Mahila Swayam Siddhi Yojana 2024 In Marathi : महिलांना व्यवसायासाठी मिळणार 10 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

Table of Contents

Mahila Swayam Siddhi Yojana 2024 Information In Marathi : महिला स्वयंसिद्धी योजना 2024 मराठी माहिती

Mahila Swayam Siddhi Yojana 2024 : नमस्कार वाचकहो, केंद्र सरकार हे महाराष्ट्रातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या नवनवीन योजना राबवत असते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, गरीब नागरिकांसाठी, महिलांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. तसेच आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण महिलांसाठीच्या एका योजनेची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे Mahila Swayam Siddhi Yojana 2024 महिला स्वयंसिद्धी योजना 2024. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर बनवणे हा सरकारचा या योजने मागचा महत्त्वाचा उद्देश आहे.

Mahila Swayam Siddhi Yojana महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, जमातीतील तसेच मागासवर्गीय घटकातील महिलांना जर एखादा लघुउद्योग सुरू करायचा असेल आणि त्यांना त्यांच्या स्वतःवर च्या पायावर उभा राहून आत्मनिर्भर बनायचे असेल, तर त्या महिलांना या योजनेचा भरपूर फायदा होणार आहे.

Mahila Swayam Siddhi Yojana

चला तर मग आजच्या लेखातून आपण महिला स्वयंसिद्धी योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. महिला स्वयंसिद्धी योजना म्हणजे काय?, महिला स्वयंसिद्धी योजनेची काय आहेत वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, पात्रता?, महिला स्वयंसिद्धी योजनेचा कसा करावा लागेल अर्ज? या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या लेखातून आपण पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

महिला स्वयंसिद्धी योजना संपूर्ण माहिती

Mahila Swayam Siddhi Yojana Details

महाराष्ट्रातील मागासवर्गीय महिलांना तसेच अनुसूचित जाती, जमातीतील महिलांना त्यांचा स्वतःचा एखादा छोटासा व्यवसाय सुरू करता यावा आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहता यावे या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा ही योजना सुरू केली आहे.

Mahila Swayam Siddhi Yojana योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते आणि तेही फक्त बारा टक्के या व्याजदराने

परंतु ही व्याजाची रक्कम मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत दिली जाणार आहे त्यामुळे महिलांना या योजनेअंतर्गत झिरो टक्के व्याज दराने कर्ज मिळणार आहे.

राज्यात अशा असंख्य महिला आहेत ज्या की सुशिक्षित आणि अत्यंत हुशार आहेत आणि त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, परंतु त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांच्याजवळ त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ नसते. त्यामुळे ते त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन नसते, त्यांना कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यास अडचण येते आणि त्या त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकत नाही. या सर्व गोष्टी विचारात घेऊन केंद्र सरकारने इतर मागास प्रवर्गातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम बनवणे या उद्देशाने महिला स्वयंसिद्धी  योजना सुरू केली आहे Mahila Swayam Siddhi Yojana योजनेअंतर्गत ज्या महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिले जाते.

Mahila Swayam Siddhi Yojana या योजने अंतर्गत बचत गटातील मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारमार्फत 5 ते 10 लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्ज रकमेवर 12 टक्के व्याजदर हे महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळा अंतर्गत देण्यात येते. म्हणजेच महिला स्वयंसिद्धी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या कर्जावर झिरो टक्के व्याजदर आहे.

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना म्हणजे काय?

Mahila Swayam Siddhi Vyaj Partava Yojana 2024 In Marathi

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना Mahila Swayam Siddhi Vyaj Partava Yojana चे उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्यांमधील मागासवर्गीय भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर प्रवर्गातील असणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभा करणे. महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना त्यांचा स्वतःचा लघुउद्योग सुरू करून त्यांना या व्यवसायासाठी 5 ते 10 लाख रुपये पर्यंतचे कर्ज हे झिरो टक्के व्याज दराने देण्यात येते. या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर बनतील व त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

ठळक मुद्दे :

महिला स्वयंसिद्धी योजना 2024 मराठी माहिती

Mahila Swayam Siddhi Yojana 2024 Information In Marathi

महिला स्वयंसिद्धी योजना संपूर्ण माहिती

Mahila Swayam Siddhi Yojana Details

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना म्हणजे काय?

Mahila Swayam Siddhi Vyaj Partava Yojana 2024 In Marathi

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेची थोडक्यात माहिती

Mahila Swayam Siddhi Yojana In Short

महिला स्वयंसिद्धी योजनेचे उद्दिष्ट

Mahila Swayam Siddhi Yojana Purpose

महिला स्वयंसिद्धी योजनेची वैशिष्ट्ये

Mahila Swayam Siddhi Yojana Features

महिला स्वयंसिद्धी योजनेचे फायदे

Mahila Swayam Siddhi Yojana Benefits

महिला स्वयंसिद्धी योजनेचे लाभ

Mahila Swayam Siddhi Yojana 2024 Benefits

महिला स्वयंसिद्धी योजना स्वरूप

Mahila Swayam Siddhi Vyaj Partava Yojana

महिला स्वयंरोजगार योजनेची पात्रता

Mahila Swayam Siddhi Yojana Eligibility

महिला स्वयंसिद्धी योजनेसाठीची कागदपत्रे

Mahila Swayam Siddhi Yojana Documents

महिला स्वयंसिद्धी योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

Mahila Swayam Siddhi Yojana 2024 In Marathi

महिला स्वयंसिद्धी योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया

Mahila Swayam Siddhi Yojana Online Apply

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेची थोडक्यात माहिती

Mahila Swayam Siddhi Yojana In Short

योजनेचे नावमहिला स्वयंसिद्धी योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
विभागराज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ
लाभार्थीइतर मागास प्रवर्गातील महिला
लाभमहिलांना आत्मनिर्भर बनवणे
लाभाची रक्कम5 ते 10 लाख लाखापर्यंतचे कर्ज
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://www.india.gov.in/
Mahila Swayam Siddhi Yojana

महिला स्वयंसिद्धी योजनेचे उद्दिष्ट

Mahila Swayam Siddhi Yojana Purpose

  • महाराष्ट्रातील इतर मागास प्रवर्गातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेअंतर्गत महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारणे.
  • राज्यातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
  • महिलांना रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करून देणे.
  • राज्यातील महिलांचा औद्योगिक विकास करणे.
  • राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे.

महिला स्वयंसिद्धी योजनेची वैशिष्ट्ये

Mahila Swayam Siddhi Yojana Features

  • या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.
  • या योजनेअंतर्गत महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होणार आहे.
  • या योजनेअंतर्गत महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र CMRC च्या साह्याने राबविण्यात आली आहे.
  • Mahila Swayam Siddhi Yojana योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सोपी ठेवलेली आहे. त्यामुळे या योजनेचा अर्ज करताना कुठलीही अडचण येणार नाही.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम ही महिला बचत गटाच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
  • महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन, प्रक्रिया मूल्य आधारित उद्योगांकरिता बँकेमार्फत मंजूर केलेला केलेल्या 5 लाख ते 10 लाख पर्यंतच्या कर्ज रकमेवर 12 टक्के व्याज परतावा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल.
  • या योजनेअंतर्गत कर्ज रकमेवरील व्याजाची रक्कम ही ओबीसी महामंडळामार्फत अदा करण्यात येईल.
  • त्यामुळे महिला स्वयंसिद्धी योजनेअंतर्गत महिलांना झिरो टक्के व्याज दराने हे कर्ज उपलब्ध होईल.
  • महिला स्वयंसिद्धी योजनेला व्याज परतावा योजना म्हणून देखील ओळखले जाते.

महिला स्वयंसिद्धी योजनेचे फायदे

Mahila Swayam Siddhi Yojana Benefits

  • महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन प्रक्रिया मूल्य आधारित उद्योगांकरिता बँकेमार्फत मंजूर केलेला केलेल्या 5 लाख ते 10 लाख पर्यंतच्या कर्ज रकमेवर 12 टक्के व्याज परतावा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल.
  • या योजनेच्या मदतीने महिलांचे जीवनमान सुधारेल.
  • या योजनेअंतर्गत महिलांचा सामाजिक विकास होईल.
  • या योजनेअंतर्गत महिला सशक्त बनतील.
  • या योजनेअंतर्गत महिला त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील.
  • या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.

महिला स्वयंसिद्धी योजनेचे लाभ

Mahila Swayam Siddhi Yojana 2024 Benefits

  • महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेअंतर्गत बचत गटातील मागासवर्गातील सुशिक्षित बेरोजगार महिलांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत महिलांचा आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • या योजनेअंतर्गत महिला त्यांचा स्वतःचा उद्योग सुरू करू शकतील.
  • या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणावरही पैशांसाठी अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
  • या योजनेमुळे राज्यातील बेरोजगारी कमी होईल.
  • महिलांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील.
  • या योजनेअंतर्गत महिलांना झिरो टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध होते.
  • या योजनेअंतर्गत महिलांचे जीवनमान सुधारेल.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

कन्यादान योजना

बांधकाम कामगार योजना

महात्मा फुले जन आरोग्य योजना

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना

पीएम श्री योजना

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 

महिला स्वयंसिद्धी योजना स्वरूप

Mahila Swayam Siddhi Vyaj Partava Yojana

  • महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शिफारस करण्यात आलेल्या महिला बचत गटात किमान 50 टक्के इतर मागासवर्गातील महिला असतील असा बचत गट व्याज परतावा योजनेसाठी पात्र असणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून पात्र महिला बचत गटातील अन्य मागास प्रवर्गाच्या महिला अर्जदारांना सदर व्याज परतावा योजनेचा लाभ ओबीसी महामंडळाकडून घेता येणार आहे. या बचत गटातील उर्वरित महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाकडून व अन्य शासकीय विभागाच्या/ महामंडळाच्या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
  • अन्य मागास वर्गातील किमान 50 टक्के महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटात पहिल्या टप्प्यात 5 लाख रुपयापर्यंत कर्ज बँकेच्या द्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
  • पहिल्या टप्प्यात मिळालेले कर्ज नियमित परत फेडीनंतर या बचत गटाला  दुसऱ्या टप्प्यात 10 लाख रुपयापर्यंत कर्ज मंजूर करून घेण्यास पात्र ठरणार आहे. बँकेकडून मंजूर केलेल्या कर्जावरील 12% व्याजाच्या मर्यादित व्याजदर परतावा ओबीसी महामंडळामार्फत दिला जाणार आहे.
  • बँकेने मंजूर केलेला कर्जावरील व्याजदर ओबीसी महामंडळामार्फत बँक खात्यामध्ये दर तिमाही व्याजाचा परतावा मंजुरी नुसार 5 वर्षापर्यंतच्या कालावधी करिता देण्यात येणार आहे.
  • महिला आर्थिक विकास महामंडळाने प्रस्तावित केलेल्या बँका व CMRC च्या माध्यमातून आलेल्या MOU तील निकषानुसार 1 टक्के शुल्क हे कर्ज रकमेवर व 1 टक्के शुल्क हे परतफेड रकमेवर अदा करण्यात येईल. तसेच या योजनेत बँकेने मंजूर केलेल्या रकमेच्या 1 टक्के प्रशासकीय शुल्क कर्ज मंजुरीनंतर व 1 टक्के प्रशासकीय शुल्क रक्कम संपूर्ण मुद्दल रकमेच्या कर्ज परतफेड नंतर ओबीसी महामंडळाकडून महिला आर्थिक विकास महामंडळात देण्यात येईल.
Mahila Swayam Siddhi Yojana

महिला स्वयंसिद्धी योजनेची पात्रता

Mahila Swayam Siddhi Yojana Eligibility

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महिला स्वयंरोजगार योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील महिलांनाच घेता येणार आहे.
  • महिला स्वयं रोजगार योजनेचा लाभ बचत गटातील अन्य मागासवर्गातील महिलांना देण्यात येईल.
  • महाराष्ट्र बाहेरील महिलांनी या योजनेसाठी अर्ज केल्यास तो रद्द करण्यात येईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे.
  • जर एखाद्या महिलेने यापूर्वी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या अन्य योजनेचा जर लाभ घेतला असेल तर त्या महिलांना यापूर्वी कर्ज परत रकमेचे घेतलेले परतफेडीचे प्रमाणपत्र यासोबत जोडावे लागणार आहे.
  • संबंधित महिलेच्या नावावर कुठल्याही बँकेची थकबाकी असता कामा नये.
  • या योजनेच्या माध्यमातून एका कुटुंबातील एकच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते.
  • या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी प्रथम आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहेत तरच कर्ज मंजुरी मिळते.

महिला स्वयंसिद्धी योजनेसाठीची कागदपत्रे

Mahila Swayam Siddhi Yojana Documents

अर्जदार महिलेचे आधार कार्ड

पॅन कार्ड

रेशन कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

बचत गटाचे बँक खात्याचे पासबुक

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

पासपोर्ट आकाराचा फोटो

व्यवसाय सुरू करण्यात येणाऱ्या व्यवसायाची संपूर्ण माहिती

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र

इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जातीचा दाखला

स्वयंघोषणा प्रमाणपत्र

महिला स्वयंसिद्धी योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

Mahila Swayam Siddhi Yojana 2024 In Marathi

या योजनेसाठी अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी नसेल तर अर्ज रद्द करण्यात येतो.

व्यवसाय सुरू करण्यासाठीची माहिती महिलेने खोटी दिली असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.

अर्जदार महिला कुठल्याही बँकेची थकबाकीदार असल्यास अर्ज रद्द केला जातो.

महिलेने केंद्र आणि राज्य सरकार च्या एखाद्या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाचा लाभ घेतला असेल अशावेळीही त्या महिलेचा अर्ज रद्द करण्यात येईल.

अर्जदार महिलेचे वय 60 पेक्षा अधिक असल्यास ही अर्ज रद्द करण्यात येईल.

Mahila Swayam Siddhi Yojana

महिला स्वयंसिद्धी योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया

Mahila Swayam Siddhi Yojana Online Apply

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने सरकारच्या अधिकृत पोर्टल वर जावून अर्ज करावा.

महिला स्वयंसिद्धी योजनेसाठीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

Mahila Swayam Siddhi Yojana Apply

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना सर्वात प्रथम आपल्या जिल्हा कार्यालयात आर्थिक विकास महामंडळामध्ये जावे लागेल.

या कार्यालयात गेल्यानंतर महिलेला तिथे महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेसाठीचा अर्ज घ्यावा लागेल.

अर्ज घेतल्यानंतर त्यावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.

त्याबरोबरच यासोबत जोडावयाची सर्व कागदपत्रे जोडावी लागतील.

त्यानंतर संबंधित अर्ज एकदा तपासून संबंधित कार्यालयात जमा करावा लागेल.

अशा सोप्या पद्धतीने महिला स्वयंसेवी व्याज परतावा योजनेचा लाभ घेऊ शकतात.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेचा उद्देश काय?

उत्तर: महिला स्वयंसिद्धी योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.

प्रश्न: महिला स्वयंसिद्धी योजनेअंतर्गत किती कर्ज दिले जाते?

उत्तर: महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून 5 ते 10 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. याद्वारे त्या महिला आपला व्यवसाय सुरू करू शकतील.

प्रश्न: महिला स्वयंसिद्धी योजनेअंतर्गत किती व्याजदर आकारला जातो?

उत्तर: या योजनेच्या माध्यमातून दिलेल्या कर्जावर 12 टक्के व्याजदर आकारला जातो परंतु व्याजाची रक्कम अन्य मागासवर्ग महामंडळाद्वारे बँकेत जमा करण्यात येते. त्यामुळे महिलांना शून्य टक्के दरानेच कर्ज मिळते.

प्रश्न: महिला स्वयंसिद्धी योजनेचे लाभार्थी कोण?

उत्तर: महिला स्वयंसिद्धी योजनेचे राज्यातील महिला बचत गटातील अन्य मागास प्रवर्गातील महिला लाभार्थी आहेत. त्या या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि आपल्या पायावर उभ्या राहू शकतात.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA