Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024 : मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना 2024

Table of Contents

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024 information in marathi : मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना 2024 माहिती

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024 राज्यातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी रात्री जीव धोक्यात घालून शेतात जावं लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकारने मागील त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 8 लाख 50 हजार नवीन कृषी पंप बसविण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये ही घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळेल आणि बाहेर नियमांपासूनही मुक्तता मिळेल. त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढण्यात मोठी मदत होणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी राज्याचे अंतरिम बजेट विधानसभेत सादर केले. यावेळी बोलताना त्यांनी कृषी विभाग आणि शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजनांची घोषणा केली. तसेच त्यासाठी किती खर्चाची तरतूद राज्याच्या तिजोरीतून करण्यात येत आहे याबाबतही माहिती दिली. राज्य सरकारचे हे शेवटचे बजेट होते. यानंतर राज्यात सहा महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होतील.

त्यामुळे राज्य सरकारच्या अंतरिम बजेट मधून शेतकऱ्यांना काय मदत होईल याकडे संपूर्ण राज्याच्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर 27 फेब्रुवारी रोजी अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध विभागांना कोट्यावधी निधी देणार असल्याची माहिती विधानसभेच्या अर्थसंकल्पातून दिली.

मुख्यमंत्री सौर उर्जेची वाहिनी योजना दोन अंतर्गत सात हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष गाठण्याची ही योजना आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होईल. शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर कृषी पंप Saur Krushi Pump Yojana ही नवीन योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 8 लाख 50 हजार नवीन सौर कृषी पंप बसविण्यात येणार आहेत. पीएम कुसुम योजना अंतर्गत यावर्षी एक लाख कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्यापैकी 78,757 पंप बसवण्यात आले असल्याची ही माहिती अजित पवार यांनी दिली.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना 2024 म्हणजे काय?

What is Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024

राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी विहीर, शेततळे, बोरवेल, नदी आदीतून शेतीला पाणी देण्यासाठी सौर कृषी पंप योजना Saur Krushi Pump Yojana सुरू केली आहे. तिचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी सौर कृषी पंप विकत घेण्यासाठी सरकारकडून 95% अनुदान देण्यात येणार आहे. व लाभार्थीला फक्त पाच टक्के रक्कम भरून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. राज्यातील बहुतांशी नागरिक शेती हा पारंपारिक व्यवसाय करतात. त्यासाठी शेतकरी शेतीचे अवजारे, कीटकनाशके, खते, बियाणे यासाठी स्वतःची शेतजमीन गहाण ठेवून सावकार किंवा बँकेकडून कर्ज घेतात आणि आपली शेती पिकवतात. मात्र योग्य वेळी शेतीला पाणी देण्यासाठी वीज पुरवठा होत नसल्यामुळे शेतात पाणी असूनही शेतकऱ्यांना आपल्या पिकाला पाणी देण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांना दिवसा वीज कशी उपलब्ध होईल, यासाठी सौर कृषी पंप योजना Saur Krushi Pump Yojana सुरू केली आहे. कारण विहीर, कालवे, शेततळे, बोरवेल आदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असूनही लोडशेडिंग मुळे पाणी देण्यात मोठी अडचण निर्माण होत होती. आणि त्यामुळे रात्री आपला जीव धोक्यात घालून शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी जात असत. आता अधिक अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागू नये म्हणून सरकारने ही योजना सुरू केली आहे. यामुळे शेतीतील हाता तोंडाशी आलेला घास पाण्याअभावी नुकसान होऊ नये यासाठी या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. शेतीला योग्य वेळी पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज शेतकरी नियमित फेडतो.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024 दुष्काळी परिस्थिती आणि अवेळी येणाऱ्या पावसामुळे आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकरी शेतीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. आणि ते शहरी भागात रोजगारासाठी स्थलांतर करतात अशा पद्धतीमुळे शेतकरी शेतीकडे पाठ फिरवत राहिला तर काही वर्षात अन्नधान्याच्या भीषण समस्येचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सरकारने पुढाकार घेऊन शेतीला दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

आजही ग्रामीण भागात दिवसा लोडशेडिंग करून शेतीला रात्री वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाला पाणी देण्यासाठी रात्री आपला जीव मुठीत धरून पिकाला पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. या समस्येतून सुटका करण्यासाठी या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.

शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना विजेची आवश्यकता असते. वाढत्या विद्युत दरामुळे मोठ्या प्रमाणात विज बिलही येते, हे भरणे शेतकऱ्यांना परवडत नाही, त्यामुळे शेतकरी डिझेल पंपाचा वापर करतात. मात्र डिझेल पंपाच्या किमती विद्युत बिलापेक्षा अधिक असतात पण दिवसा शेतीला पाणी या पंपामुळे देता येते यासाठी शेतकरी मोठा आर्थिक भारही सहन करतो. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या समस्या विचारात घेऊन राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024 सुरू केली आहे.

विद्युत पंप, डिझेल पंप च्या तुलनेत सौर कृषी पंप Saur Krushi Pump Yojana शेतकऱ्यांना परवडण्यासारख्या आहेत. सौर कृषी पंपांना मोठ्या प्रमाणावर विजेची आवश्यकता नसते व डिझेलची सुद्धा गरज नसते. सौर कृषी पंपामुळे वायु प्रदूषणही होत नाही. तसेच सौर कृषी पंप देखभालीचा खर्चही शून्य आहे. 25 वर्षापर्यंत या प्लेटला काहीही होत नाही. सौर कृषी पंप Saur Krushi Pump Yojana सूर्यप्रकाशापासून विजेची निर्मिती करून चालतात त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलाही अतिरिक्त खर्च यासाठी करावा लागत नाही. आणि यामुळे दिवसा शेतीला वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतात जाण्याची आणि आपला जीव धोक्यात घालण्याची आवश्यकता राहत नाही.

पिकांना योग्य वेळी पाणी देण्यासाठी विद्युत पंपासाठी मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता असते. मात्र नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक बिघाड या कारणामुळे शेतकऱ्यांना विद्युत पंपासाठी विद्युत पुरवठा करण्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी विद्युत आणि डिझेल पंपामुळे येणाऱ्या अडचणी पासून आता सुटका होणार आहे. कारण आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता 24 तास शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज उपलब्ध होणार आहे. आणि कुठल्याही लोडशेडिंग चा सामना करावा लागणार नाही.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana मुख्य उद्देश म्हणजे शेती सिंचनासाठी सौर कृषी पंप विकत घेण्यासाठी 95% अनुदान शेतकऱ्यांना देऊन, त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा आहे. तसेच त्यांना शेतीसाठी दिवसा विज पुरवठा उपलब्ध करून देणे हाही या योजनेचा उद्देश आहे.

ठळक मुद्दे :

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना 2024 म्हणजे काय?

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची थोडक्यात माहिती

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे उद्दिष्ट

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची वैशिष्ट्ये

मुख्यमंत्री कृषि सोलार पंप योजनेचे लाभार्थी

मुख्यमंत्री सोलर पंप योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

मुख्यमंत्री सोलर पंप योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे फायदे

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठीची पात्रता

मुख्यमंत्री सोलार पंप योजनेचे नियम व अटी

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत देयकाची रक्कम भरण्याची प्रक्रिया

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पुरवठाधाराचे यादी कशी बघावी

FAQ

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची थोडक्यात माहिती

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana in short

योजनेचे नावमुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
लाभ कायसौर कृषी पंप खरेदीसाठी 95 टक्के अनुदान
लाभार्थीराज्यातील शेतकरी
उद्देशशेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देणे
अर्ज कसा करावाऑनलाईन
अधिकृत वेबसाइटhttps://www.mahadiscom.in/solar
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे उद्दिष्ट

Purpose of Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप खरेदीसाठी 95 टक्के अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांची विद्युत आणि डिझेल पंपापासून मुक्तता.

शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा विज उपलब्ध.

राज्यातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे.

आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देऊन त्यांचा आर्थिक विकास करणे.

शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.

शेतीला पाणी देण्यासाठी रात्री शेतात जाण्यापासून शेतकऱ्यांची सुटका करणे.

पंपाच्या माध्यमातून होणारे वायू प्रदूषण थांबवणे.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची वैशिष्ट्ये

Features of Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप Saur Krushi Pump Yojana खरेदी करण्यासाठी 95 टक्के अनुदान देणे या योजनेचा उद्देश असून मुख्यमंत्री सोलर पंप योजना 2024 Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024 ही एक महत्त्वाची योजना ठरत आहे.

या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरण कंपनीवर टाकण्यात आली आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना फायद्याची ठरत आहे.

सौर कृषी पंप योजना अटल सौर कृषी पंप योजनेच्या नावाने देखील  ओळखली जाते.

एक लाख कृषी पंप वितरित करण्याचे महाराष्ट्र सरकारचे लक्ष.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत एक लाख शेतकऱ्यांच्या शेतात तीन टप्प्यांमध्ये सौर कृषी पंप Saur Krushi Pump Yojana बसवण्याचे राज्य सरकारचे लक्ष आहे.

शेतकऱ्याकडून कृषी पंपाची मागणी वाढल्यास या कृषी पंपाच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 25 हजार सौर कृषी पंप, दुसऱ्या टप्प्यात 50 हजार, आणि तिसऱ्या टप्प्यात 25 हजार सौर कृषी पंप बसवण्याचे सरकारने निश्चित केले आहे.

वितरणाचे तीन टप्पे

पहिला टप्पा- 25000 सौर कृषी पंप बसवणे

दुसरा टप्पा- 50000 सौर कृषी पंप बसवणे

तिसरा टप्पा- 25000 सौर कृषी पंप बसवणे

मुख्यमंत्री कृषि सोलार पंप योजनेचे लाभार्थी

शेतातील सिंचनासाठी विद्युत पंप वापरणारे शेतकरी.

महाराष्ट्रातील शेतात डिझेल पंप वापरणारे शेतकरी.

ज्या शेतात विजेची जोडणी झालेली नाही असे शेतकरी.

आदिवासी, दुर्गम, अतिदुर्गम या भागातील शेतकरी.

सिंचन योजनेअंतर्गत लाभार्थी असलेले शेतकरी.

धडक सिंचन योजने अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.

विद्युतीकरणासाठी पैसे भरून प्रलंबित असलेले शेतकरी.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे आहेत व तसेच शेताच्या शेजारी नदी, विहीर, बोरवेल आहे असे शेतकरी.

शेतकऱ्याने यापूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या कुठल्याही कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

ज्या शेतकऱ्याच्या गावातील वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्यापही विद्युतीकरण झालेले नाही असे शेतकरी.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विद्युत पंप तसेच डिझेल पंप बसविण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत असे शेतकरी.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

मुख्यमंत्री सोलर पंप योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

लाभार्थी शेतकऱ्याला त्याच्या शेतात सर कृषी पंप बसविण्यासाठी सौर कृषी पंपाच्या किमतीच्या 95 टक्के अनुदान मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री सोलार पंप Mukhyamantri Saur Krushi Pump योजनेअंतर्गत लाभार्थ्याला भरावयाची रक्कम मुख्यमंत्री सोलार पंप योजनेअंतर्गत लाभार्थ्याला सौर कृषी पंप किमतीच्या 10 टक्के रक्कम भरावी लागेल.

तसेच अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना किमतीच्या पाच टक्के रक्कम या योजनेअंतर्गत भरावी लागेल.

किती मिळते अनुदान95 टक्के
सामान्य वर्गातील लाभार्थीला किती भरावी लागते रक्कम10 टक्के
अनुसूचित जाती/जमातीतील लाभार्थीला किती भरावी लागते रक्कम5 टक्के

लाभार्थ्याला किती भरावी लागते रक्कम

वर्गवारीलाभार्थी हिस्सा3 HP सौर पंप5 HP सौर पंप7.5 HP सौर पंप
सामान्य वर्ग10 %16 हजार 56024 हजार 71033 हजार 455
अनुसूचित जाती5%8 हजार 28012 हजार 35516 हजार 728
अनुसूचित जमाती5%8 हजार 28212 हजार 35516 हजार 728

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे फायदे

Benefits of Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्याचा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसवण्यासाठी 95 टक्के अनुदान मिळणार आहे.

या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना विद्युत पंपाच्या बिलापासून आणि डिझेल पासून मुक्तता मिळणार आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढवणार आहे.

राज्यातील एक लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे अनुदान वाटप करण्यात येणार आहे तसेच वाढत्या मागणीचा विचार करून या संख्येत वाढ होईल.

या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.

सौर कृषी पंप योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास होईल.

या योजनेमुळे शेतकरी आत्मनिर्भर बनतील.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना सौर कृषी पंप Saur Krushi Pump घेण्यासाठी कोणावरही अवलंबून राहायची आवश्यकता भासणार नाही किंवा कोणाकडून पैसे उधार घेण्याचे गरज नाही.

या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे भविष्य उत्तम होणार आहे.

सौर कृषी पंप योजनेमुळे Mukhyamantri Saur Krushi Pump राज्यातील शेतकरी हे शेती करण्यासाठी उत्साहित राहतील

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमुळे Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana शेतामध्ये जी वीज  लागणार आहे ते कमी होईल म्हणून विजेची बचत होईलच तसेच डिझेलची देखील बचत होईल.

शेताला पाणी देण्यासाठी सौर कृषी पंपाच्या वापरामुळे शेतकरी स्वावलंबी बनतील.

5 एकर पेक्षा जास्त शेतकऱ्यांकडे शेत जमीन आहे अशा शेतकऱ्यांच्या पिकासाठी 3 HP सौर कृषी पंप उपलब्ध करून दिला जाणारा आहे, तसेच जर यापेक्षा जास्त शेतजमीन असेल तर त्या शेतकऱ्यांना 5 HP सौर कृषी पंप उपलब्ध करून दिला जाईल.

शेतात असणारे जुने डिझेल पंप बदलून नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येणार असल्यामुळे वायुप्रदूषण कमी होईल.

सौर कृषी पंपा सोबतच दोन एलईडी डीसी बल्ब, एक डीसी पंखा, आणि एक मोबाईल चार्जिंग सॉकेट लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

सौर कृषी पंप मुळे शेतकऱ्यांना आता दिवसा शेती सिंचन करणे सोपे होणार आहे.

या योजनेमुळे घरगुती वीज औद्योगिक वीज ग्राहकांवरील क्रॉस सबसिडी चा बोजा कमी होणार आहे.

सौर कृषी पंप योजनेमुळे Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024 शेतकऱ्यांचे वीज लोडशेडिंग पासून सुटका होणार आहे.

इतर योजना :

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना संपूर्ण माहिती साठी इथे क्लिक करा.

पीक विमा योजनेच्या संपूर्ण माहितीसाठी इथे क्लिक करा.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठीची पात्रता

Eligibility of Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा.

मुख्यमंत्री सोलार पंप योजनेचे नियम व अटी

Terms and conditions of Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा 2024 Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024 लाभ हा फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.

जे शेतकरी महाराष्ट्राच्या बाहेरील असतील त्यांना या योजनेचा लाभ होणार नाही.

एका शेतकऱ्याला एकदाच सौर कृषी पंपाचा लाभ मिळेल.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात आधीपासून वीज जोडणी केली आहे व ते विद्युत कृषी पंपाचा वापर करत आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळेल.

या योजनेतून कृषी पंप बसविल्यानंतर त्याची सुरक्षितता घेणे हे त्या लाभार्थीचे काम असेल, त्यासाठी शासनाकडून कुठल्याही प्रकारचा देखभाल खर्च मिळणार नाही.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतात विहीर, नदी, कालवा, शेततळे, बोरवेल इत्यादी पैकी पाण्याचा स्त्रोत असणे आवश्यक आहे.

ज्या शेतकऱ्याने केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या सुरू असलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत सौर कृषी पंपाचा लाभ घेतला असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही.

जर सौर कृषी पंप योजनेचा लाभ एखादा शेतकऱ्याला मिळवायचा आहे त्यासाठी त्यांनी अर्ज केलेला असेल आणि त्याच्या जमिनीत हिस्सेदार असतील तर त्या शेतकऱ्यांना हिस्सेदाराचे देखील ना हरकत प्रमाणपत्र या अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी शासनाकडून 95 टक्के अनुदान राशी मिळणार आहे तर राहिलेली रक्कम ही सर्वसाधारण लाभार्थ्याकडून दहा टक्के तर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून पाच टक्के घेतली जाईल.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कुठल्याही प्रकारच्या पाण्याचा स्त्रोत नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

भूजल अहवालानुसार शोषित, अतीशोषित गावातील विहीर व बोअरवेल मध्ये नवीन सौर पंप दिल जाणार नाही. मात्र ज्या गावात पाणलोट क्षेत्राची उपसा स्थिति 60 टक्के पेक्षा कमी आहे आशा गावातील विहीर व बोअरवेल मध्ये नवीन कृषि पंप दिल जातो.

खडक क्षेत्रात खोदलेल्या विंधन विहिरी ही शाश्वत सिंचनाचे साधन नसल्याने या विहीरीमद्धे सौर पंप दिला जाणार नाही, पण गाळाच्या क्षेत्रातिल बोअरवेल शाश्वत सिंचनाचे साधन असल्याने त्यांना सौर पंप दिल जातो.         

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Documents of Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

अर्जदाराचे आधार कार्ड

अर्जदाराचे रेशन कार्ड

रहिवाशी दाखला

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

पासपोर्ट साईज फोटो

बँक पासबुक

जमिनीचा 7/12 उतारा व 8अ

शेतजमिनीत सहहिस्सेदार असेल तर त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र

शपथपत्र

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana online apply

पारेषण विरहीत सौर कृषी पंप वीज जोडणीसाठी अर्जाची प्रक्रिया Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024

महावितरणची अधिकृत वेब पोर्टलवर https://www.mahadiscom.in/solar ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

सध्याच्या कृषिपंपासाठी पैशाचा भरणा करून प्रलंबित असलेल्या अर्जदाराने काही आवश्यक कागदपत्रे देणे गरजेचे आहे. यात अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी आदी माहिती द्यावी.

नवीन अर्जदाराने आवश्यक सर्व माहिती भरणे गरजेचे आहे.

ए-१ अर्जावर संपूर्ण अचूक माहिती भरावी. यासोबत कागदपत्रांची प्रति अपलोड करा.

७/१२ उतारा, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र,

अर्जदाराने ए-१ अर्जावरील घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन ए-१ अर्ज प्राप्त झाल्यानंतर १० दिवसांच्या आत सर्वेक्षण केल्यानंतर ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल. काही त्रूटी आढळून आल्यास अर्जदाराला याची माहिती दिली जाईल.

या प्रक्रियेची माहिती अर्जदाराला एसएमएसच्या माध्यमातून कळविली जाईल.

किंवा

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला https://www.mahadiscom.in/solar भेट द्या.

होम पेजवर ह्यनवीन ग्राहकह्ण वर क्लिक करा .

नंतर तुमच्यासाठी अर्ज सुरू होईल.

या फॉर्ममध्ये, तुम्हाला विचारलेले सर्व तपशील प्रवष्टि करावे लागतील.

तसेच, तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

त्यानंतर सबमिट करा ऑप्शनवर क्लिक करा.

अशा प्रकारे, तुम्हाला या योजनेसाठी लागू केले जाईल.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत देयकाची रक्कम भरण्याची प्रक्रिया

सर्वप्रथम तुम्हाला सर कृषी पंप योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

तिथे तुम्हाला अर्जाची स्थितीमध्ये देयकाची रक्कम भरणा करा यावर क्लिक करा.

त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक टाका.

नंतर खाली शोधा हे बटन आहे त्या बटनवर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर नवीन होम पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला भरणा करायचा आहे.

अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत देयकाचे रक्कम भरणा करता येईल.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पुरवठाधाराचे यादी कशी बघावी

अर्जदाराला सर्वप्रथम सर्व कृषी पंप योजनेच्या Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

वेबसाईटवर जाताच तुमच्या होम पेजवर अर्जाची स्थिती मध्ये पुरवठादार यादी मधील सूचीबद्ध केलेल्या पुरवठादाराची यादी या नावावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या क्षेत्राची माहिती निवडा

ही माहिती भरून भरून झाल्यावर शोधा या बटनवर क्लिक करा

त्यानंतर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील पुरवठादारांची यादी समोर मिळेल.

FAQ

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना कोणासाठी आहे?

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे?

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनासाठी विद्युत पंप वापरले जाणार आहेत. ज्या शेतात डिझेल पंप वापरले जाते. शेतात विजेची जोडणी झालेली नाही असे शेतकरी. आदिवासी, दुर्गम, अतिदुर्गम या भागातील शेतकरी. धडक सिंचन योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी. विद्युत जोडण्यासाठी महावितरणाकडे पैसे भरून नाही प्रलंबित असलेले शेतकरी. महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेत अंतर्गत लाभार्थी शेतकरी.

मुख्यमंत्री सोलार पंप योजनेचा उद्देश काय?

शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

मुख्यमंत्री सोलार पंप योजनेचा अर्ज कसा करावा?

मुख्यमंत्री सोलार कृषी पंप योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा याची अधिकृत वेबसाईट https://www.mahadiscom.in/solar ही आहे.