lakhpati didi yojana 2026 in marathi : काय आहे लखपती दीदी योजना
lakhpati didi yojana 2026 in marathi : 2023 वर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम लखपती दीदी योजेनेची घोषणा केली होती. ग्रामीण भागातील महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना बचत गटामार्फत प्रशिक्षण देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
त्या नंतर 2023 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने या योजनेची घोषणा केली. तुम्हालाही कौशल्य प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करायचा आहे? आणि लखपती दीदी योजनेचा कसा फायदा होणार आहे. याची संपूर्ण माहिती आपण या लेखातून पाहणार आहोत.
lakhpati didi yojana 2026 या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये महिलांची संख्या वाढवणे हा आहे. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत महिलांना बिना व्याज 5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. free interest loan
lakhpati didi yojana 2026 देशातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना चालल्या जातात. मागील काही वर्षांमध्ये केंद्र सरकारचे महिला सशक्तीकरणावर अधिक भर आहे.
lakhpati didi yojana या दृष्टीनेच केंद्र सरकारने 2023 मध्ये महिलांसाठी विविध योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ देशातील अनेक महिलांना झाला आहे.
या योजनेचा उद्देश म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये येण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करणे, यासाठी सरकारकडून महिलांना आर्थिक मदत केली जाते.
या योजनेअंतर्गत बिनव्याजी 5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते. जेणेकरून महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी मदत होते.
मात्र यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया करावी लागेल. याबरोबरच सरकारने निश्चित केलेल्या काही नियमांचे पालनही तुम्हाला करावे लागेल.
लखपती दीदी योजनेतून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसेच बचत गटाशी संबंधीत असलेल्या महिलांना सरकारकडून कर्जही उपलब्ध करून दिले जात आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत उत्तराखंड राज्य सरकार महिला बचत गटांना बिनव्याजी 5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे महिलांना लखपती बनवण्यास मदत होते.
महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक राज्य सरकारे देखील आर्थिक मदत करत आहेत. विशेष म्हणजे यात बचत गटामध्ये बँकवाली दीदी, अंगणवाडी वाली दीदी, आदींचा समावेश आहे.
लखपती दीदी योजनेअंतर्गत बचत गटाशी संबंधित जवळपास 10 कोटी महिलांना एलईडी बल्ब, ड्रोन दुरुस्ती, प्लंबिंग, आदी बाबतचे प्रशिक्षण देऊन महिलांना लखपती म्हणजेच स्वावलंबी बनवले जाईल.
15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी लखपती दीदी योजनेची घोषणा केली होती. लखपती दीदी ही योजना देशभरातील महिलांसाठी चालवल्या जात असलेल्या बचत गटाशी संबंधित आहे.
लखपती दीदी हा एक महिलांसाठी कौशल्य विकास उपक्रम असून या द्वारे देशभरातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लखपती दीदी योजनेस पात्र असलेल्या महिलांना स्वयं रोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. आर्थिक दृष्ट्या वंचित असलेली महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी ही योजना केंद्र सरकार राबवत आहे.
लखपती दीदी योजनेचा उद्देश
Lakhpati Didi Yojana Purpose
Lakhapati didi yojana 2026 देशभरातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 5 लाखाचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देत आहे. यामुळे महिलांना रोजगार मिळेल, त्यांच्या राहणीमानात सुधारणा होईल, त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून खऱ्या अर्थाने स्वावलंबी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत बचत गटाशी निगडीत असलेल्या महिला स्वतःचे उद्योग सुरू करत असून त्यांच्यासह काम करणाऱ्या इतर महिलांचीही आर्थिक स्थिति यामुळे सुधारत आहे.
देशभरात सध्या जवळपास 83,00,000 (त्रेयांशी लाख) बचत गट असून त्यांच्याशी 9 कोटीहून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. या सर्व बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी आणि महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवून पुढे आणण्यासाठी केंद्र सरकारने लखपती दीदी योजना सुरू केली.
बिनव्याजी 5 लाख रुपयांचे कर्ज
lakhpati didi yojana या योजनेअंतर्गत केंद्र सरकार महिलांना बिनव्याजी 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देते. यासाठी काही नियम बनवण्यात आली आहेत. ही योजना बचत गटाची संबंधित महिलांसाठी चालवली जाते.
lakhpati didi yojana या योजनेच्या माध्यमातून महिलांना आपले आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी मदत होते. याबरोबरच महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केले जाते. जेणेकरून त्या स्वतःचा उद्योग सुरू करू शकतील आणि आत्मनिर्भर होऊ शकतील.
या योजनेअंतर्गत स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम द्वारे महिलांना प्रशिक्षण दिले जाते आणि त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनजाजी 1 ते 5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेअंतर्गत सरकारने 3 कोटी महिलांना लखपती दीदी योजनेची जोडण्याचे लक्ष निश्चित केले आहे.
लखपती दीदी योजनेचे फायदे
Lakhpati Didi Yojana benefits
- देशभरातील महिलांना आपल्या पायावर उभे करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा लखपती दीदी योजनेचा उद्देश आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या महिला आणि बचत गटांना विविध प्रकारचे फायदे मिळतात.
- लखपती दीदी योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी मार्गदर्शकत्वे दिली जातात.
- यात व्यवसाय योजना, मार्केटिंग धोरणे, आणि बाजारात आपले उत्पादन कसे पोहचवावे आदिबाबत माहिती दिली जाते.
- लखपती दीदी योजना महिलांना आर्थिक सुरक्षितेसाठी कमी खर्चात विमा संरक्षण देते आणि आर्थिक माहितीही दिली जाते.
- या योजनेअंतर्गत सारकार एक कार्यशाळा आयोजित करते, या कार्यशाळेत बचत, गुंतवणूक, बजेट, आर्थिक पर्यायांशी संबंधित माहिती दिली जाते.
- या योजनेअंतर्गत महिलांना बचत करण्यासाठी त्यांच्या मनात उत्साह निर्माण केला जातो.
- लखपती दीदी योजनेने महिलांना कर्ज सुविधा दिली आहे. ज्या मुळे त्यांना त्यांचा व्यवसाय मुलांची शिक्षण किंवा इतर काही गरजा यासाठी मदत होते. एवढेच नाही तर काही सरकार त्यांना बिनव्याजी कर्ज सुविधा देखील देतात.
योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
lakhpati didi yojana Documents
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्न प्रमानपत्र
पत्त्याचा पुरावा
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
बँक खाते पासबूक
मोबाइल नंबर
पासपोर्ट फोटो
कोणाला मिळणार लाभ?
lakhpati didi yojana Benefisior
अर्जदार महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असावी.
महिला गावातील कोणत्याही स्वयं साहायता समूहाची (Self Help Group) सक्रिय सदस्य असावी.
Mahila Bachat Gat चे बँक खाते असावे.
महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे.
असा करा या योजनेसाठी अर्ज
lakhpati didi yojana Apply
लखपती दीदी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महिलांना बचत गट अंतर्गत व्यवसाय प्लॅन बनवावा लागेल. त्यांचा व्यवसाय प्लॅन निश्चित झाल्यानंतर बचत गटाद्वारे या योजनेअंतर्गत सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाईल. सरकारी अधिकारी या योजनेची चौकशी करेल आणि यानंतर अर्ज स्वीकारला जाईल आणि त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचे कर्ज संबंधित महिलेला दिले जाईल.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA