Madhukar Pichad : वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास अखेरचा श्वास
Madhukar Pichad : भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्यावर गेल्या दीड महिन्यापासून नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोंबर ला ब्रेन स्ट्रोक चा झटका आला होता. मधुकर पिचड हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यामुळे भाजपचे वैयक्तिक मोठी हानी झाली आहे.
Madhukar Pichad मधुकर पिचड यांचं आदिवासी भागात मोठं काम आहे. मधुकर पिचड हे राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री होते. अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून 1980 ते 2004 या काळात 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. Bjp leader madhukar pichad passes away
2019 मध्ये त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपसाठी त्यांनी रात्र रात्र काम केले. मधुकर पिचड यांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणात सुरुवात झाली होती. त्यानंतर ते अनेक खात्याचे मंत्री राहिले होते. आदिवासी विकास खात्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
Bjp leader madhukar pichad passes away अकोले तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळावी याकरिता ते सतत प्रयत्नशील होते. त्याचबरोबर आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा यासाठी ते नेहमी खटपट करत होते. अकोले तालुक्यात अनेक छोट्या धरणांची निर्मिती मधुकर पिचड यांच्याच कार्यकाळात झाली होती. असे हे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आनंतात विलीन झाले आहेत.