Mahajyoti Free Tablet Yojana 2024 In Marathi : सरकार देत आहे विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट

Mahajyoti Free Tablet Yojana 2024 Information In Marathi : फ्री टॅबलेट योजना 2024 मराठी माहिती

Mahajyoti Free Tablet Yojana केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते. महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवत असते. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण अशाच एका योजनेची माहिती पाहणार आहोत जी योजना सरकारने विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे. राज्यातील 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आहे ती म्हणजे फ्री टॅबलेट योजना.

महाराष्ट्र ग्रामीण आणि शहरी भागातील 10 वी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट वाटप करण्यात येणार आहे. यासोबतच दर दिवशी 6 जीबी इंटरनेट देखील या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.

Mahajyoti Free Tablet Yojana

Mahajyoti Free Tablet Yojana महाराष्ट्र राज्यात बहुसंख्य कुटुंबे आहेत जे की दारिद्र्य रेषेखालील त्यांचे जीवन जगतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही हालाखीची असते. त्यामुळे ते त्यांच्या मुलांना व्यवस्थित शिक्षण देऊ शकत नाहीत आपल्या मुलाला कसेबसे दहावीपर्यंत शिक्षण देतात कारण की पुढील शिक्षणाचा उच्च शिक्षणाचा खर्च त्यांना न परवडणारा असतो. यामुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची उत्सुकता असून देखील त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती पाहून त्यांना शिक्षण घेता येत नाही यामुळे असे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. या सर्व गोष्टींचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राज्यातील 10 वी पास नंतर जे विद्यार्थी मेडिकल, इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी MHCET / IEL / NEET या परीक्षांच्या पूर्वतयारी साठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण क्लासेस करता यावेत यासाठी फ्री टॅबलेट योजना सरकारने सुरू केली आहे. या सोबतच प्रति दिवस 6 जीबी इंटरनेट सुविधा देखील देण्यात येणार आहे.

Maharashtra Free Tablet Yojana सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. त्यामुळे शिक्षण पद्धती ही देखील ऑनलाइन स्वरूपातच उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना टॅबलेटची आवश्यकता ही असते परंतु आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांकडे टॅबलेट घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतात त्यामुळे त्यांना ऑनलाईन पुस्तकांचा तसे शिक्षण उपयोगी इतर गोष्टींचा लाभ घेणे अशक्य होते.

फ्री टॅबलेट योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना पुढील इंजिनीयर, मेडिकल च्या शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी ऑनलाईन क्लास करण्यासाठी मोफत टॅबलेट उपलब्ध करून देणे. जेणेकरून विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील.

ठळक मुद्दे

फ्री टॅबलेट योजना 2024 मराठी माहिती

Mahajyoti Free Tablet Yojana 2024 Information In Marathi

फ्री टॅबलेट योजनेची थोडक्यात माहिती

Maharashtra Free Tablet Yojana In Short

महाज्योती फ्री टॅबलेट योजना उद्देश

Maharashtra Free Tablet Yojana Purpose

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची वैशिष्ट्ये

Maharashtra Free Tablet Yojana Features

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचे फायदे

Maharashtra Free Tablet Yojana Benefits

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचे लाभार्थी

Mahajyoti Free Tablet Yojana Beneficiors

फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत लाभ

Mahajyoti Free Tablet Yojana Benefits

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची पात्रता

Maharashtra Free Tablet Yojana Eligibility

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या अटी

Maharashtra Free Tablet Yojana Terms And Conditions

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची आवश्यक कागदपत्रे

Maharashtra Free Tablet Yojana Documents

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची अर्ज प्रक्रिया

Maharashtra Free Tablet Yojana Online Application Process

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

फ्री टॅबलेट योजनेची थोडक्यात माहिती

Maharashtra Free Tablet Yojana In Short

योजनेचे नावमहाज्योती फ्री टॅबलेट योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
विभागशिक्षण विभाग
लाभार्थी10 वी नंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी
लाभमोफत टॅबलेट तसेच प्रतिदिवस 6 जीबी इंटरनेट सुविधा
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://mahajyoti.org.in/
Mahajyoti Free Tablet Yojana

