Mazi Kanya Bhagyashree Yojana 2024 in marathi माझी कन्या भाग्यश्री योजना2024 मराठी माहिती
Mazi Kanya Bhagyashree Yojana 2024 माझी कन्या भाग्यश्री योजना देशातील मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढण्यासाठी आणि स्त्रीभ्रूणहत्या थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2016 रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना Mazi KanyaBhagyashree Yojana सुरू केली आहे. ही योजना राज्यातील प्रत्येक मुलीसाठी आहे, पण ज्या मुलीच्या आई किंवा वडिलांनी मुलगी जन्माला आल्यानंतर एक वर्षाच्या आत नसबंदि करून घेतली आहे. त्या कुटुंबातील मुलीच्या नावावर सरकार पन्नास हजार (50000) रुपये जमा करणार आहे. माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत माता किंवा पित्याने दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर नसबंदी करून घेतली असेल तरच नसबंदीनंतर दोन्ही मुलींच्या नावावर सरकार एक मुलीच्या नावे 25000 आणि दुसऱ्या मुलीच्या नावे 25000 रुपये अशी रक्कम बँकेत जमा करणार आहे. जेणेकरून मुली मोठ्या झाल्यावर त्यांच्या शिक्षणाकरिता या पैशांचा उपयोग होईल आणि त्या चांगले शिक्षण घेऊ शकतील. या योजनेअंतर्गत एका व्यक्तीच्या केवळ दोन मुलींनाच या योजनेचा लाभ घेत येईल. माझी कन्या भाग्यश्री योजना 2024 Mazi Kanya Bhagyashree Yojana 2024 च्या अंतर्गत मुलगी जन्माला आल्यानंतर एका वर्षाच्या आत आई किंवा वडिलांना नसबंदी करून घ्यावी लागेल आणि दुसरी मुलगी जन्मल्यानंतर तिच्या सहा महिन्याच्या आत नसबंदी करावी लागेल हे नियम बंधनकारक आहेत. या योजनेसाठी पूर्वी दारिद्र्यरेषेखालील (BPL) म्हणजेच ज्यांचे उत्पन्न वार्षिक एक लाख रुपये पर्यंत आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येत होता परंतु आता यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. “माझी कन्या भाग्यश्री योजना” या अंतर्गत आता ज्या मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपासून ते साडेसात लाख रुपयेपर्यंत आहे, त्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो. महाराष्ट्रातील मुलींचे शिक्षण त्यांच्या आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या शिक्षणाकरिता, उज्वल भविष्या करिता, आर्थिक मदत करणे, स्त्रीभ्रूणहत्या वर आळा घालणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट समोर ठेवून सरकारने “माझी कन्या भाग्यश्री योजना” Mazi Kanya Bhagyashree Yojana राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
https://womenchild.maharashtra.gov.in
माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ दोन प्रकारच्या लाभार्थ्यांना होणार आहे. लाभार्थी एक – घरात एकुलती एक मुलगी आहे आणि माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन केलेले आहे. लाभार्थी दोन – पहिली मुलगी आहे आणि दुसरी मुलगी झाल्यानंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे या परिस्थितीत दोन्ही मुलींना हा लाभ मिळेल. परंतु जर एका कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- ठळक मुद्दे :-
- माझी कन्या भाग्यश्री योजनेची उद्दिष्टे
- माझी कन्या भाग्यश्री योजनेची थोडक्यात माहिती
- माझी कन्या भाग्यश्री योजनेचे स्वरूप
- माझी कन्या भाग्यश्री योजनेचे नियम
- माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ
- माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
- माझी कन्या भाग्यश्री योजनेची कार्यपद्धती
- माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी असा करा ऑनलाइन अर्ज
- FAQ’s या योजनेबद्दल विचारण्यात येणारे प्रश्न
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा : https://yojanamazi.com/pradhanmantri-jeevan-jyoti-bima-yojana-2024-in-marathi/
माझी कन्या भाग्यश्री योजनेची उद्दिष्टे
Objectives Of Mazi Kanya Bhagyashree Yojana
Mazi Kanya Bhagyashree Yojana 2024 महाराष्ट्रात ही योजना सुरू करण्याचा उद्देश म्हणजे समाजामध्ये मुलींच्या जन्मा बाबत जो नकारात्मक दृष्टिकोन आहे तो काढून टाकने, मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन करणे, जसा समाजामध्ये मुलगा जन्माला आल्यावर त्याचा आनंदाने पेढे वाटत उत्सव साजरा करतात तसेच मुलींच्याही बाबतीत करावा. समाजात ही मुलींबद्दलची मानसिकता बदलणे हे मुख्य उद्दिष्ट या योजनेचे आहे. समाजात मुलगी जन्माला येणे म्हणजे आई वडिलांच्या डोक्यावर ओझे असे मानतात असे न होऊ देता मुलगी ही मुला इतकीच महत्त्वाची आहे हे जाणवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेचे आणखीन उद्देश खालील प्रमाणे
- मुलींचा जन्मदर वाढवणे.
- लिंगनिवडीस प्रतिबंध करणे.
- मुलींना उच्च शिक्षण देण्याबाबत प्रोत्साहण देणे.
मुलांप्रमाणेच मुलींनाही समाजात मान मिळवून देणे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | माझी कन्या भाग्यश्री योजना |
कधी सुरू झाली | 1 एप्रिल 2016 |
कोणाला होणार लाभ | राज्यातील प्रत्येक मुलीला जीचा जन्म 1 ऑगष्ट 2017 नंतर झालेला आहे |
रक्कम | 50,000 |
कधी मिळते रक्कम | मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर |
उद्देश | मुलींना उच्च शिक्षण देणे |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकारने |
अधिकृत वेबसाइट | https://womenchild.maharashtra.gov.in |
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे स्वरूप
Mazi Kanya Bhagyashree Yojana देशातील मुलींना मुक्त जीवन जगता यावे यासाठी केंद्र सरकारने आधी “बेटी बचाओ बेटी पढाओ” ही योजना सुरू केली होती. या योजनेमध्ये देशातील शंभर जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशिम, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद या दहा जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुकन्या योजना राज्यामध्ये सुरू केली होती. त्यानंतर या योजनेमध्ये काही बदल करून महाराष्ट्र सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजनाMazi Kanya Bhagyashree Yojana राज्यात सुरू केली. ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या योजनेचा लाभ समाजातील दारिद्र रेषेखालील कुटुंबीयांना होत आहे तसेच दारिद्र्यरेषे वरील (पांढरे रेशन कार्ड) कुटुंबीयांना देखील लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत मुलगी सहा वर्षाची झाल्यानंतर तिच्या खात्यात जमा रकमेवर व्याजाची रक्कम जमा होईल. दुसऱ्या वेळी मुलगी बारा वर्षाची झाल्यानंतर व्याजाची रक्कम तिच्या खात्यात जमा होईल तसेच मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिची पूर्ण रक्कम तिला मिळेल. या योजनेसाठी बँकेमध्ये मुलगी आणि तिची आई या दोघींच्या नावाने संयुक्त बचत खाते म्हणजेच जॉईंट सेविंग अकाउंट उघडण्यात येईल, जेणेकरून सरकारकडून ही रक्कम त्या खात्यात जमा होईल. या योजनेसाठी मुलीचे कमीत कमी दहावी शिक्षण होणे आवश्यक आहे.
लखपति दीदी योजनेच्या माहिती साठी पुढील लिंक वर क्लिक करा. https://yojanamazi.com/lakhapati-didi-yojana-2024-in-marathi/#more-258
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे नियम
Rules of Mazi Kanya Bhagyashree Yojana
Mazi Kanya Bhagyashree Yojana समाजामध्ये मुलींच्या जन्मा बाबत सकारात्मक विचार निर्माण करणे, मुलांप्रमाणेच मुलींचाही जन्मदर वाढवणे, मुलींना उच्च शिक्षण देणे, मुलांसारखेच मुलींनाही स्वतःच्या पायाच्या उभे करणे, या शिवाय बालविवाह बंद करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.
या योजनेचे नियम खालील प्रमाणे
माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुंब बीपीएल तसेच दारिद्र रेषेवरील कुटुंब एपीएल पांढरे रेशन कार्ड असलेल्या देखील लाभ घेता येतो.
ज्या कुटुंबात दोन्ही मुलीच जन्माला आलेल्या आहेत अशांना या योजनेचा लाभ होतो. ज्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे अशांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
मुलीचे वडील हे महाराष्ट्रातील मूळ रहिवाशी असावे.
या योजनेचा लाभ घेताना मुलीचे जन्म प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे, ती अविवाहित असावी आणि दहावी उत्तीर्ण असावी.
दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी दोन्ही मुली जन्माला आल्या तर त्यांना दुसऱ्या प्रकारचा लाभ मिळेल, जर एखाद्या कुटुंबाने अनाथ मुलीला दत्तक घेतले असेल तर त्या मुलीला त्या कुटुंबातील पहिली मुलगी म्हणून या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. परंतु त्या मुलीचे वय हे सहा वर्षाच्या आत असावे.
बालगृहातील मुलींना देखील या योजनेचा लाभ घेता येईल.
प्रकार एकचा लाभार्थी कुटुंबास मुलगी झाल्यानंतर शस्त्रक्रिया झालेली असणे आवश्यक आहे तसेच प्रकार दोनच्या लाभार्थ्यांना दोन अपत्यानंतर कुटुंब नियोजन करणे बंधनकारक आहे.
मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर जे तिला एक लाख रुपये मिळणार आहेत त्यापैकी दहा हजार (10,000) रुपये रक्कम ही तिच्या कौशल्य विकासावर खर्च करावी लागेल. यामुळे त्या मुलीला रोजगार मिळून कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल.
ज्या लाभार्थ्याचे खाते जनधन योजनेचे आहे, त्यांना त्या जनधन योजनेअंतर्गत असलेले लाभ आपोआप मिळतील.
जर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होण्याच्या आधी तिचा विवाह झाला असेल तर त्या योजनेचा लाभ हा तिच्या आई-वडिलांना होत नाही तर ती रक्कम बँकेमध्ये महाराष्ट्र सरकारच्या नावे असलेल्या सरप्लस अकाउंट मध्ये जमा केली जाते.
या योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2017 रोजी नंतर जन्मलेल्या मुलींना लागू राहील. ज्या कुटुंबात 1 ऑगस्ट 2017 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा जन्मलेला आहे आणि 1 ऑगस्ट 2017 नंतर मुलगी जन्मलेली आहे त्या कुटुंबातील फक्त दुसऱ्या मुलीच्या नावानेच 25 हजार रुपये जमा केले जातील. पहिल्या मुलीला त्याचा लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबात पहिली मुलगी, दुसरी मुलगी आणि तिसरी अपत्य झाल्यास पहिल्या आणि दुसऱ्या मुलींना हा लाभ मिळणार नाही जर मुलीचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला असेल तर तिच्या ठराविक मदतीनंतर ती रक्कम तिच्या पालकांना मिळेल.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा. : https://yojanamazi.com/pm-suraksha-bima-yojana-2024/
हे ही वाचा. : https://yojanamazi.com/pradhanmantri-vishwakarma-yojana-2024-in-marathi/#more-248
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ
benefits of Mazi Kanya Bhagyashree Yojana
Mazi Kanya Bhagyashree Yojana पहिल्या प्रकारांमध्ये कुटुंबातील एक मुलगी जन्माला आल्यानंतर माता किंवा पित्याने मुलगी एक वर्षाची व्हायच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर सरकारकडून मिळणारे 50 हजार रुपये रक्कम सरकारी बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येईल.
यानंतर मुलगी सहा वर्षाची झाल्यानंतर तिच्या खत्यातून फक्त व्याजाची रक्कम तिला काढता येईल.
नंतर पुन्हा मुलगी बारा वर्षाची झाल्यानंतर पन्नास हजार रकमेवरील व्याज तिला मिळेल
मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर तिचे सहा महिन्याचे व्याजसह 50 हजार मुद्दल अशी मिळून पूर्ण रक्कम तिला काढता येईल
दुसऱ्या प्रकारात कुटुंबात दोन मुली जन्माला आल्यानंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी. त्यानंतर मुलीला दोन्ही मुलींच्या नावे 25000 अशी एकूण पन्नास हजार रुपये रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल.
नंतर मुलगी सहा वर्षाची झाल्यानंतर तिला 25000 वर रकमेवरील व्याज मिळेल, त्यावेळेस त्यातील फक्त व्याजाची रक्कम काढता येईल. तसेच मुलगी बारा वर्षाची झाल्यानंतर पण सहा वर्षात जमा झालेले व्याज काढता येईल आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला राहिलेल्या सहा वर्षातील व्याज आणि त्याची 25 हजार रुपये मुद्दल अशी सर्व रक्कम तिला काढता येईल.
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Documents of Mazi Kanya Bhagyashree Yojana
- लाभधारक हे महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- लाभार्थी कुटुंबाने एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेले प्रमाणपत्र
- या योजनेसाठी अर्ज करताना कुटुंबाने दोन मुली नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाइल नंबर
- मुलीचे आणि आईचे संयुक्त बचत खाते पासबुक
माझी कन्या भाग्यश्री योजनेची कार्यपद्धती
Mazi Kanya Bhagyashree Yojana 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी जन्मानंतर पात्र असलेल्या मुलीच्या पालकांनी आपल्या गावातील ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका मध्ये जाऊन मुलीच्या जन्माची नोंद करावी.
ही जन्म नोंदणी झाल्यानंतर पालकांनी त्या विभागातील अंगणवाडित जाऊन प्रपत्र किंवा प्रपत्र ब मध्ये अर्ज सादर करावा. आवश्यक कागदपत्रे या अर्जासोबत जोडावे. या योजनेसाठीचा अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बालविकास अधिकारी महिला व बालविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषद जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयात मोफत उपलब्ध असतात. यानंतर अंगणवाडी सेविकांनी हा अर्ज मुख्य सेविकीकडे द्यावा, त्यांनी तो अर्ज तपासून मुलीला या योजनेचा लाभ द्यावा.
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी असा करा ऑनलाइन अर्ज
Mazi Kanya Bhagyashree Yojana apply online
माझी कन्या भाग्यश्री योजना 2024 Mazi Kanya Bhagyashree Yojana 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो त्यासाठी तुम्हाला https://womenchild.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माझी कन्या भाग्यश्री योजनेचा एक फॉर्म येईल तो एप्लीकेशन फॉर्म तुम्हाला डाऊनलोड करावा लागेल आणि त्या डाऊनलोड केलेल्या फॉर्ममध्ये जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरावी लागेल. संपूर्ण माहिती भरल्यावर आवश्यक ती कागदपत्रे जोडून तो अर्ज तुम्हाला जवळील महिला व बालविकास कार्यालयात नेऊन सादर करावा लागेल, अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करूनही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
FAQ’s या योजनेबद्दल विचारण्यात येणारे प्रश्न
- माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरू करण्यात आली?
- महाराष्ट्र राज्यात सुरुवातीला सुकन्या योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेमध्ये काही बदल करून अधिक लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना Mazi Kanya Bhagyashree Yojana ही योजना 1 ऑगस्ट 2017 पासून सुरू केली आहे.
- या योजनेचा लाभ घेतली रक्कम कधी मिळते?
- मुलगी सहा वर्षाची आणि बारा वर्षाची झाल्यावर तिच्या नावावर असलेल्या जमा रकमेचे फक्त व्याज मिळते आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला संपूर्ण तिची जमा रक्कम आणि त्याच्यावरील व्याज ही एकूण रक्कम तिच्या खात्यात जमा होते.
- योजनेचा मुख्य उद्देश काय?
- समाजात मुली प्रती असलेले नकारात्मक विचार बदलून मुलांप्रमाणे मुलीला समाजात मान मिळवून देणे हा माझी कन्या भागयश्री योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- माझी कन्या भाग्यश्री योजनेतून किती रुपयाची मिळते मदत ?
- या योजनेअंतर्गत मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तब्बल 50,000 रुपये रक्कम मिळते.