Kisan Credit Card Yojana 2024 information in marathi : किसान क्रेडिट कार्ड योजना 2024 मराठी माहिती
PM Kisan Credit Card Yojana 2024 : देशभरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे कर्ज घेताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना Kisan Credit Card Yojana सुरू केलेली आहे. या योजनेचा देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे कर्ज सहज उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड Kisan Credit Card योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत दिल्या गेलेल्या कर्जावर 7 टक्के व्याजदर आकरला जातो पण शेतकऱ्याने अर्जाची वेळेवर परतफेड केल्यास त्या शेतकऱ्याला व्याजदरात 3 टक्के सवलत दिली जाते. म्हणजेच शेतकऱ्याला 4 टक्के व्याजदारणे हे कर्ज मिळते. विशेष बाब म्हणजे किसान क्रेडिट द्वारे शेतकऱ्यांना 1 लाखाचे बिनव्याजी कर्जही दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ होत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कुठल्याही हमी शिवाय 3 लाख पर्यंतचे कर्ज 2 ते 4 टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले जाते. कारण शेतकऱ्यांना सावकाराकडून मोठ्या व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. हे कर्ज घ्यावा लागू नये म्हणून किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना गरज भासल्यास शेतकरी या कार्डच्या माध्यमातून तीन लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना कुठल्याही खाजगी सावकारावर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही, आणि सावकाराकडून त्यांची पिळवणूक ही होत नाही. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे.
Kisan Credit Card किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज वेळेवर परत केल्यास कर्जावरील व्याजदर कमी राहतो. शेतीसाठी असणारे इतके स्वस्त कर्ज इतर कोणत्याही योजनेअंतर्गत दिले जात नाही. केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड Kisan Credit Card देण्याची मोहीम राबवली आहे. या योजनेद्वारे फेब्रुवारी 2020 पासून साडेचार कोटी हून अधिक अर्ज मंजूर करण्यात आलेले असून त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत.
किसान क्रेडिट कार्ड योजना म्हणजे काय?
What is PM Kisan Credit Card Yojana
देशातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड Kisan Credit Card च्या माध्यमातून केवळ 4 टक्के वार्षिक व्याजदरावर 3 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. या योजनेत शेती व्यतिरिक्त पशुसंवर्धन, मत्स्यपालन करणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. या अंतर्गत त्यांना फक्त 2 लाख रुपये कर्ज मिळते. या योजनेअंतर्गत 1 लाख 60 हजार रुपयापर्यंत कर्ज कोणत्याही हमी शिवाय शेतकऱ्यांना दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्याला काही तारण ठेवण्याची आवश्यकता पडत नाही.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या किसान क्रेडिट कार्ड PM Kisan Credit Card साठी 4 टक्के व्याजदरावर शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे त्याच व्याजदारांनी कर्ज उपलब्ध होते. मात्र शेतकऱ्याने घेतलेले कर्ज वेळेवर जमा केले नाही तर पूर्ण व्याजदर त्याला द्यावा लागतो. कारण सवलत कालबाह्य होते. सवलते शिवाय शेतकऱ्याला 7 टक्क्यापर्यंत व्याजदर लागू शकतो. किसान क्रेडिट कार्डधारकांनी वेळेवर रक्कम न भरल्यास चक्रवाढ व्याज आकारले जाते. मात्र या कार्डच्या मदतीने शेतकरी पिकाच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनापासून ते दूध व्यवसाय, शेतीसाठी सिंचन, पंप खरेदी इत्यादी बाबी करू शकतो. विशेष बाब म्हणजे हे क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना कमी वेळात आणि कमी कागदपत्रात तीन लाख पर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गरज यातून पूर्ण होत आहे आणि त्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध होत आहे
(KCC) PM Kisan Credit Card योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे आर्थिक भांडवल उपलब्ध करून देते. वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश केंद्र सरकारच आहे. सरकार शेतकऱ्यांना 2 टक्के सवलत आणि वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 3 टक्के सवलत देते. आशा पद्धतीने शेतकऱ्यांना 4 टक्के व्याजदारणे सवलतीच्या दरात किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते.
देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना शेती करताना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड ही योजना सुरू केली आहे.
