा त्या दृष्टीने टाकलेले एक मोठे पाऊल आहे.

ही सिस्टीम केवळ तिकीट प्रक्रिया मजबूत करणार नाही तर रेल्वेचा डाटा सुरक्षित ही करणार आहे. रेल्वेचे म्हणणे आहे की येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रकारच्या डिजिटल सुविधावर काम सुरू आहे. यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला होईल.