Smart Pension Plan : कमाल आहे एलआयसी ची ही योजना
LIC Smart Pension Plan : निवृत्तीनंतर नियमित इन्कम शोधणाऱ्यांसाठी एलआयसीने नवीन पेन्शन प्लॅन आणला आहे. यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो. या योजनेमध्ये एकदाच गुंतवणूक करून लाईफ टाईम पेन्शन मिळवली जाऊ शकते. चला जाणून घेऊया काय आहे एलआयसीची ही योजना..
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसी मुलं , वृद्ध किंवा महिला सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असते. विशेष करून निवृत्तीनंतर पेन्शन मिळण्याच्या योजनेमध्येही एलआयसीच्या अनेक योजना फायदेमंद आहेत. अशाच प्रकारची एक योजना म्हणजे LIC Smart Pension Plan ही योजना आयुष्यभर पेन्शन गॅरंटी देते.
गुंतवणुकीबरोबरच पेन्शन सुरू
LIC Smart Pension Plan in marathi एलआयसीचा हा पेन्शन प्लॅन मागील वर्षी 2025 मध्ये सुरू करण्यात आला आहे आणि यामध्ये गुंतवणुकीबरोबरच पेन्शनचा लाभ देण्याची पॉलिसी आहे. म्हणजेच निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न साठी हा पर्याय खूप चांगला आहे. एलआयसी स्मार्ट पेन्शन योजना एक इमीडियट युनिटी प्लॅन आहे यामध्ये पॉलिसी होल्डरला एकदाच प्रीमियम भरावा लागतो. त्यानंतर तात्काळ पेन्शन मिळणे सुरू होते आणि आयुष्यभर मिळत राहते.
बाजारातील No टेन्शन, रिस्क जीरो
लाईफ टाईम फिक्स्ड पेन्शनची गॅरंटी देणारी एलआयसीची ही पॉलिसी अशा लोकांना लक्षात ठेवून सुरू करण्यात आली आहे जे शेअर बाजार मध्ये होणाऱ्या चढउतारा पासून दूर राहतात आणि त्यांना रिक्स फ्री गुंतवणूक करायची आहे. त्यांच्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. या प्लॅनमध्ये एलआयसी नॉन लिंकडेड आणि नॉन participating plan आहे म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारची शेअर बाजार संबंधित जोखीम नाही आणि पेन्शन धारक पॉलिसी घेतात त्यावेळी फिक्स करण्यात येते जे आयुष्यभर मिळत राहते.
एलआयसीच्या या प्लॅनची वैशिष्ट्ये
- सिंगल आणि जॉईंट मध्ये पती-पत्नी सोबत प्लॅन घेऊ शकतात.
- मासिक, त्रिमासिक, सहामासिक किंवा वर्षाला पेन्शनचा पर्याय.
- पेन्शन वर प्रत्येक वर्षी तीन ते सहा टक्के दर दराने वाढण्याचा पर्याय.
- एमपी लएस ते रिटायर होणाऱ्यांसाठी खास बेनिफिट मिळतात.
- मृत्यू नंतर गुंतवणुकीची रक्कम वापस मिळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
- गुंतवणुकीसाठी निश्चित केलेली लिमिट
LIC Smart Pension Plan ची निश्चित खरेदी एक लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अधिक तर गुंतवणुकीसाठी कोणतीही लिमिट ठेवण्यात आलेली नाही म्हणजेच जेवढी जास्त गुंतवणूक तेवढी पेन्शन त्यांना मिळणार आहे. ही योजना विशेष करून निवृत्त कर्मचारी, प्रायव्हेट जॉब करणारे आणि वरिष्ठ नागरिकांसाठी उपयोगाची आहे ज्यांना नियमित इन्कम आवश्यक आहे, त्यांच्यासाठी आहे.
अशी मिळते 20000 रुपये पेन्शन
एलआयसीच्या स्मार्ट पेन्शन प्लॅन अंतर्गत मंथली पेन्शन कॅल्क्युलेशन केले तर जर एखाद्या गुंतवणूकदाराला स्कीम मध्ये महिन्याला वीस हजार रुपये पेन्शन पाहिजे असेल तर यासाठी तुम्हाला एकदाच 35 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या द्वारे वर्षाला 2.87 लाख रुपये किंवा महिन्याला 23 हजार 940 रुपये पेन्शन पक्की होईल. ती तुम्हाला महिन्याला मिळत राहील.