Ladki Bahin Yojana e-KYC Correction : आदिती तटकरेंनी दिली माहिती
Ladki Bahin Yojana e-KYC Correction : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC करण्यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. परंतु आता यामध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसी च्या दुरुस्तीसाठी आता महिलांना एक संधी मिळणार आहे.
म्हणजे जर तुमची केवायसी प्रक्रिया काही चुकली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. या बदलाची तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे.
Mukyamantri Majhi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी दुर्गम ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चुका होऊ शकतात हे स्वभाविकच आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. त्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Aditi Tatkare on e-KYC सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबवण्यात येत आहे. म्हणूनच महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी सरकारने महिलांना दिली आहे. ही अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात येत आहे. Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana e-KYC Correction त्याचबरोबर पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी देखील पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अधिक सोपी व्हावी, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटीबद्ध आहे.