२४ व्या हप्त्यापूर्वी ही पाच कामे करा पूर्ण
PM Kisan पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाच्या २४ व्या हप्त्याची तारीख जाहीर होण्यापूर्वी ईकेवायसी, बँक खात्याशी आधार लिकिंगसारखी सर्व आवश्यक ५ काम पूर्ण करा. पीएम किसानचा २३ व्या हप्त्याची रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे हे काम सर्वांत आधी पूर्ण करून घ्या.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यामुध्ये ६ हजार रूपये दिले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन-दोन हजार करून तीन हप्त्यामध्ये जमा केली जाते. ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येते. त्यामुळे यात पारदर्शकता राहते.
PM Kisan पंतप्रधान किसान निधी योजनेचा २३ वा हप्ता २० जून २०२६ ला जमा करण्यात आला होता. आता शेतकऱ्यांना २४ व्या हप्त्याच्या तारखेची प्रतिक्षा आहे.मागील हप्त्यामध्ये ९.४४ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना १८,८८० कोटी रूपये डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर (डीबीटी)च्या माध्यमातून जमा करण्यात आले होते. मात्र अनेक शेतकऱ्यांचे नाव यापूर्वीच लाभार्थींच्या यादीतून कट झाले होते आणि काही शेतकऱ्यांच्या काही चुकांमुळे हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्या जमा होऊ शकली नाही. जर तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअतर्गंत पात्र असाल तर तत्काळ लाभार्थींच्या पोर्टलच्या स्टेटसमध्ये जाऊन पाहावे लागेल की तुमचे नाव तर कट झाले नाही न…
पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता कधी जमा होणार?
PM Kisan yojana पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार यासंदर्भात केंद्र सरकारकडून अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र तुम्हाला हे माहीतच असेल की सरकार पात्र शेतकऱ्यांना म्हणजेच लाभार्थींच्या यादी मधून हटवते जे नियमाचे पालन करत नाहीत.
किसान अधिकृत पोर्टल वर जाऊन www.pmkishan.gov.in आपले स्टेटस चेक करू शकतात की त्यांचे नाव लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आहे किंवा नाही जर तुमचे स्टेटस yes तर तुम्ही सर्व अटी आणि नियम पूर्ण केले आहेत असे समजावे आणि जर स्टेटस No असेल तर तुम्हाला सर्व नियम अटीचे पालन करावे लागेल.
पीएम किसान योजनेचे पाच आवश्यक कामे
Ekyc व्हेरिफिकेशन
ही केवायसी केली नसेल तर तुमचा हप्ता थांबेल यासाठी पीएम किसान पोर्टल वर जाऊन तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. जेणेकरून तुमचा 24 वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होऊ शकेल आणि कुठलीही अडचण येणार नाही.
लँड सीडींग नसणे
भूमी पडताळणीमुळे तुमचे नाव लाभार्थी यादीतून वगळले जाण्याची शक्यता असते. भूमी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तत्काळ तुमच्या तहसीलदाराशी किंवा पटवारी (तलाठी) यांच्याशी संपर्क साधून भूमी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
चुकीची माहिती जाणे
आधार कार्ड, बँक अकाउंट आदी मध्ये स्पेलिंग मॅच न होणे किंवा अन्य एखादी चूक होणे तेव्हाही तुमचा हप्ता थांबू शकतो. त्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टल वरचा आणि काही चूक झाली आहे का? याची खात्री करून घ्या. जेणेकरून हप्ता जमा होण्यास कुठलीही अडचण येणार नाही.
किसान आयडी
जर तुमच्याकडे किसान आयडी बनवला नसेल तर तुम्ही तत्काळ स्टेट ॲग्री स्टेट पोर्टलच्या माध्यमातून रजिस्टर प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि किसान आयडी काढून घ्या.
आधार – बँक खाते लिंक असणे आवश्यक
जर आतापर्यंत तुमचे आधार बँक खात्यांशी लिंक झाले नसेल तर तुम्ही तत्काळ बँकेत जाऊन तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या. जेणेकरून पुढील हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकेल.
पीएम किसान योजनेअंतर्गत सरकारकडून प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांना 6000 रुपये 3 टप्प्यांमध्ये दिले जातात. सरकार अशा शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून हटवते जे नियम व अटीचे पालन करत नाहीत जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचा पुढील हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा व्हावा तर तुम्ही तत्काळ केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या नियम व अटीचे पालन करून इ-केवीआईसी बँक आधार लिंक आदी प्रक्रिया करून घ्या.