Indira Gandhi Matritva Sahyog Yojana 2024 In Marathi : गरोदर महिलांना 6 हजार रुपये आर्थिक मदत

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana 2024 Information In Marathi : इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024 मराठी माहिती

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana महाराष्ट्रातील गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी सरकारने इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांना वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देणे तसेच त्यांना या कालावधीमध्ये पोषक आहार उपलब्ध करून देणे हा Garodar Mata Yojna या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana या योजने दरम्यान गर्भवती महिलेने नोंदणी केल्यानंतर तिला राज्य सरकार मार्फत 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दोन हप्त्यांमध्ये केली जाते. प्रसूतीच्या वेळी 3 हजार रुपये आणि बालक 6 महिन्याचे झाल्यावर 3 हजार रुपये असे एकूण 6 हजार रुपये इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत IGMSY महिलेला दिले जातात.

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला गरोदरपणात देखील काम करतात त्यामुळे त्यांचे वजन वाढत नाही. प्रसुती नंतर शरीरात ताकद नसताना देखील त्या पुन्हा कामाला लागतात. त्यामुळे त्यांच्या शरीराला पुरेसा आराम मिळत नाही. त्यामुळे अशा महिलांच्या उत्पन्नात नुकसान होणाऱ्या नुकसानीची भरपाई करून देण्यासाठी Garodar Mata Yojna ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Garodar Mata Yojna केंद्र सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गरोदर स्त्रिया व स्तनपान करणाऱ्या माता यांना या कालावधीमध्ये नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देणे व त्यांना पोषक आहार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना IGMSY सुरू केली आहे.

ठळक मुद्दे

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2024 मराठी माहिती

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana 2024 Information In Marathi

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेची थोडक्यात माहिती

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana In Short

गरोदर माता योजनेचे उद्दिष्ट

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana Purpose

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेची वैशिष्ट्ये

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana Features

या योजनेअंतर्गत दिले जाणारे लाभ

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana Benefits

IGMSY या योजनेचे लाभार्थी

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana Benefisiors

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचे फायदे

Garodar Mata Yojna Benefits

IGMSY या योजनेची आवश्यक पात्रता

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana Eligibility

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचे नियम व अटी

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana Terms And Conditions

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेची कागदपत्रे

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana Documents

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेची अर्ज प्रक्रिया

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana Apply

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेची थोडक्यात माहिती

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana In Short

योजनेचे नावइंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
कधी सुरू झाली2010
लाभार्थीराज्यातील गरोदर महिला
लाभमहिलांचा आर्थिक विकास करणे
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://wcd.delhi.gov.in/
Indira Gandhi Matritva Sahyog Yojana

गरोदर माता योजनेचे उद्दिष्ट

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana Purpose

गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या माता यांना त्यांच्या गरोदर आणि स्तनपान कालावधीमध्ये मजुरीची झालेली नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देऊन त्यांचे आरोग्य सुधारणे या उद्देशाने इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना महाराष्ट्र IGMSY सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत महिलांना गरोदरपणात आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येते.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेची वैशिष्ट्ये

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana Features

महिलांना त्यांच्या गरोदरपणात आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Garodar Mata Yojna या योजनेचा लाभ ज्या महिलांची घरी प्रस्तुती झाली आहे त्यांना देखील घेता येणार आहे.

Garodar Mata Yojna या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

या योजनेअंतर्गत दिले जाणारे लाभ

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana Benefits

IGMSY इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना त्यांची नोंदणी केल्यानंतर राज्य सरकार मार्फत 2 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये आर्थिक मदत केली जाईल. ही मदत प्रथम प्रस्तुतीच्या वेळी 3 हजार रुपये आणि बालक सहा महिन्याचे झाल्यावर 3 हजार रुपये अशा दोन टप्प्यात देण्यात येईल.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

लखपती दीदी योजना

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

अटल पेंशन योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

IGMSY या योजनेचे लाभार्थी

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana Benefisiors

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील गर्भवती महिलांना होणार आहे.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचे फायदे

Garodar Mata Yojna Benefits

या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या गर्भावस्थेत काम करण्याची आवश्यकता नाही.

महिलांना गर्भावस्थेत पोषक आहार घेणे सोपे होईल.

या योजनेमुळे गरोदर महिलांना त्यांच्या गरोदरपणात आराम घेता येईल ज्यामुळे त्यांच्या होणाऱ्या बाळाची तब्येत चांगली राहील.

IGMSY या योजनेची आवश्यक पात्रता

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana Eligibility

या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचे नियम व अटी

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana Terms And Conditions

या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच घेता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

या योजनेचा लाभ गर्भवती महिलांनाच दिला जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

सरकारी व सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना सहवेतन मातृत्व रजा मिळत असल्यामुळे त्यांना या योजने मधून वगळण्यात आलेले आहे.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेची कागदपत्रे

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana Documents

आधार कार्ड

रेशन कार्ड

बँक खाते पासबुक

पासपोर्ट आकाराचा फोटो

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

प्रतिज्ञापत्र

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेची अर्ज प्रक्रिया

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana Apply

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचे अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार गर्भवती महिलेला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील महिला व बालविकास विभागात जावे लागेल.

तिथून त्यांना इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.

अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील.

संपूर्ण भरलेला अर्ज महिला व बालविकास विभागात जमा करावा लागेल.

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही गरोदर माता योजना म्हणजेच इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचा लाभ घेऊ शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA