Kadba Kutti Machine Yojana 2024 Information In Marathi : कडबा कुट्टी मशीन योजना मराठी माहिती 2024
Kadba Kutti Machine Yojana 2024 : नमस्कार वाचकहो, आजच्या लेखांमध्ये आपण कडबा कुट्टी मशीन योजना म्हणजे काय? याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रात आजही शेती हा व्यवसाय पारंपरिक व्यवसाय मानला जातो. त्यामुळे भरपूर लोक शेती करतात. शेती करताना त्यांच्याकडे पशुपालन जास्त असते. शेती करताना त्यांच्याकडे गाई, म्हशी, मेंढी, शेळी, ही जनावरे भरपूर असतात. या जनावरांना खाद्यासाठी शेतकरी हा काही ना काही चारा त्यांच्यासाठी आणत असतो. पण जनावरांना तो चारा खायला खूप अडचण येते, त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे सरकारने कडबा कुट्टी मशीन योजना Kadba Kutti Machine Subsidy 2024 सुरू केली आहे. या योजनेत मशीनचा असा फायदा आहे की, त्यामुळे जो जनावराला चारा दिल्या जाईल, त्याचे बारीक तुकडे होतील, म्हणजेच जनावरांना त्यांचे अन्न देण्यासाठी सोपे जाईल. आणि जनावरांना खाण्यासाठी देखील अत्यंत सोपे जाईल. कारण जर चारा खाताना मोठे तुकडे राहिले तर, जनावरांना तो चारा खाता येत नाही किंवा जरी तो जनावराने चारा खाल्ला तरी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि त्यामुळे जनावर आजारी देखील पडतात. त्यामुळे कडबा कुट्टी मशीन योजना Kadba Kutti Machine Scheme ही सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. आज आपण कडबा कुट्टी मशीन योजना म्हणजे काय? कडबा कुट्टी मशीन योजनेचे फायदे, वैशिष्ट्ये, पात्रता, उद्देश काय आहेत? कडबा कुट्टी मशीन योजनेचा अर्ज कसा करावा लागेल? कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, कडबा कुट्टी मशीन योजनेचा कोणाला होतो लाभ? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Kadba Kutti Machine Free Distribution Scheme देशातील ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. तसेच शेती सोबतच पशुपालन व्यवसाय देखील शेतकरी करतात. काही शेतकऱ्यांकडे कमी शेत जमीन असते त्यामुळे ते शेतकरी पशुपालन हा व्यवसाय करतात. परंतु त्यांना हा व्यवसाय करण्यासाठी भरपूर अडचणींचा सामना करावा लागतो. गाय, म्हैस यांना खायला हिरवा चारा द्यावा लागतो, हा हिरवा चारा कापण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात. चारा कापण्यासाठी शेतकऱ्यांजवळ कुठल्याही प्रकारचे साधन उपलब्ध नसते, त्यामुळे त्यांना भरपूर अडचणी येतात. त्यामुळे राज्यातील पशुपालकांना पशुपालन करताना येणाऱ्या समस्यांचा विचार करून सरकारने कडबा कुट्टी मशीन Kadba Kutti Machine योजना सुरू केली आहे. जनावरांना हिरवा चारा देण्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते. आणि तो चारा कापण्यासाठी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे साधन उपलब्ध नसते. त्यामुळे तो चारा हाताने कापावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दुखापत होते आणि शेतकऱ्यांना मशीन घेण्यासाठी देखील आर्थिक अडचणी येतात. आर्थिक दृष्ट्या गरीब असल्यामुळे मशीन घेणे हे त्यांच्यासाठी खूप अवघड जाते त्यामुळे शेतकऱ्यांना चारा कापण्यासाठी 2 एचपी विद्युतचलित कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी सरकारमार्फत 50% अनुदान दिले जाते. यामुळे शेतकरी कमी वेळात लवकरात लवकर चारा कापू शकतो आणि जनावरांना देऊ शकतो. जनावरांना देखील हा चारा खायला अत्यंत सोपे जाते कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी साधारणतः 20,000 रुपये लागतात. त्यामध्ये शेतकऱ्यांना सरकारतर्फे 50% अनुदान मिळते. त्यामुळे पशुपालकांना कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. उर्वरित रक्कम शेतकऱ्याला त्यांच्या स्वतः जवळची भरावी लागते.
