Mahagauri Devi Information In Marathi 2024 दुर्गा देवीचे आठवे रूप महागौरी देवी मराठी माहिती
Mahagauri Devi Information In Marathi 2024 : नवरात्राच्या नऊ दिवसांची माहिती आपण पाहत आहोत. आज नवरात्रीच्या अष्टमीचा दिवस. नवरात्रीच्या अष्टमीला महागौरी देवीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी माता राणीचे आठवे रूप आहे. ही चैत्र नवरात्री आज म्हणजेच अष्टमी. एका पौराणिक कथेनुसार देवी महागौरीने भगवान शिवाच्या प्राप्तीसाठी भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली होती. त्यामुळे देवीचे शरीर काळे झाले. जेव्हा भगवान शिव देवी महागौरीला प्रगट झाले तेव्हा त्यांच्या कृपेने देवीचे शरीर पूर्वस्थितीत आले. त्यानंतर तिचे नाव गौरी ठेवण्यात आले. देवी महागौरीचा रंग हा पांढरा आहे. तिच्या अभिमानामुळे तिला महागौरील असे म्हणतात. देवी महागौरी ही अत्यंत फलदायी आहे. या देवीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन विकतात महागौरी आपल्या भक्तांचे संकट दूर करते.
Navratri 2024 : दुर्गा मातेच्या आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गा पूजेच्या आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. यामुळे भविष्यात भविष्यातील दुःख नाहीसे होते. या देवीचा रंग दुधाप्रमाणे पांढराशुभ्र आहे. या गोऱ्या पदाची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे. या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते. अष्ट वर्षा भवेत गौरी. तिचे वस्त्र आणि आभूषण देखील पांढऱ्या रंगाची आहेत. महागौरी ही चतुर्भुज आहे. वृषभ हे तिचे वाहन आहे. तिच्यावरील हातात अभय मुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूल आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर मुद्रा आहे. पार्वती रूपात या देवीने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता. या तपस्येमुळे महागौरीचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर भगवान शंकर प्रसन्न होऊन तिला गंगेच्या पवित्र पाण्याने अंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते. देवी महागौरीचे स्मरण पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे.
महागौरी पूजनाचे फायदे
Mahagauri Devi Information In Marathi 2024
Navratri 2024 दुर्गा मातेच्या महागौरी रूपाची पूजा रूपाची विधिवत पूजा केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात. जीवनसाथीची इच्छा पूर्ण होते. जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते.
महागौरीची पूजा करण्याची पद्धत
Mahagauri Devi Information In Marathi 2024
Navratri 2024 महागौरीची पूजा करण्यासाठी सकाळी स्नान केल्यानंतर पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे. देवीसमोर दिवा लावावा आणि तिचे ध्यान करावे. पूजेत देवीला पांढरे किंवा पिवळे फुल अर्पण करावे. नैवेद्य म्हणून पिवळी किंवा पांढरी मिठाई अर्पण करावी. त्यानंतर देवी महागौरीच्या मंत्राचा जप करावा.