Maharashtra Govt Promised Rs 3000 Some Women Got Only 500 In Ladki Bahin Yojana : 3000 सांगून 1500 रुपये जमा, महिला नाराज

Ladki Bahin Yojana News Update In Marathi : 3000 चे आश्वासन काही महिलांच्या खात्यात फक्त 500 रुपये

Maharashtra Govt Promised Rs 3000 Some Women Got Only 500 In Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ८ मार्च महिला दिनानिमित्त महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात आले. हा फेब्रुवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस सरकार च्या पहिल्या हप्ता जमा झाल्यानंतर मोठे वाद निर्माण झाले आहेत.

Ladki Bahin Yojana News Update संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे संजय राऊत म्हणाले की, महायुती सरकारने घोषणा केली होती की, फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्याचे एकूण 3000 रुपये महिलांच्या खात्यात 8 मार्च रोजी जमा केले जातील. मात्र अनेक महिलांच्या खात्यात केवळ 1500 रुपये जमा झाले आहेत.

Ladki Bahin Yojana News Update सरकारच्या घोषणामुळे लाडक्या बहिणींना 2 महिन्याची रक्कम एकदाच जमा होईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र 1500 रुपये जमा होत असल्याने त्या निराश झाल्या आहेत. तर काही महिलांच्या खात्यामध्ये केवळ 500 रुपये जमा झाले असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

Ladki Bahin Yojana सामना या वृत्तपत्रांमध्ये दावा करण्यात आलेला आहे की सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील महिला 3000 रुपये आपल्या खात्यात जमा होणार याची प्रतीक्षा करत असताना एका लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सरकारने केवळ 500 रुपये जमा केले आहेत. सरकारने या महिलेच्या खात्यात 500 रुपये जमा करून बहिणींचा अपमान केल्याची टीकाही सामनामध्ये करण्यात आली आहे.

शिंदे सरकारच्या काळात सुरू झाली होती योजना

Ladki Bahin Yojana जुलै 2024 मध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिन्याला जमा करण्यात येतात. सुरुवातीला ही योजना शिंदे सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू केली असल्याची टीका विरोधकांनी केली होती.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana मात्र सरकारने घोषणा केली की ही योजना निवडणुका नंतरही बंद होणार नाही एवढेच नाही तर बीजेपी ने ही घोषणा केली की महायुती सरकार निवडून आल्यानंतर महिन्यांच्या खात्यामध्ये 1500 ऐवजी 2100 रुपये जमा करणार. मात्र सरकार निवडून आले सरकार स्थापन झाले सरकारचा पहिला अर्थसंकल्प ही आज सादर होणार आहे मात्र महिलांना अजूनही 2100 रुपये मिळालेच नाहीयेत.

फेब्रुवारी, मार्च चा हप्ता

Mukhyamantri Ladki Bahin Yojana महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्या आणि महायुतीचे सरकार स्थापन झाले देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बनले आणि महिलांना 2100 रुपये मिळतील अशी आशा निर्माण झाली. मात्र सरकार स्थापन होऊन चार महिने उलटले तरीही महिलांना अजूनही 2100 रुपये मिळालेले नाहीत. 8 मार्च रोजी महिलांच्या खात्यात सरकारने फेब्रुवारीचा हप्ता जमा केला मात्र तोही 1500 रुपये जमा केला आहे. त्यामुळे आता महिलांना 2100 रुपयासाठी किती दिवस प्रतीक्षा करावी लागते हे पाहणे आवश्यक आहे.

महिलेच्या खात्यात 500 रुपये जमा?

Ladki Bahin Yojana News Update आंतरराष्ट्रीय महिला दिवस 8 मार्च रोजी साजरा झाला. या दिवशी महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी, मार्च महिन्याचा हप्ता जमा करणार सांगितले होते आणि तसेच 08 मार्च ला 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जातील असे सांगण्यात आले होते. मात्र 8 मार्च रोजी अनेक महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले.

विशेष बाब म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एका महिलेच्या खात्यात केवळ 500 रुपये जमा झाले आहेत असा दावा सामना वर्तमानपत्रात करण्यात आला आहे. तसेच सरकारने महिलांची थट्टा केल्याचे ही यातून टीका करण्यात आली आहे. दुसरीकडे एकाच महिन्याचा हप्ता मिळाल्यामुळे आणि 500 रुपये आपल्या खात्यात जमा झाल्यामुळे राज्यातील महिला सरकारवर नाराज झाल्या आहेत.