ठळक मुद्दे :
कडबा कुट्टी मशीन योजना मराठी माहिती 2024
Kadba Kutti Machine Yojana 2024 Information
कडबा कुट्टी मशीन योजनेची थोडक्यात माहिती
Kadba Kutti Machine Anudaan Yojana 2024 In Short
कडबा कुट्टी मशीन योजनेचे उद्देश
Kadba Kutti Machine Yojana 2024 Purpose
कडबा कुट्टी मशीन योजनेची वैशिष्ट्ये
Kadba Kutti Machine Yojana Features
कडबा कुट्टी मशीन योजनेचे फायदे
Kadba Kutti Machine Subsidy 2024 Benefits
कडबा कुट्टी मशीन योजनेचे लाभार्थी
Kadba Kutti Machine Subsidy 2024 Benefisior
Kadba Kutti Machine Subsidy अंतर्गत मिळणाऱ्या लाभाची रक्कम
Kadba Kutti Machine Free Distribution Scheme लाभार्थ्यांची निवड
कडबा कुट्टी मशीन योजनेची पात्रता
Kadba Kutti Machine Yojana Eligibility
कडबा कुट्टी मशीन योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Kadba Kutti Machine Anudaan Yojana Documents
कडबा कुट्टी मशीन योजनेची अर्ज प्रक्रिया
Kadba Kutti Machine Yojana Apply
कडबा कुट्टी मशीन योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Kadba Kutti Machine Yojana Online Application
कडबा कुट्टी मशीन योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
Kadba Kutti Machine Scheme Offline Apply
FAQ’s या योजनेअंतर्गत वारंवार विचारली जाणारी प्रश्न
कडबा कुट्टी मशीन योजनेची थोडक्यात माहिती
Kadba Kutti Machine Anudaan Yojana 2024 In Short
योजनेचे नाव | कडबा कुट्टी मशीन योजना |
विभाग | पशुसंवर्धन विभाग |
लाभ रक्कम | 10 हजार रुपये |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी व पशुपालक |
उद्देश | शेतकऱ्यांना पशुपालन करण्यासाठी प्रोत्साहन देणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन आणि ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://mahadbbt.maharashtr.gov.in/ |
कडबा कुट्टी मशीन योजनेचे उद्देश
Kadba Kutti Machine Yojana 2024 Purpose
- राज्यातील शेतकरी तसेच पशुपालकांना 50% अनुदानावर कडबा कुट्टी मशीन उपलब्ध करून देणे हा या योजनेअंतर्गत सरकारचा मुख्य मुख्य उद्देश आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना पशुपालनासाठी प्रोत्साहन देणे.
- शेतकऱ्यांना पशुपालन कार्यात तेजी निर्माण करून देणे.
- शेतकऱ्यांना पशुपालन क्षेत्रात आधुनिक तंत्राचा वापर करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
कडबा कुट्टी मशीन योजनेची वैशिष्ट्ये
Kadba Kutti Machine Yojana Features
- Kadba Kutti Machine Yojana कडबा कुट्टी मशीन अंतर्गत शेतकऱ्यांना व पशुपालकांना पशुपालन करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान वापराच्या गोष्टी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.
- Kadba Kutti Machine Yojana या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी लाभाची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
- Kadba Kutti Machine Yojana या योजनेत शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी सरकारमार्फत 50% रक्कम अनुदान स्वरूपात मिळेल, म्हणजेच 10 हजार रुपये रक्कम या योजनेअंतर्गत सरकारमार्फत देण्यात येईल.
कडबा कुट्टी मशीन योजनेचे फायदे
Kadba Kutti Machine Subsidy 2024 Benefits
- कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत Kadba Kutti Machine Subsidy शेतकऱ्यांना 50 % अनुदान मिळेल.
- कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी सरकारमार्फत शेतकऱ्यांना 10 हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळेल.
- शेतकरी पशुपालन करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
- Kadba Kutti Machine Subsidy कडबा कुट्टी मशीनच्या मदतीने चारा हा अत्यंत कमी वेळेत कापता येतो.
