Mahavitaran Go-Green Yojana 2024 Information In Marathi : महावितरण गो ग्रीन योजना 2024 मराठी माहिती
Mahavitaran Go-Green Yojana पर्यावरण रक्षणासाठी महाराष्ट्र सरकारच्या महावितरण विभागाने गो ग्रीन नावाची ही योजना सुरू केलेली आहे. गो ग्रीन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ग्राहकाला वीज बिलात 120 रुपये सवलत देण्यात येणार आहे. महावितरण ने सुरू केलेल्या या योजनेत कसे सहभागी व्हावे यासंदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत.
Mahavitaran Go-Green Yojana महावितरण ची गो ग्रीन योजना ही काळाची गरज आहे. राज्यभरातील वीज ग्राहकांनी या योजनेत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यावे.
Mahavitaran Go-Green Yojana आधुनिक जगाच्या स्पर्धेमध्ये आज आपण अनेक कामे मोबाईलच्या मदतीने करत असतो. जसे की, मोबाईलचे रिचार्ज करणे असेल, बँकेत पैसे भरणे असेल, एकमेकांना पैसे पाठवले असतील, लाईट बिल भरणे असेल अशा गोष्टी आपण करत असतो. यामुळे आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो.
Mahavitaran Go-Green Yojana 2024 राज्यातील बहुतांश लोक आता मोबाईलच्या माध्यमातून महावितरण चे विज बिल भरतात मात्र असे असतानाही त्यांच्याकडे कागदी लाईट बिल नेहमीप्रमाणे येते. जे लोक ऑनलाईन विज बिल भरतात ते या बिलाकडे पाहतही नाहीत कारण त्यांनी ऑनलाईन विज बिल भरलेले असते आणि बिल भरल्याचा मेसेज त्यांना आलेला असतो.
Mahavitaran Go-Green Yojana त्यामुळे त्यांना कागदी लाईट बिल लागतच नाही. अशांसाठी महावितरणने एक नवीन योजना म्हणजेच गो ग्रीन योजना Mahavitaran Go-Green Scheme सुरू केली आहे.
गो ग्रीन योजना म्हणजे काय
What is Mahavitaran Go-Green Yojana
Mahavitaran Go-Green Yojana महावितरण विभागाने गो ग्रीन ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जे ग्राहक कागदी विज बिल न घेता ई-मेल किंवा एसएमएस वर ऑनलाईन बिल घेतात त्यांना प्रतिबिलानुसार 10 रुपयाची सवलत या योजनेअंतर्गत दिली जाते. म्हणजेच वर्षाला ग्राहकाची 120 रुपयाची बचत होते.
Mahavitaran Go-Green Yojana महावितरण आपल्या ग्राहकांना कागदी विज बिल पाठवते. यावर मोठ्या प्रमाणात कागदाचा वापर होतो आणि मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च होतो कारण प्रत्येक बिल छपाईसाठी किमान 2 रुपये खर्च महावितरण ला येतो आणि कागदाचा अपव्यय जास्त मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळेच महावितरण ने आता पुढाकार घेऊन ग्राहकांनी कागदी बिल नाकरावे आणि ई-मेल एसएमएस वर विज बिल पाहून ऑनलाईन लाईट बिल भरावे यासाठी महावितरण कंपनीने ग्रीन योजना 2024 सुरू केलेली आहे.
ग्राहकाला 120 रुपयाचा फायदा
Mahavitaran Go-Green Yojana Benefits
Mahavitaran Go-Green Scheme जगभरात आधुनिकतेची क्रांती झाल्यानंतर मोबाईल एक जीवनावश्यक वस्तू म्हणूनच वापरला जात आहे. प्रत्येक व्यवहार करण्यासाठी आज व्यक्ती मोबाईलचा वापर करतो. ही बाब लक्षात घेऊन महावितरण कंपनीने ग्राहकांना छापील बिल नाकारून वीज बिलाची माहिती इमेल किंवा एसएमएस द्वारे घेऊन विज बिल ऑनलाइन भरल्यास महावितरण कडून ग्राहकाला दर महिन्याला 10 रुपयाची सवलत दिली जात आहे. त्यामुळे एकूण वार्षिक ग्राहकाला 120 रुपयाचा फायदा यामुळे होत आहे. त्याबरोबरच पर्यावरण रक्षणासाठी त्याचा हातभारही लागत आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी गो ग्रीन योजनेचा वापर करून पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा असे आव्हान महावितरण कडून करण्यात येत आहे. या योजनेमुळे प्रत्येक ग्राहकाला वीज बिलात 120 रुपयाची सवलत मिळणार आहे. तर महावितरण कंपनीला प्रति बिल 2 रुपयाची बचत होणार आहे. महावितरण च्या गो ग्रीन योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरण गो ग्रीन योजना या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
गो ग्रीन योजनेची अर्ज प्रक्रिया
Mahavitaran Go-Green Yojana Online Apply
Mahavitaran Go-Green Scheme सर्वात प्रथम ग्राहकाने आपल्या जवळच्या वीज बिल भरणा केंद्राला भेट द्यावी आणि तिथे जाऊन गो ग्रीन योजना आपल्या बिलासाठी लागू करावी अशी मागणी करावी. त्यानंतर ही योजना त्यांना लागू होईल.
किंवा Mahavitaran Go-Green Scheme या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन द्या त्यावर तुमचे चालू महिन्याचे बिलासह मागील 11 महिन्याचे लाईट बिल उपलब्ध असतील. ते डाऊनलोड करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करा या योजनेचे अधिक माहितीसाठी www.mahadiscom.in वर उपलब्ध आहे
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
बेबी केअर किट योजना महाराष्ट्र
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024
31 ऑगस्टपर्यंत करा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज
महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024
महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट
महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
आता मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना
पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024