Ladki Bahin Yojana Helpline Number : अर्जात चूक झाल्यावर झालीये मग हा हेल्पलाइन नंबर करा डायल आणि मिळवा प्रश्नांचे उत्तरे
Ladki Bahin Yojana Helpline Number In Marathi : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती.
Ladki Bahin Yojana या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना 1500 रुपये दिले जातात. ही योजना सुरू झाल्यापासून चर्चेचा विषय बनली आहे. ही योजना सुरू होऊन साधारण दीड वर्ष झाले आहे. दीड वर्षापासून दरमहा 1500 रुपये महिलांना मिळत असून महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदाही झाला.
या योजनेत अनेक गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आल्यावर त्यांना आळा घालण्यासाठी केवायसी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. लाखो महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
आता राज्यात लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात एक घोषणा केली.
Ladki Bahin Yojana या योजनेतील लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी एक विशेष हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. त्या नंबर वर कॉल करून त्यांच्या शंकांचं निरासन करण्यात येणार आहे. आवश्यक असेल तर लाडक्या बहिणींनी या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करावा असे आदिती तटकरे यांनी ट्विट च्या माध्यमातून सांगितले आहे.
लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाइन नंबर
Minister Launches Helpline for Beneficiary Support
Minister Launches Helpline for Beneficiary Supportमहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स वर पोस्ट करून लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचे अपडेट दिले आहेत. लाडक्या बहिणीसाठी एक विशेष हेल्प हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची इकेवायसी प्रक्रिया करत असताना अनेक महिलांकडून काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडला गेला असल्यामुळे लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत.
या योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाइन नंबर वर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सला योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
योजनेशी संबंधित सर्व तक्रारीचे निरासन 181 या हेल्पलाइन नंबर वरून करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ बंद झाला आहे, अशा महिलांनी त्यांच्या शंकेचे निवारण करण्यासाठी हेल्पलाइन नंबर 181 वर संपर्क करावा व आपल्या शंकेचे निरासन करावे.