- या मशीन मुळे चारा करताना कोणतीही नासधूस होत नाही.
- या योजनेमुळे पशुपालन करण्यासाठी शेतकरी आकर्षित होतील.
- कडबा कुट्टी मशीन मुळे चारा अत्यंत कमी वेळेत कापल्या जाणार असल्याने शेतकऱ्यांना हाताने चारा कापण्याची आवश्यकता नाही. यामुळे त्यांच्या वेळेची बचत देखील होणार आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना
कडबा कुट्टी मशीन योजनेचे लाभार्थी
Kadba Kutti Machine Subsidy 2024 Benefisior
कडबा कुट्टी मशीन योजनेचा Kadba Kutti Machine Subsidyलाभ हा राज्यातील शेतकरी तसेच पशुपालन यांना होणार आहे.
Kadba Kutti Machine Subsidy अंतर्गत मिळणाऱ्या लाभाची रक्कम
Kadba Kutti Machine Scheme कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत शेतकरी व पशुपालकांना 2 एचपी विद्युतचलित कडबा कुट्टी मशीन देण्यात येणार असून या मशीनची किंमत वीस हजार रुपये आहे. तर त्यासाठी सरकारकडून 50% अनुदान मिळणार आहे. म्हणजेच ही मशीन खरेदी करण्यासाठी 10 हजार रुपयांचे अनुदान या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना व पशुपालकांना मिळणार आहे.
Kadba Kutti Machine Free Distribution Scheme लाभार्थ्यांची निवड
Kadba Kutti Machine Scheme कडबा कुट्टी मशीन योजनेच्या लाभार्थ्यांची निवड ही 30 % महिला लाभार्थी व 3% अपंग लाभार्थी अशा पद्धतीने केली जाणार आहे.
कडबा कुट्टी मशीन योजनेची पात्रता
Kadba Kutti Machine Yojana Eligibility
- कडबा कुट्टी मशीन योजनेचा Kadba Kutti Machine Scheme लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे जनावर (पशु) असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराजवळ कमीत कमी दोन जनावरे असणे बंधनकारक आहे.
- ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी कडबा कुट्टी मशीन योजनेचा Kadba Kutti Machine Scheme लाभ घेतलेला आहे अशा लाभार्थ्यांना पुन्हा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- लाभार्थ्याने जर या योजनेअंतर्गत कडबा कुट्टी मशीन घेतले असेल तर त्याला ती मशीन विकता येणार नाही.
- अर्जदाराला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
- या योजनेचा लाभ हा मुंबई व मुंबई उपनगर मध्ये असलेल्या नागरिकांना घेता येणार नाही. या योजनेतून त्यांना वगळून टाकण्यात आलेले आहे.
कडबा कुट्टी मशीन योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Kadba Kutti Machine Anudaan Yojana Documents
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे रहिवाशी प्रमाणपत्र
- अर्जदाराचे बँक खाते पासबुक
- अर्जदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- जनावरांचा विमा केल्याचे प्रमाणपत्र
- कडबा कुट्टी मशीन खरेदीचे बिल
कडबा कुट्टी मशीन योजनेची अर्ज प्रक्रिया
Kadba Kutti Machine Yojana Apply
कडबा कुट्टी मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला ऑनलाइन तसेच ऑफलाईन या दोन्हीही पद्धतीने अर्ज करता येतो.
कडबा कुट्टी मशीन योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Kadba Kutti Machine Yojana Online Application
Kadba Kutti Machine Free Distribution Schemeकडबा कुट्टी मशीन योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
महाडीबीटी च्या पोर्टलवर गेल्यास सर्वप्रथम तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल
जर तुमचे या आधी रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर तुमचा स्वतःचा युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून घ्यावा लागेल
रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम रजिस्ट्रेशन या पर्यावर क्लिक करा
त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव टाकायचे आहे
त्यानंतर खाली पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे
सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तिथे टाकायचा आहे आणि व्हेरिफाय करायचे आहे
व्हेरिफाय झाल्यानंतर कॅपच्या कोड टाकावा लागेल
अशाप्रकारे तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल
त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी परत होम पेजवर यावे लागेल
होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील पहिला पर्याय आयडी किंवा आधार कार्ड नंबर तुम्हाला तिथे टाकावा लागेल
तुम्हाला तिथे आयडी वरती क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा लागेल
पासवर्ड नंतर तुम्हाला कॅपच्या टाकावा लागेल म्हणजे तुमचे यामध्ये लॉगिन होईल
लॉगीन झाल्यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल तिथे तुम्हाला अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल
या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर कृषी यंत्रणा बाबतीत तुम्हाला सर्व माहिती मिळेल हा पर्याय आहे हा पर्याय वर क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला अजून एक पर्याय दिसेल कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसाह्य या पर्यायावर क्लिक करा
या पर्यायावर क्लिक करताच यंत्राची माहिती निवडावी लागेल
यंत्राची माहिती भरल्यानंतर तुम्हाला कडबा कुट्टी मशीन याबद्दलचा पर्याय निवडावा लागेल
त्यानंतर फॉर्म सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल
फॉर्म सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर टाकून अर्ज सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल
या अर्जासाठी तुम्हाला 23 रुपये ते 60 रुपये पर्यंतचे ऑनलाइन पेमेंट करावे लागेल
त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल सबमिट केल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल
त्याची एक लिस्ट लागेल त्या लिस्ट मध्ये तुमचे नाव दिसेल.
जर तुमचे नाव त्या लिस्ट मध्ये आले तर तुमची कागदपत्रे तपासून तुम्हाला कडबा कुट्टी मशीन योजनेचा लाभ घेता येईल
किंवा तुम्ही Kadba Kutti Machine Free Distribution Scheme दुसऱ्या पद्धतीने देखील ऑनलाईन अर्ज करू शकता
त्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जा
तिथे अर्जदाराला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल
जर तुम्ही युजरनेम आणि पासवर्ड तयार केलेला नसेल तर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी या पर्यावरण करावे लागेल आणि तुमची नोंदणी करून घ्यावी लागेल
त्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल
लॉगीन केल्यानंतर शेती योजना यावर क्लिक करा
त्यानंतर शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या सर्व योजनांची लिस्ट तुम्हाला दिसेल
त्यामध्ये तुम्हाला कडबा कुट्टी मशीन योजना या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अर्ज दिसेल
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरा
त्यासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
तुम्ही फॉर्म चुकलेला आहे ना याची खात्री करून घ्या आणि सबमिट बटन वर क्लिक करा
अशाप्रकारे तुम्ही कडबा कुट्टी मशीन योजनेची ऑनलाईन करू शकता
कडबा कुट्टी मशीन योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
Kadba Kutti Machine Scheme Offline Apply
जवळील ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिल्हा कार्यालयात जावे लागेल
तेथील पशुसंवर्धन विभागाला भेट द्यावी लागेल
त्यांच्याकडून तुम्हाला कडबा कुट्टी मशीन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती त्यामध्ये सांगितलेली आवश्यक कागदपत्रे या अर्जा सोबत जोडावी लागतील
त्यानंतर तुम्हाला तो अर्ज आवश्यक कागदपत्रांसह पशुसंवर्धन विभागात जमा करावा लागेल
अशा प्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता
FAQ’s या योजनेअंतर्गत वारंवार विचारली जाणारी प्रश्न
प्रश्न: कडबा कुट्टी मशीन योजनेचा लाभ कोणाला होतो?
उत्तर: कडबा कुट्टी मशीन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना व पशुपालकांना होतो.
प्रश्न: कडबा कुट्टी मशीन योजनेत मशीनची किंमत किती?
उत्तर: कडबा कुट्टी मशीन योजनेची किंमत ही वीस हजार रुपये आहे.
प्रश्न: कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत किती मिळते आर्थिक मदत?
उत्तर: कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत सरकारमार्फत 50 टक्के अनुदान मिळते म्हणजेच दहा हजार रुपयांची आर्थिक मदत होते.
प्रश्न: कडबा कुट्टी मशीन योजनेचा अर्ज कसा करावा?
उत्तर: कडबा कुट्टी मशीन योजनेचा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://mahadbbt.maharashtr.gov.in/ ही आहे.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA