Manoj Jarange Patil : नेमक काय होणार 24 तारखेला
Manoj Jarange Patil : 24th date is important विधानसभा निवडणूक 2024 मध्ये चुरस वाढण्याची शक्यता आहे. ही निवडणूक जरी महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी असली तरी मराठा आरक्षण आंदोलन Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांनी देखील या निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याची घोषणा केली. ज्या मतदारसंघात आपले उमेदवार निवडून येतील तेथे उमेदवार उभे करू आणि जिथे निवडून येण्याची शक्यता कमी आहे अशा मतदारसंघात जो उमेदवार मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल त्याच्या पाठीशी उभे राहु अशी भूमिका जरांगे पाटील यांनी रविवारी झालेल्या बैठकीमध्ये मांडली या दरम्यान आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी बैठकीबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. Manoj Jarange Patil
काय म्हणाले जरांगे पाटील
Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांनी घोषणेदरम्यान सांगितले की या अगोदर आम्ही महाराष्ट्रातील इच्छुकांची बैठक घेतली होती. ही निवडणूक लढाईची की पाडायची यासाठीची होती. त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की एका मतदारसंघात एकच उमेदवार द्या तुमच्या मतदारसंघात तुमच्या बैठका घ्या. 24th date is important येत्या 24 तारखेला आंतरवाली सराटीमध्ये जिल्ह्यानुसार बैठक घेऊन एक उमेदवार देण्याचा प्रयत्न जरांगे पाटील करणार आहेत. सगळ्यांनी फॉर्म भरले तर ते किचकट होईल एका मतदार संघातून एक उमेदवार दिला तर ताकद लावता येईल आपण त्या मतदारसंघात एक फॉर्म ठेवू आणि बाकीचे काढून घेऊ असे जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे.
24th date is important त्यानंतर ते पुढे म्हणाले ज्यांना फॉर्म काढून घ्यायला सांगण्यात येईल त्यांनी फॉर्म काढून घ्यावा जर एखाद्या मतदार संघात सांगूनही फॉर्म ठेवला तर त्याने मुद्दाम फॉर्म ठेवला आणि मॅनेज झाला त्याला मराठ्यांशी काही देणं घेणं नाही असं मानण्यात येईल. मी आज आणि उद्या कोणते उमेदवार द्यायचे याची यादी करत आहे पण डिक्लेअर करणार नाही. माझी विनंती आहे की येत्या 23 तारखेपर्यंत इच्छुकांशिवाय मला कोणीही भेटायला येऊ नका. असे स्पष्टपणे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.