महाज्योती फ्री टॅबलेट योजना उद्देश

Maharashtra Free Tablet Yojana Purpose

  • महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तसेच आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना 10 वी पास झाल्यानंतर पुढील इंजिनिअरिंग तसेच मेडिकल शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास करण्यासाठी मोफत टॅबलेट उपलब्ध करून देणे.
  • या योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी इंजिनीयरिंग व मेडिकल शिक्षणासाठी प्रोत्साहित होतील.
  • या योजनेमुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधरेल.
  • या योजनेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होईल.
  • फ्री टॅबलेट योजनेमुळे Maharashtra Free Tablet Yojana विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठबळ मिळेल.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी टॅबलेट विकत घेण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही किंवा कोणाजवळ पैसे उधार मागण्याची आवश्यकता नाही.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची वैशिष्ट्ये

Maharashtra Free Tablet Yojana Features

  • महाराष्ट्रातील इयत्ता 10 वी पास विद्यार्थ्यांना ऑनलाइन कोचिंग क्लासेस करता यावे यासाठी महाज्योती फ्री टॅबलेट योजना सुरू करण्यात आली आहे.
  • इयत्ता 10 वी उत्तीर्ण होऊन ज्या विद्यार्थ्यांनी 11 वी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांचा आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सोप्या पद्धतीने ठेवली असल्या मुळे अर्जदार विद्यार्थ्यांना अर्ज करताना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
  • फ्री टॅबलेट योजनेची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने केली असल्यामुळे विद्यार्थ्यांची घरी बसून मोबाईलच्या मदतीने या योजनेसाठी अर्ज करू शकतो. यामुळे अर्जदार अर्ज केल्यापासून लाभ मिळेल पर्यंत अर्जाची स्थिती वेळोवेळी मोबाईलवर पाहू शकतो.
  • फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत राज्यातील 30 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट वाटप केले जाणार आहे.
  • यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांना कुठल्याही शुल्क भरायची आवश्यकता नाही.
  • या योजनेचा लाभ हा शहरी तसेच ग्रामीण या दोन्ही भागातील विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
  • या योजनेचा लाभ राज्यातील मुलांना व मुलींना या दोघांनाही घेता येईल.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचे फायदे

Maharashtra Free Tablet Yojana Benefits

  • टॅबलेट मध्ये शिक्षण उपयोगी पुस्तके अपलोड करून दिली जातात.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी सरकारमार्फत मोफत टॅबलेट उपलब्ध करून दिले जाईल.
  • या योजनेअंतर्गत ऑनलाइन शिक्षण घेताना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी प्रति दिवस 6 जीबी इंटरनेट सुविधा देखील दिली जाणार आहे.
  • Free Tablet Yojana योजनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठबळ मिळेल.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाला त्यांच्या मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी टॅबलेट विकत घेण्यासाठी पैशासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
  • या योजनेमुळे राज्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होईल.
  • या योजनेमुळे विद्यार्थी डिजिटल क्षेत्राशी जोडला जाईल.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचे लाभार्थी

Mahajyoti Free Tablet Yojana Beneficiors

फ्री टॅबलेट योजनेसाठी Free Tablet Yojana महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील OBC, VJNT, SBC या वर्गातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना घेता येईल. तसेच या वर्गातील जे विद्यार्थी इयत्ता 10 वी उत्तीर्ण होऊन 11 वी मध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा.

Mahajyoti Free Tablet Yojana

फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत लाभ

Mahajyoti Free Tablet Yojana Benefits

शहरी भागातील इयत्ता 10 वी विद्यार्थी – 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण असावा

ग्रामीण भागातील इयत्ता 10 वी विद्यार्थी – 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण असावा

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची पात्रता

Maharashtra Free Tablet Yojana Eligibility

अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा.

अर्जदार विद्यार्थी त्याने 10 वी उत्तीर्ण होऊन 11 वी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

शबरी घरकुल योजना 

जलयुक्त शिवार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

मागेल त्याला विहीर योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

नमो ड्रोन दीदी योजना

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या अटी

Maharashtra Free Tablet Yojana Terms And Conditions

  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेता येईल.
  • महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थ्यांना ही योजना लागू नाही.
  • अर्जदार विद्यार्थी हा 10 वी उत्तीर्ण होऊन 11 वी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
  • ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला 10 वी मध्ये 60% किंवा त्यापेक्षा अधिक गुण असावेत.
  • शहरी भागातील विद्यार्थ्याला इयत्ता 10 वी मध्ये 70 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असावे.
  • अर्जदार विद्यार्थ्यांनी शासनाच्या इतर योजनेअंतर्गत टॅबलेटचा लाभ घेतलेला असेल तर त्या विद्यार्थ्याला या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही.
  • जर एखाद्या विद्यार्थ्याने त्याचे शिक्षण अर्धवट सोडले तर अशा विद्यार्थ्यांकडून टॅबलेट परत घेतला जाईन.
  • सरकारकडून जो मोफत टॅबलेट भेटणार आहे त्याची 1 वर्षाची वॉरंटी दिली जाणार आहे. परंतु एक वर्षानंतर टॅबलेट मध्ये काही अडचण आली तर त्याची दुरुस्ती करणे ही लाभार्थी विद्यार्थ्यांची जबाबदारी असेल.
  • टॅबलेट सोबत विद्यार्थ्याला 6 जीबी इंटरनेट प्रति दिवसाला उपलब्ध करून दिले जाईल.
  • या व्यतिरिक्त कुठलेही सबस्क्रीप्शन उपलब्ध करून दिले जाणार नाही.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची आवश्यक कागदपत्रे

Maharashtra Free Tablet Yojana Documents

आधार कार्ड

रेशन कार्ड

रहिवाशी प्रमाणपत्र

इयत्ता दहावी उत्तीर्ण मार्कशीट

इयत्ता अकरावी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचे प्रवेश पत्र

जातीचे प्रमाणपत्र

शाळा सोडल्याचा दाखला

नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट

बँक खाते पासबुक

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

पासपोर्ट आकाराचा फोटो

Mahajyoti Free Tablet Yojana

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची अर्ज प्रक्रिया

Maharashtra Free Tablet Yojana Online Application Process

फ्री टॅबलेट योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Upcoming Event खाली MHCET / JEE / NEET नोंदणी खाली Read More बटन दिसेल या पर्यावर क्लिक करा

त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला Click Here For Registration या पर्यायावर क्लिक करावे लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरा

त्यानंतर त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडा त्यानंतर अपलोड या पर्यायावर क्लिक करा

त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती भरा

तुम्ही संपूर्ण माहिती अचूक भरली आहे ना याची खात्री करून घ्या

त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही फ्री टॅबलेट योजनेचा अर्ज करू या योजनेचा लाभ घेऊ शकता

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: फ्री टॅबलेट योजना Free Tablet Yojana कोणासाठी आहे?

उत्तर: महाज्योती फ्री टॅबलेट योजना Mahajyoti Free Tablet Yojana ही महाराष्ट्र राज्यासाठी लागू करण्यात आलेली योजना आहे.

प्रश्न: महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचे Free Tablet Yojana लाभार्थी कोण?

उत्तर: महाराष्ट्रात राज्यातील इयत्ता 10 वी मध्ये उत्तीर्ण होऊन 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होतो.

प्रश्न: महाज्योती फ्री टॅबलेट योजने Free Tablet Yojana अंतर्गत लाभ काय आहे?

उत्तर: महाज्योती फ्री टॅबलेट योजना अंतर्गत Mahajyoti Free Tablet Yojana लाभार्थ्याला मोफत टॅबलेट दिला जातो. त्याचबरोबर प्रति दिवस 6 जीबी इंटरनेट सुविधा देखील मिळते.

प्रश्न: महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा Free Tablet Yojana अर्ज कसा करावा?

उत्तर: महाज्योती टॅबलेट योजनेचा Mahajyoti Free Tablet Yojana अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA