PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार रुपये जमा करण्यात येतात. देशभरातील शेतकऱ्यांचा पुढील हप्त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. 22 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
आता 23 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार? यासंदर्भात अपडेट माहिती समोर आली असून काही आवश्यक काम पूर्ण केल्यानंतर पैसा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
PM Kisan Yojana : देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत मिळणारे 2 हजार रुपयाचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 22 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. आता प्रतीक्षा आहे ती 23 व्या हप्त्याची.
केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपये देण्यात येतात. ही रक्कम शेतकऱ्यांना तीन टप्प्यात दोन-दोन हजार रुपये करून देण्यात येते. ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. ज्यामुळे पारदर्शकता कायम राहते.
PM Kisan Yojana : नुकताच 22 वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला. यामध्ये जवळपास 9 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये जमा करण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात.
तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येते. प्रत्येक वेळी 2 हजार रुपये जमा केले जातात. 1 एप्रिलला आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर चार महिन्यात पहिला हप्ता जमा करण्यात येतो.
कधी जमा होणार 23 वा हप्ता?
पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 जमा करण्यापूर्वी सरकारकडून अधिकृत एक तारीख घोषित करण्यात येते. या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येतात. पीएम किसान योजना अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडिया हँडलवर ही माहिती देण्यात येते. पीएम किसान योजनेच्या 22 वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी जमा झाला आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येतात. अशा स्थितीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 23 वा हप्ता जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. मात्र अजून या संदर्भातील अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही.
या शेतकऱ्यांना मिळतील ₹2000
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता अशा शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्याकडे शेती योग्य जमीन आहे आणि या जमिनीची नोंदणी सरकारी रेकॉर्डमध्ये आहे.
आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्याचे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
बँक अकाउंट योग्य असणे आवश्यक आहे.
ekyc प्रक्रिया पूर्ण केली असावी.
तर यापैकी कुठलीही माहिती तुम्ही अपूर्ण ठेवली असेल तर तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकणार नाही. त्यामुळे ही माहिती अपडेट करणे आवश्यक आहे.
ekyc केली नाही तर पैसे थांबू शकता
सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचा हप्ता थांबू शकतो. या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांनी जमिनीची योग्य माहिती दिली नाही असे शेतकऱ्यांचाही हप्ता थांबू शकतो.
शेतकऱ्यांनी हे काम करणे आवश्यक
प्रधानमंत्री किसान निधी योजना अंतर्गत 23 वा हप्ता जमा करण्यासाठी शेतकऱ्यांनी ekyc, भू सत्यपन करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना बँक मध्ये जाऊन अकाउंट मध्ये डीबीटी स्टेटस चेक करावे लागेल.
तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही असे तपासा
शेतकरी आपल्या नावाचे स्टेटस सोप्या पद्धतीने ऑनलाइन चेक करू शकतात.
यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
तेथे फार्मर corner मध्ये know your status यावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा रजिस्टर नंबर आणि कॅपच्या भरा. यानंतर शेतकरी पाहू शकतील की त्यांची ekyc, लँड सीडींग आणि आधार बँक सीडीज प्रक्रिया पूर्ण झाली आहे किंवा नाही.
ही संपूर्ण माहिती जरा पूर्ण असेल तर तुम्ही ती पूर्ण करू तेही किसान योजनेचा लाभ घेऊ शकता.