Kojagiri Purnima 2024 In Marathi : कोजागिरी पौर्णिमेची संपूर्ण माहिती 2024
Kojagiri Purnima 2024 शारदीय नवरात्रीनंतर उत्सुकता लागते ती कोजागिरी पौर्णिमेची. कोजागिरी पौर्णिमा ही दसऱ्यानंतरच्या पौर्णिमेच्या दिवशी येते. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आहे. संपूर्ण वर्षातील पौर्णिमेत Sharad Purnima शरद पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. Sharad Purnima शरद पौर्णिमेचे व्रत यावर्षी 16 ऑक्टोंबर रोजी करण्यात येईल. या दिवशी चंद्र प्रकाशात खीर तयार करतात. शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीच्या दर्शनासाठी येते आणि सर्व भक्तांना आशीर्वाद देते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा अमृताचा वर्षाव करतो. या दिवशी चंद्र 16 टप्प्यांनी पूर्ण होतो. चंद्रांच्या किरणामध्ये ठेवलेली खीर खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात असे म्हणतात. आपल्यावर देवीची कृपादृष्टी राहते. यावर्षी कधी आहे शरद पौर्णिमा. काय आहे शुभमुहूर्त याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहू.
Kojagiri Purnima 2024 शारदीय पौर्णिमेला वर्षातील सर्व पौर्णिमेपैकी श्रेष्ठ मानले जाते. यावर्षी शरद पौर्णिमेचे व्रत 16 ऑक्टोंबर रोजी पाळण्यात येणार आहे. या दिवशी रात्री चंद्र प्रकाशात खीर तयार केली जाते. शरद पौर्णिमेला अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणतात. वर्षातील 12 पौर्णिमा मध्ये या पौर्णिमेचे महत्त्व हे विशेष आहे. असे मानले जाते की, या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली म्हणून हा दिवस देवी लक्ष्मीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा Sharad Purnima शरद पौर्णिमा 16 ऑक्टोबरला आहे. या दिवशी देवी लक्ष्मी खूप आनंदी असते. रात्री चंद्र प्रकाशात पृथ्वीला भेटायला येते. देवी लक्ष्मीचा त्या भक्तांवर कृपाशीर्वाद राहतो. या दिवशी रात्री जागरण करावे. माता लक्ष्मी पाहते कोण जागी आहेत? कोण तीची पूजा करत आहेत. म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. चंद्राच्या किरणांमध्ये ठेवलेल्या खिरीचे सेवन केल्याने अनेक रोग नाहीसे होतात. देवीची कृपादृष्टी आपल्यावर राहते.
शरद पोर्णिमा Sharad Purnima तिथी
Kojagiri Purnima हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा 16 ऑक्टोंबर रोजी रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी सुरू होणार आहे आणि 17 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी 4 वाजून 50 समाप्त होणार आहे. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र देवाची पूजा करावी.
कोजागिरी पौर्णिमेची पूजा
Kojagiri Purnima कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करतात कारण असे मानले जाते की, तिचा जन्म त्या दिवशी झाला होता याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर येते. या दिवशी लोक लक्ष्मी देवीची पूजा करतात. या दिवशी चंद्र हा 16 टप्प्यांनी भरतो आणि चंद्राची किरणे अमृताचा वर्ष करतात. त्यामुळे चंद्र प्रकाशात रात्रभर खीर ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी देवी लक्ष्मीला अर्पण करून प्रसाद म्हणून दिली जाते.
कोजागिरी पौर्णिमेची पूजा
Kojagiri Purnima 2024 पूजा करण्यासाठी सकाळी स्नान केल्यानंतर घराचे मंदिर स्वच्छ करावे. त्यानंतर मंदिरात लाल किंवा पिवळे कापड पसरवून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करावी. तांब्याच्या किंवा मातीच्या कळसावर लाल कापड पसरवून त्यावर लक्ष्मीची सोन्याची मूर्ती स्थापित करू शकता. मूर्ती समोर तुपाचा दिवा लावा, गंगाजलाने स्नान करून अक्षता, हळदी -कुंकू अर्पण करा. त्यानंतर मिठाई आणि खीर अर्पण करा. रात्रभर जागे राहून विष्णुसहस्रनामाचा जप करावा, श्री सूक्ताचे पठण करावे, श्रीकृष्णाचा महिमा करावा, श्रीकृष्ण मधुराष्टकम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे.