Ramai Awas Yojana 2024 Information In Marathi : रमाई आवास योजना 2024 मराठी माहिती
Ramai Awas Yojana 2024 : महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना मोफत घरे देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने रमाई घरकुल योजना सुरू केलेली आहे.
Ramai Awas Yojana महाराष्ट्रातील ज्या नागरिकाकडे राहायला स्वतःचे घर नाही ते कच्च्या पडक्या घरात राहतात अशा सर्व कुटुंबांना या योजनेच्या मार्फत मोफत घराचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध या प्रवर्गातील नागरिकांना स्वतःचे घर उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पक्के घर बांधण्यासाठी सरकार आर्थिक मदत करते.
Ramai Awas Yojana देशभरात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याबरोबरच राज्यातही ही संख्या अधिक आहे. आजही राज्यातील अनेक गरीब नागरिकांकडे स्वतःचे हक्काचे घर राहण्यासाठी नाही ते निवारा म्हणून झोपडी पत्राच्या घराचा आधार घेतात किंवा रस्त्यावर झोपडी बांधून राहतात. कारण आर्थिक दृष्ट्या ते दुर्बळ असल्यामुळे स्वतःचे घर बांधू शकत नाही. त्यामुळे त्यांना स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकार मदत करत आहे. स्वतःचे घर नसल्यामुळे त्यांना मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागतो आदी सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने गरीब व दुर्बल घटकातील आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्याचा उद्देशाने आणि त्यांना पक्के घर देण्याच्या उद्देशाने रमाई घरकुल योजनेची Ramai Gharkul Yojana सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून त्यांना पक्के घर देण्यात येत आहे.
Ramai Gharkul Yojana माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा ही या तीन प्रमुख गरजा आहेत. यापैकी कुठलीही एक नसेल तर मोठ्या अडचणीचा सामना नागरिकांना करावा लागतो. निवारा हा माणसासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना आपल्या स्वतःचे घर नसते. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार सतत गरीब नागरिकांसाठी त्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत असते.
Ramai Gharkul Yojana योजनेच्या माध्यमातून त्यांचा विकास घडवणे हा सरकारचा उद्देश असतो. या योजनांचा अनेक गरीब कुटुंबांना फायदा होऊन होत आहे. गरिबांचे जीवनमान सुधारत आहे. त्यांच्या प्रगतीत त्यांचे घर महत्त्वाचे ठरत आहे. देशातील अनेक नागरिकांकडे या तीन मूलभूत गरजा ही नाहीत त्यामुळे त्यांना घर आहे पण ते कच्चे घर आहे. ज्यातून त्यांचे पाऊस ऊन पासून संरक्षण होत नाही. त्यामुळे यांना अनेक कठीण समस्येला तोंड द्यावे लागते.
Ramai Awas Gharkul Yojana महाराष्ट्र सरकारने त्यामुळेच अशा सर्व नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी रमाई आवास योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातून लोकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळत आहे आणि त्यांचा निवाऱ्याचा प्रश्नही काही प्रमाणात का होईना सुटत आहे. रमाई आवास योजना ही एक अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वकांक्षी राज्य पुरस्कृति योजना आहे.
आज आपण या लेखाच्या माध्यमातून Ramai Awas Yojana Maharashtra रमाई आवास योजना म्हणजे काय?, रमाई आवास योजनेची वैशिष्ट्ये?, या योजनेचा कोणाला मिळतो लाभ?, या योजनेसाठी कोण पात्र आहे?, रमाई आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा आदी सर्व प्रश्नांची उत्तरे आज पाहणार आहोत यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचावे लागेल.
ठळक मुद्दे :
रमाई आवास योजना 2024 मराठी माहिती
Ramai Awas Yojana 2024 Information In Marathi
रमाई घरकुल योजनेची थोडक्यात माहिती
Ramai Awas Yojana Maharashtra In Short
रमाई आवास योजनेचे उद्दिष्ट
Ramai Awas Yojana Maharashtra Purpose
रमाई घरकुल योजनेचे वैशिष्ट्ये
Ramai Gharkul Yojana Features
रमाई घरकुल योजनेचे फायदे
Ramai Awas Yojana Benefits
रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी
Ramai Gharkul Yojana Beneficiors
रमाई योजनेच्या माध्यमातून दिली जाणारे आर्थिक मदत
Ramai Awas Yojana 2024
रमाई घरकुल योजनेची कार्यपद्धती
Ramai Awas Yojana Maharashtra
रमाई घरकुल योजने साठीची पात्रता
Ramai Awas Yojana Eligibility
रमाई घरकुल योजनेचे नियम व अटी
Ramai Awas Yojana Terms And Conditions
घरकुल योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा प्राधान्यक्रम
Ramai Awas Gharkul Yojana
रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून अनुदान वितरण प्रक्रिया
Ramai Awas Yojana 2024
रमाई घरकुल योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
Ramai Awas Yojana Documents
रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून अर्ज रद्द होण्याची कारणे
Ramai Awas Yojana Maharashtra
रमाई घरकुल योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Ramai Awas Yojana online registration
रमाई घरकुल योजनेचा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
Ramai Awas Yojana offline Apply
रमाई घरकुल योजनेची यादी कशी पहावी
Ramai Awas Yojana list 2024
FAQ’s वारंवार विचारली जाणारे प्रश्न
रमाई घरकुल योजनेची थोडक्यात माहिती
Ramai Awas Yojana Maharashtra In Short
योजनेचे नाव | रमाई घरकुल योजना |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
विभाग | ग्रामविकास व गृहनिर्माण विभाग |
लाभार्थी कोण | महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, जमातीतील नागरिक |
उद्देश काय | गरिबांना घरे उपलब्ध करून देणे |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://pmayg.nic.in |
रमाई आवास योजनेचे उद्दिष्ट
Ramai Awas Yojana Maharashtra Purpose
- महाराष्ट्रातील नागरिकांकडे राहण्यासाठी घर नाही त्यामुळे ते इकडे तिकडे भटकत राहतात व रस्त्याच्या कडेला झोपडी बांधून राहतात अशा कुटुंबांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत सरकार घर देत आहे.
- आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांचा सामाजिक आर्थिक विकास करणे.
- रमाई योजनेचे माध्यमातून घेऊन घर देऊन आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारणे.
- रमाई घरकुल योजनेच्या Ramai Awas Yojana माध्यमातून घर देऊन गरीब कुटुंबाला स्वतःच्या हक्काचे पक्के घर बांधून देणे.
- गरीब कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडू नये म्हणून सरकारने रमाई योजनेच्या माध्यमातून गरिबांना घर उपलब्ध करून दिले आहेत.
- राज्यातील गरीब नागरिकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
रमाई घरकुल योजनेचे वैशिष्ट्ये
Ramai Gharkul Yojana Features
- महाराष्ट्र सरकारने आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबासाठी रमाई घरकुल योजना ही एक महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे.
- रमाई घरकुल योजना ही RAY (Ramai Gharkul Yojana) नावाने ओळखले जाते.
- ही योजना सरकारच्या गरीब निर्मूलन मंत्रालयाने सुरू केलेली एक प्रमुख गृहनिर्माण योजना आहे.
- या योजनेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे पक्की घरे नाहीयेत अशा कुटुंबांना पक्की घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे.
- रमाई आवास योजना Ramai Awas Yojana ही महिलांसाठी घरकुल योजना या नावाने चालवली जाते.
- रमाई योजनेच्या माध्यमातून शहरी भागासाठी घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते, तर या योजनेच्या माध्यमातून डोंगराळ भागासाठी 1 लाख 42 हजार रुपये अनुदान देण्यात येते. तसेच स्वच्छालय बांधण्यासाठी स्वच्छालय अनुदान योजनेच्या माध्यमातून 1200 रुपये देण्याची ही तरतूद या योजनेत करण्यात आली आहे.
- रमाई घरकुल योजनेसाठी Ramai Awas Yojana नरेगा योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यास 90 दिवसाचा रोजगार उपलब्ध करून केला जातो. त्यासाठी लाभार्थ्यास दरमहा 18 हजार रुपये दिले जातात.
- रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बौद्ध जातींच्या प्रवर्गांमधील जे अपंग लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील नाहीत व त्यांच्या अपंगत्व 40% पेक्षा अधिक आहे व ज्यांचे आर्थिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे असे अपंग लाभार्थी योजनेच्या इतर अटीपूर्ण करत असल्यास त्यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ दिला जातो.
- ज्या नागरिकांना पात्र असूनही स्वतःच्या मालकीची जागा नसल्यामुळे रमाई आवास घरकुल योजनेचा Ramai Awas Gharkul Yojana लाभ घेणे अशक्य होते त्यांच्यासाठी केंद्र सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या माध्यमातून जागा खरेदीसाठी 50 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. या माध्यमातून लाभार्थ्यांचा जागा घेऊन त्या जागेत रमाई आवास घरकुल योजनेतून स्वतःचे घर बांधता येईल.
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
रमाई घरकुल योजनेचे फायदे
Ramai Awas Yojana Benefits
- राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, गरीब व मागासवर्गीय नागरिकांना रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून घर मिळत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे.
- या योजनेच्या माध्यमातून बेघरांना स्वतःचे हक्काचे पक्के घर देण्यात येते.
- राज्यातील सर्व बीपीएल कार्डधारक कुटुंब या योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ शकतात.
- आपल्या हक्काचे पक्के घर मिळाल्यामुळे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे.
- राज्यातील गरीब कुटुंबाचा सामाजिक, आर्थिक विकास करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरतं दिसत आहे. कारण या योजनेमुळे त्यांना स्वतःच्या घर बांधण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही किंवा त्यांना कर्ज घेऊन घर बांधण्याची ही वेळ त्यांच्यावर येत नाही कारण रमाई योजनेच्या माध्यमातून त्यांना घर बांधण्यासाठी संपूर्ण आर्थिक मदत करण्यात येते.
रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी
Ramai Gharkul Yojana Beneficiors
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिक रमाई घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- जे व्यक्ती आर्थिक दृष्ट्या दुर्बल असून स्वतःचे घर बांधण्यासाठी समर्थ आहेत अशा व्यक्तींना Ramai Awas Yojana योजनेच्या माध्यमातून मदत केली जाते.
- रमाई योजनेचा लाभ केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्ती घेऊ शकतात.
- पण एक झोपड्या मध्ये राहणारे कुटुंब ही या योजनेसाठी पात्र आहे.
रमाई योजनेच्या माध्यमातून दिली जाणारे आर्थिक मदत
Ramai Awas Yojana 2024
- सर्वसाधारण क्षेत्रासाठी घर बांधण्यासाठी 1 लाख 30 हजार रुपयांच्या अनुदान.
- शहरी भागासाठी घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपयांची आर्थिक मदत.
- डोंगराळ भागासाठी घर बांधण्यासाठी 1 लाख 42 हजार रुपयाची मदत.
- या योजनेबरोबरच स्वच्छालय बांधण्यासाठी 12000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते.
- रमाई घरकुल योजनेसाठी ची निवड सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011 च्या नुसार पारदर्शक पद्धतीने केली जाते.
राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बौद्ध प्रवर्गातील व्यक्ती ज्यांच्याकडे स्वतःच्या हक्काचे घर नाही अशा लोकांना या योजनेचा लाभ दिला जातो. रमाई घरकुल योजनेची निवड करताना ग्रामसभा पंचायत समिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत मंजुरी देण्यात येते. शहरी भागात महानगरपालिका, नगरपालिका यांच्या मार्फत घरकुल योजनेला मंजूर देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बुद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांना 3 टक्के घरकुल देणे बंधनकारक आहे, घरकुल योजनेसाठी जमा झालेल्या एकूण अर्जांमधून लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
रमाई घरकुल योजनेची कार्यपद्धती
Ramai Awas Yojana Maharashtra
- रमाई योजनेसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांची ज्या कच्चा व पडीक घरात राहतो त्या घराचे जिओ टॅपिंग करण्यात येते. त्या घराचे अधिकाऱ्यामार्फत सर्वेक्षण केले जाते व एक फोटो घेतला जातो.
- घरकुल योजनेचा लाभार्थी जर ग्रामीण भागात राहत असेल तर अशा लाभार्थ्याचे जॉब कार्ड मॅपिंग करण्यात येते. याबरोबरच लाभार्थ्यांची बँक खाते PFMS प्रणालीकडे सलग्न करण्यात येते कारण यामुळे या योजनेअंतर्गत दिला जाणारी रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
- रमाई घरकुल योजनेच्या Ramai Awas Yojana माध्यमातून बांधकाम जसे जसे पूर्ण होते तसे तसे लाभार्थ्यास पुढील हप्त्याची रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाल्यानंतर बांधकाम अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन कामावर देखील ठेवली जाते आता नवीन बदलानुसार बांधकाम पूर्ण झाल्यावर लाभार्थी कुटुंबास गॅस शेगडी सुद्धा दिली जाते.
रमाई घरकुल योजने साठीची पात्रता
Ramai Awas Yojana Eligibility
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
तो दारिद्र्यरेषेखालील असणेही गरजेचे आहे.
लाभार्थी अर्जदार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे किंवा आर्थिक मागास असणे गरजेचे आहे.
रमाई घरकुल योजनेचे नियम व अटी
Ramai Awas Yojana Terms And Conditions
- रमाई घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
- त्याच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- राज्य बाहेरील व्यक्तींना रमाई घरकुल योजनेचा लाभ दिला जात नाही.
- अर्ज करणारी व्यक्ती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बौद्ध प्रवर्गात मोडणारी असावी. त्यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- अर्जदार ग्रामीण भागात राहत असल्यास 1 लाख 20 हजार रुपये पर्यंतच्या आर्थिक उत्पन्न दाखला त्याच्याकडे असणे आवश्यक आहे.
- जर अर्जदार नगरपरिषद क्षेत्रात राहत असल्यास त्याचे उत्पन्न 1.5 लाखापर्यंत असावे.
- अर्जदार महानगरपालिका क्षेत्रात मुंबई सारख्या क्षेत्रात राहत असल्यास 2 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न दाखला असणे आवश्यक आहे.
- अर्जदार बेघर असावा किंवा त्याच्याकडे पडक्या स्वरूपाचे घर किंवा झोपडी असावी.
- अर्जदाराने यापूर्वी सरकारच्या कोणत्याही घरकुल आवास योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून घर मिळण्यासाठी अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नसावा.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना
प्रधानमंत्री किसान मानधन योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजना
घरकुल योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा प्राधान्यक्रम
Ramai Awas Gharkul Yojana
जातीय दंगलीमुळे घराचे नुकसान झाले असल्यास (आगीमुळे किंवा अन्नतोडफळीमुळे घराचे नुकसान)
ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पीडित अनुसूचित जाती च्या व्यक्ती पात्र आहेत.
भूकंप किंवा पुरात घराचे नुकसान झालेले कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो. घरात कुणीही कमावत नसलेल्या अशा विधवा महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून घराची निर्धारित क्षेत्रफळ निश्चित केले जाते.
या योजनेमार्फत दिले जाणारे अनुदान ग्रामीण भागासाठी घराचे क्षेत्रफळ तर चटई क्षेत्र 269 चौरस फूट करण्यात आले आहे व शहरी भागासाठी घराचे क्षेत्रफळ 323 चौरस फूट करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज व्यक्तीच्या मालकीची जागा असणे आवश्यक आहे.
या योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात लाभार्थ्यास रक्कम दिली जाते.
रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून अनुदान वितरण प्रक्रिया
Ramai Awas Yojana 2024
हप्ता पहिला- रमाईयोजनेच्या माध्यमातून बांधकाम सुरू करताना लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट घरकुलाची 50% अनुदान जमा करण्यात येते.
हप्ता दुसरा- बांधकामासाठी पहिल्या हप्त्यात दिलेला 50 टक्के निधीचा उपयोग केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर अनुदानाची 40% रक्कम पुन्हा लाभार्थ्याच्या बँक खाते मध्ये जमा करण्यात येते.
हप्ता तिसरा- बांधकाम पूर्ण झाल्यानंतर घराचा ताबा घेताना आणि सक्षम प्राधिकार्यांनी घराची काम पूर्णतः दाखला दिल्यानंतर उर्वरित 10 टक्के अनुदान लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते.
रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे अनुदान गृहनिर्माण समिति अध्यक्ष आणि सदस्य सचिव यांच्या सहीने विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या मदतीने देण्यात येते.
रमाई घरकुल योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
Ramai Awas Yojana Documents
आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदान कार्ड
जातीचे प्रमाणपत्र
बीपीएल प्रमाणपत्र
अर्जदार विधवा असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
घर कर भरल्याची पावती
अर्जदाराच्या अलीकडील काळातील पासपोर्ट फोटो
घर मांडण्याचा जागेत सहहिस्सेदार असल्यास त्याचे संमती पत्र
जन्म दाखला किंवा जन्मतारीख नमूद केलेला शाळेचा दाखला
यापूर्वी सरकारच्या कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचे हमीपत्र
अर्ज पूरग्रस्त असल्यास त्याचे प्रमाणपत्र
अर्जदार पीडित असल्यास त्याचे प्रमाणपत्र
चालू वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र
पंधरा वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
राशन कार्ड
शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र
अर्जदाराचे बँकेत जॉइंट अकाउंट असणे आवश्यक आहे (नवरा-बायकोचे)
रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून अर्ज रद्द होण्याची कारणे
Ramai Awas Yojana Maharashtra
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी नसल्यास अर्ज रद्द करण्यात येतो.
अर्जदाराने अर्जावर चुकीची किंवा खोटी माहिती भरून दिल्यास अर्ज रद्द करण्यात येतो.
अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर अर्ज केल्यास रद्द केल्या जातो.
रमाई घरकुल योजनेसाठी अर्ज करणारे व्यक्ती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध प्रवर्गातील नसल्यास अर्ज रद्द करण्यात येतो.
अर्जदाराचे उत्पन्न सरकारने निश्चित केलेल्या उत्पन्नापेक्षा अधिक आढळल्यास अर्ज रद्द केला जातो.
अर्जदार व्यक्तीकडे पक्के घर असल्यासही अर्ज रद्द करण्यात येतो.
सदर अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाने यापूर्वी सरकारच्या कुठल्याही आवास योजनेचा लाभ घेतला असल्यासही अर्ज रद्द करण्यात येतो.
रमाई घरकुल योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Ramai Awas Yojana online registration
रमाई घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही रमाई घरकुल योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे नगरपरिषद, नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत निवडायचे आहे
त्यानंतर तुम्हाला रमाई घरकुल योजनेवर क्लिक करायचे आहे
त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरायची आहे त्यामध्ये नाव, लिंग, तुमची जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आदी महत्त्वाची माहिती भरून एकदा अर्ज पुन्हा तपासून घ्या
सर्व माहिती तपासल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला लॉगिन वर क्लिक करायचे आहे तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यावर तुमच्या समोर रमाई घरकुल योजना चा अर्ज उघडेल
त्यामध्ये तुम्हाला विचारलेली माहिती पुन्हा भरायची आहे
त्यासोबत विचारली सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आणि सबमिट पर्यावर क्लिक करून अर्ज सबमिट करायचा आहे
अशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करून तुम्ही रमाई घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता
रमाई घरकुल योजनेचा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
Ramai Awas Yojana offline Apply
रमाईआवासयोजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने आपल्या भागातील ग्रामपंचायत कार्यालय, नगरपालिका, महानगरपालिका कार्यालयात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा
अर्ज घेतल्यानंतर अर्जावर विचारलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून त्यासोबत लागणारी सर्व कागदपत्रे अर्ज सोबत जोडून अर्ज संबंधित कार्यालयात जमा करावा
अशा पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने ही रमाई घरकुल योजनेसाठी अर्ज करता येतो
रमाई घरकुल योजनेची यादी कशी पहावी
Ramai Awas Yojana list 2024
रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्याची यादी पाहण्यासाठी सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्यानंतर Awasoft या पर्यायावर मध्ये रिपोर्ट हा पर्याय निवडावा लागेल
त्यानंतर physical progress report या पर्यायांमध्ये दुसरा पर्याय house progress against the target financial year हे आपले निवडावा
त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला असलेले वर्ष निवडावे लागेल
त्यानंतर तुमचे राज्य निवडा त्यानंतर तुमचा जिल्हा, गाव याची निवड करा
त्यानंतर Captcha भरून सबमिट पर्यावर क्लिक करा
तुमच्यासमोर या योजनेअंतर्गत लाभार्थी यादी दिसेल ही यादी तुम्ही पीडीएफ स्वरूपात डाउनलोड ही करू शकता आणि आपलं नाव शोधू शकता
FAQ’s वारंवार विचारली जाणारे प्रश्न
प्रश्न: रमाई आवास योजना कोणी सुरू केली?
उत्तर: रमाई घरकुल योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
प्रश्न: महाराष्ट्र सरकारने घरकुल योजना का सुरू केली?
उत्तर: राज्यातील अनुसूचित जाती, जमाती, नवबौद्ध प्रवृत्ती नागरिकांना घरकुल सुविधा उपयोग करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने रमाई घरकुल योजना सुरू केली आहे.
प्रश्न: रमाई घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा?
उत्तर: महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या रमाई घरकुल योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.
प्रश्न: राज्यातील कोणत्या नागरिकाला रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळेल?
उत्तर: महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध वर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना या घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल.
प्रश्न: रमाई घरकुल योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्देश काय?
उत्तर: राज्यातील मागासवर्गीय नागरिकांच्या विकासासाठी व त्यांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी ही घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून त्यांना राहण्यासाठी पक्की घरे उपलब्ध करून दिले जातात.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA