Ladki Bahin Yojana New Update 2024 In Marathi : अखेर प्रतीक्षा संपली डिसेंबर महिन्याची तारीख जाहीर झाली
Ladki Bahin Yojana New Update 2024 In Marathi : महाराष्ट्रात पॉप्युलर ठरलेली लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लवकरच जमा होण्याचे संकेत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल.
Ladki Bahin Yojana New Update 2024 महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेची घोषणा अंतरिम अर्थ संकल्पात करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच ही योजनेची अंमलबजावणी देखील करण्यात आली. जुलै महिन्यापासून Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती.
Ladki Bahin Yojana New Update लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येतात. जुलैपासून महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. आत्तापर्यंत महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्याचे हप्ते मिळाले आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्यात आला होता. आचारसंहितेमुळे ही योजना काही दिवस बंद होती. परंतु आता पुन्हा या योजनेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना 2024
Ladki Bahin Yojana New Update डिसेंबरचे पैसे कधी मिळणार असा लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे. तर त्यांच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. डिसेंबर महिन्याचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली.
Ladki Bahin Yojana New Update ज्या महिलांनी या योजनेअंतर्गत अर्ज केले होते परंतु काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना अजून एकही हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे जमा होतील. आता डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या काही अर्जांची छानणी आणि बाकी होती, त्या प्रक्रियेला आता सुरुवात करण्यात आली आहे, ज्यांच्या अर्ज प्रक्रियेमध्ये काही त्रुटी आहेत त्यांना पुन्हा एकदा अर्ज भरून द्यावे लागणार आहेत.