या PM Kisan Credit Card योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काहीही तारण न ठेवता कर्ज देण्यात येते. किसान क्रेडिट कार्ड नुसार शेतकरी हवे असल्यास कृषी आवश्यकतेनुसार किंवा त्यांच्या शेतीसाठी लागत असलेल्या साहित्य खरेदीसाठी कमी व्याजदरात कर्ज या माध्यमातून घेऊ शकतात. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळणारे कर्ज हे विशेष सवलत तिच्यादरात शेतकऱ्यांना दिले जाते. जे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन वेळेवर कर्ज परतफेड करतात त्यांना या योजनेअंतर्गत विशेष सवलतही दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना 4 टक्के दराने कर्ज उपलब्ध होत आहे.
ठळक मुद्दे :
किसान क्रेडिट कार्ड योजना म्हणजे काय?
किसान क्रेडिट कार्ड योजनेची थोडक्यात माहिती
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे उद्देश
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे लाभ
असे मिळवा किसान क्रेडिट कार्ड
किसान क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकांची नावे
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे
किसान क्रेडिट कार्ड योजणेसाठीची आवश्यक कागदपत्रे?
किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा अर्ज?
FAQ
किसान क्रेडिट कार्ड योजनेची थोडक्यात माहिती
Kisan Credit Card Yojana in Short
योजनेचे नाव | किसान क्रेडिट कार्ड योजना |
कधी सुरू झाली | 1998 |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
उद्देश | शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे |
कर्ज रक्कम | 3 लाखापर्यंत |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन / ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | pmkisan.gov.in |
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे उद्देश
Purpose of Kisan Credit Card Yojana
Kisan Credit Card या योजनेअंतर्गत पिकांच्या लागवडीसाठी आपत्कालीन कर्ज मिळते.
पिकाच्या काढणीसाठी कर्ज उपलब्ध होते.
शेतीसाठी खेळते भांडवल या माध्यमातून उपलब्ध होते.
शेतकऱ्यांना पिकाची लागवड करण्यात आर्थिक मदत मिळते.
पिकाच्या कापणीनंतर खर्च करण्यासही यातून रक्कम मिळते.
शेतकऱ्यांच्या दैनंदिन घरगुती गरज आहे यातून पूर्ण होतात.
शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदीसाठीही या योजनेचा मोठा फायदा होत आहे.
शेतीसाठी खेळते भांडवल शेतकऱ्याकडे राहते, गरज पडल्यास यातून कर्ज घेता येते.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे लाभ
Benefits of Kisan Credit Card Yojana
PM Kisan Credit Card Yojana 2024 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
प्रत्येक पिकासाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता शेतकऱ्यांना नाही.
शेतकऱ्यांना कमी व्याजदरासह कुठल्याही हमीशिवाय या योजनेअंतर्गत कर्ज मिळते.
शेतकऱ्यांना बी बियाणे, शेती अवजारे, कीटकनाशके, आदींच्या खरेदीसाठी या योजनेतून मिळणाऱ्या कर्जाचा वापर करता येतो.
शेतकऱ्याला आवश्यक असल्यावेळी शेतकरी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेऊन आपली गरज भागू शकतो. यासाठी त्याला कुठल्याही सावकारच्या दाराला जाण्याची गरज राहत नाही.
या योजनेअंतर्गत अधिकाधिक कर्ज मिळण्याची मर्यादा तुमच्या शेतीच्या उत्पादनावर अवलंबून आहे.
योजनेअंतर्गत तुमच्या कर्ज सीमेवर किती वेळा पैसे काढावे हे निश्चित करण्यात आलेले आहे.
या कर्जाची परतफेड शेतीतील पीक निघाल्यानंतर तुम्ही करू शकता.
असे मिळवा किसान क्रेडिट कार्ड KCC
आपल्या जवळच्या सरकारी बँकेत जाऊन तुम्ही KCC या योजनेसाठी अर्ज करू शकता.
बँकेकडून पात्र असलेल्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाते आणि एक पासबुक दिले जाते.
यामध्ये शेतकऱ्याचे नाव, पत्ता, जमिनीची माहिती, कर्ज घेण्याची मर्यादा, अर्जदाराचा फोटो, ओळखपत्र आणि नेहमीच्या व्यवहाराची नोंद करण्याची यात सुविधा आहे.
सौर कृषी पंप च्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत घ्या कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन
किसान क्रेडिट कार्ड KCC देणाऱ्या बँकांची नावे
स्टेट बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ इंडिया
पंजाब नॅशनल बँक
आदी बँकांचा यामध्ये समावेश आहे
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे
Kisan Credit Card Yojana Benefits
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा PM Kisan Credit Card Yojana लाभ केवळ देशातील शेतकरीच घेऊ शकतो.
शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आर्थिक मदत लागल्यास या क्रेडिट कार्डच्या KCC माध्यमातून ते कर्ज घेऊन आपली गरज भागू शकतात.
या कर्जाच्या माध्यमातून शेतकरी बी बियाणे, खते, कीटकनाशके किंवा शेती संबंधित अवजारे खरेदी करू शकतात.
कोणत्याही हमी शिवाय शेतकरी 3 लाख रुपयापर्यंत कर्ज या योजनेच्या माध्यमातून घेऊ शकतात.
किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्याला तीन वर्षांमध्ये पाच लाखापर्यंत कर्ज घेता येते.
किसान क्रेडिट कार्डची Kisan Credit Card वैधता ही पाच वर्षासाठी असते.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते.
ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत कर्ज घेतले आहे मात्र काही अडचणीच्या स्थितीमध्ये शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करू शकला नाही तर त्याला या योजनेअंतर्गत व्याजदरात आणखी तीन टक्के सवलत दिली जाते. अशा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होऊन चार टक्के व्याजदरच भरावा लागतो.
किसान क्रेडिट कार्ड योजणेसाठीची आवश्यक कागदपत्रे?
Documents of Kisan Credit Card Yojana
आधार कार्ड
पॅन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र (रेशन कार्ड किंवा रहिवासी दाखला)
जमिनी संदर्भात सातबारा व आठ अ उतारा
बँक पासबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो
किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा अर्ज?
Kisan Credit Card Yojana online apply
किसान क्रेडिट कार्ड या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धत आणि ऑफलाइन पद्धत या दोन्ही पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करता येतो. त्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा याची प्रक्रिया पाहू…
सर्वप्रथम किसान क्रेडिट कार्ड योजनेचा PM Kisan Credit Card Yojana 2024 अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
वेबसाईटला भेट देतात तुमच्या समोर एक होम पेज ओपन होईल.
त्यामध्ये पर्यायांच्या सूची असतील. त्यामधून किसान क्रेडिट कार्ड हा पर्याय निवडा.
त्यावर क्लिक करताच तुम्ही पुढच्या पेजवर जाल, तिथे तुम्हाला अर्ज करा हा पर्याय दिसेल.
या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल.
त्या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरा आणि सबमिट या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला अर्जाचा संदर्भ क्रमांक पाठवला जाईल, जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल तर बँक पुढील प्रक्रिया करून तुम्हाला कर्ज देईल.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता तसेच आता ऑफलाइन पद्धतीने ही अर्ज कसा करावा हे आपण बघू…
किसान क्रेडिट कार्डचा अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर तेथून तुम्ही या योजनेचा अर्ज डाऊनलोड करा.
अर्ज डाउनलोड केल्यानंतर त्यावर आपण आपली माहिती, कर्जाची रक्कम, थकीत असलेले आपल्याकडील कर्जाचा तपशील व आपल्या शेतीसंबंधी संपूर्ण माहिती भरावी.
अर्ज संपूर्ण भरून झाल्यानंतर आपण हा अर्ज संबंधित बँक मध्ये जमा करावा.
आपण हा अर्ज बँकेमध्ये जमा केल्यानंतर किसान क्रेडिट कार्ड तुम्हाला बँकेत किंवा पोस्टद्वारे घरपोच मिळेल.
FAQ
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा KCC लाभ कोणाला मिळतो?
देशातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो
किसान क्रेडिट कार्डच्या KCC कर्जासाठी व्याजदर किती?
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 7 टक्के व्याजदराणे कर्ज दिले जाते.
किसान क्रेडिट कार्डद्वारे KCC कर्ज मर्यादा किती?
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख पर्यंत कर्ज विनातारण दिले जाते.
किसान क्रेडिट कार्ड KCC कसे मिळवावे?
किसान कार्ड ऑफलाईन मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक घेत जाऊन किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर ते संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला मिळते मात्र एक आक्टोंबर 2023 पासून तुम्ही क्रेडिट कार्ड ठी ऑनलाईन अर्ज ही करू शकता. किसान क्रेडिट कार्ड डिजिटल झाल्यामुळे शेतकऱ्यांना हे कार्ड मिळवण्यासाठी घराबाहेर जाण्याची आवश्यकता नाही.
आमचा हा लेख तुम्हाला आवडला असल्यास नक्की फॉलो करा. Follow on Google News
https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA