Ladki Bahin Yojana New Update In Marathi : अदिती तटकरे यांची माहिती
Ladki Bahin Yojana New Update : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातील लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरून 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, ते अजून पूर्ण झालेले नाही.
Ladki Bahin Yojana New Update मात्र आता महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. 10 मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र या अर्थसंकल्पातूनही लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत थेट आदिती तटकरे यांना प्रश्न केला की राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये सरकार देणार आहे की नाही.
Ladki Bahin Yojana New Update यावर आदित्य तटकरे यांनी सरकारची बाजू मांडली आहे आणि 2100 रुपये राज्यातील बहिणींना कधी मिळतील हे सांगितले आहे.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana सध्या मुंबई येथे राज्याचे पहिले अधिवेशन सुरू आहे. यामध्ये राज्यातील अनेक प्रश्नांवर विविध प्रकारे चर्चा होत आहेत. त्यामध्ये शेतकरी कर्जमाफी सरकार कधी देणार? निवडणुकांमध्ये जनतेला दिलेले आश्वासने सरकार कधी पूर्ण करणार? या विरोधात विरोधकांनी रान उठवले आहे.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana मात्र सरकारकडून यावर कुठलेही प्रकारचे स्पष्ट उत्तर दिले जात नाहीये. मात्र आज विधानसभेमध्ये आमदार रोहित पवार यांनी आदिती तटकरे यांना स्पष्ट शब्दात प्रश्न विचारला की, तुमचे सरकार लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार आहात. या प्रश्नांचे उत्तरही आदिती तटकरे यांनी दिले आहे.
काय म्हणाल्या अदिती तटकरे
Mukhyamantri Ladki Bahin Yojana रोहित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ती महायुती सरकारने सुरू केलेली आहे. राज्यात ती मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली असून अनेक महिलांना याचा लाभ मिळाला आहे.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना 1500 रुपयांचा लाभ देणारे हे एकमेव सरकार असल्याचे तटकरे यांनी सभागृहात सांगितले. या 1500 रुपयामुळे गरीब बहिणींच्या आयुष्यात आनंद कायम राहणार आहे आणि राहिला प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा तर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ज्यावेळेस निर्णय घेतील, त्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील.