Lek Ladki Yojana 2026 In Marathi : लेक लाडकी योजनेतून मिळणार 1 लाख 1 हजार रुपये

Lek Ladki Yojana 2026 In Marathi : मुलगी 18 वर्षाची झाल्यावर मिळणार रक्कम

Lek Ladki Yojana 2026 In Marathi : सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते. काही योजना महिलांसाठी, तर काही योजना शेतकऱ्यांसाठी, काही योजना तरुण युवकांसाठी, तर काही योजना मुलींसाठी.

Lek Ladki Yojana आज आपण मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणारी एक योजना पाहणार आहोत या योजनेचे नाव आहे लेक लाडकी योजना.

Lek Ladki Yojana In Marathi अनेकदा मुलींना काही कारणामुळे त्यांचे अर्धवट शिक्षण सोडावे लागते, याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्यात यासाठी महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजनेत मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. ती कशी हे आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली. या योजनेतून आतापर्यंत अनेक मुलींना लाभ मिळालेला आहे. लेक लाडकी योजनेत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना फायदा होतो. मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षाची होईपर्यंत 1 लाख 1 हजार रुपये दिले जातात.

Lek Ladki Yojana 2026 मुलींना सक्षम करण्यासाठी आणि मुलींना स्वतःच्या पायावर उभा करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम हि लाभार्थी मुलींच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. मुलगी मोठी होईपर्यंत 5 हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते.

Maharashtra Government Lek Ladki Yojana लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी महाराष्ट्र जन्मलेली असावी. तसेच तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. या योजनेसाठी काही अटी व नियम निश्चित करण्यात आले आहेत त्यात तुम्ही पात्र असावे.

एका कुटुंबातील फक्त दोन मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात. फक्त दोन मुलींनाच या योजनेअंतर्गत पैसे मिळतील. योजनेसाठी अर्ज करताना मुलगी, पालकांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्माचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खात्याचे पासबुक असणे आवश्यक आहे, त्याचबरोबर दुसऱ्या आपत्याच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे असे प्रमाणपत्र असावे.

पाच टप्प्यांमध्ये मिळणार रक्कम

मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये दिली जातील.

मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार6000 रुपये

सहावीत गेल्यावर 7000 रुपये

अकरावीत गेल्यावर 8000 रुपये

तर मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75 हजार रुपये दिले जातात