LIC kanyadan policy information in marathi : काय आहे LIC ची कन्यादान पॉलिसी
LIC kanyadan policy : LIC पॉलिसी मुलींच्या शिक्षणासाठी त्याचबरोबर त्यांच्या लग्नाच्या खर्चासाठी नवनवीन योजना राबवत असते. मुलींचे शिक्षण पूर्ण व्हावं या उद्देशाने एलआयसी ने एक खास योजना आणली आहे या योजनेचे नाव आहे कन्यादान पॉलिसी.
या पॉलिसीत रोज 121 रुपयांची बचत तुम्हाला करावी लागेल. या पॉलिसीत बचत केल्याने 25 वर्षात फंडात 27 लाख रुपये जमा होतात. या खर्चातून तुम्ही तुमच्या मुलीचे पुढील शिक्षण किंवा तिच्या लग्नाचा खर्च आरामात करू शकता.
एलआयसी ही लोकप्रिय एन्डोमेंट पॉलिसी आहे. ही पॉलिसी मुली असलेल्या आई-वडिलांनी साठी सुरू केली आहे. चला तर मग जाणून घेऊया कन्यादान पॉलिसी ची संपूर्ण माहिती.
या पॉलिसीत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला 121 रुपयांची बचत दररोज करावी लागेल. म्हणजेच तुम्ही एका महिन्यात 3600 रुपयांची बचत कराल.
यामुळे मुलीच्या शिक्षणासाठी तुमच्याकडे लाखो रुपयांचा फंड तयार होईल. कन्यादान पॉलिसीचा मुदत कालावधी हा 25 वर्षांचा आहे. तुम्हाला या पॉलिसीसाठी 22 वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर शेवटच्या 3 वर्षात तुम्ही गुंतवणूक करायची नाही. पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर फंडात 27 लाख रुपये जमा होतील. या पैशातून मुलींचे शिक्षण त्याचबरोबर लग्नाचा खर्च तुम्हाला करता येणार आहे.
LIC Scheme पॉलिसी सुरू असताना अकस्मिकरित्या वडिलांचे निधन झाले तरीही कुटुंबावर आर्थिक ताण येणार नाही. मुलीच्या वडिलांचे निधन झाल्यावर एलआयसी कडून पुढील सर्व प्रीमियम हप्ते भरले जातात.
Saving Scheme अपघातात मुलीच्या वडिलांचा किंवा पॉलिसीधारकाचा मृत्यू झालास कुटुंबाला 10 लाख रुपये आर्थिक मदत मिळते. तर पॉलिसीच्या मुदत कालावधी संपल्यानंतर संपूर्ण रक्कम मुलीला मिळते.
पॉलिसी खरेदी करताना 18 ते 50 वयोगटातील व्यक्ती पात्र आहेत. तर मुलीचं वय कमीत कमी 1 वर्ष असणे आवश्यक आहे. या पॉलिसीमुळे अनेकांचे भविष्य उज्वल झाले आहे. तसेच तुम्ही देखील कमी उत्पन्नात मुलीचं भविष्य सुरक्षित करू शकता.