Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 Information In Marathi : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 मराठी माहिती
Mukhyamantri Teerth Darshan Yojana महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. आता ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थस्थळांची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवली जाणार आहे.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana या संदर्भातील शासन निर्णय 14 जुलै 2024 रोजी सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील एकूण 73 व महाराष्ट्रातील 66 अशी एकूण १३९ तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana In Marathi या योजनेमध्ये देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थस्थळांचा समावेश राज्य सरकारने केला आहे. जेणेकरून जेष्ठ नागरिकांना तीर्थस्थळावर जाऊन दर्शन घेता येईल तेही मोफत.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana In Marathi महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना देशभरातील महत्त्वाच्या तीर्थस्थान चे दर्शन घेता यावे यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील महत्त्वाच्या तीर्थस्थळांचे दर्शन घेता येईल.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana तीर्थयात्रांना जाऊन मनःशांती अध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मीयां मधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे मोफत दर्शन या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 मध्ये देशातील व राज्यातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून निश्चित केलेल्या तीर्थक्षेत्र पैकी एका यात्रेसाठी पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे. याबरोबरच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30 हजार रुपये इतकी ठरवण्यात आली आहे.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana यामध्ये भोजन, प्रवास, निवास इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी लाभार्थी व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी असावे. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याचे वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असावी.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 In Marathi मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या योजनेच्या माध्यमातून रेल्वे तथा बस प्रवासाचे नियोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या आणि रेल्वे प्रवासासाठी IRCTC समक्ष अधिकृत असलेल्या अधिकृत कंपनीची निवड करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रवाशांची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे केली जाईल. याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या आधारावर कोठा निश्चित करण्यात येईल. तसेच प्राप्त झालेल्या अर्जाच्या उपलब्धतेनुसार लॉटरी द्वारे प्रवाशांची निवड केली जाणार आहे.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 In Marathi या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी 75 वर्षावरील असल्यास त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. या योजनेच्या राज्यस्तरावरील सनियंत्रण वाढवा घेण्यासाठी राज्यस्तरावर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री त्यांच्या अध्यक्षतेखालील 17 सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana In Marathi या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यांची समिती कार्यरत असेल सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सदस्य सचिव असतील तर राज्यस्तरावर आयुक्त समाज कल्याण हे नोडल अधिकारी म्हणून काम करतील.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 च्या माध्यमातून देशातील हिंदू धर्मात चार धाम यात्रा, माता वैष्णवी यात्रा, अमरनाथ यात्रा इतर धर्मियांची ही मोठी तीर्थस्थळे आहेत. तिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 पुण्य कर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची इच्छा असते मात्र आर्थिक दृष्ट्या गरिबी असल्यामुळे अनेक कुटुंबातील नागरिकांना तीर्थस्थळी जाण्यास अडचणीचा सामना करावा लागतो किंवा कोणी सोबत नसल्यामुळे किंवा पुरेशी माहिती नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थ यात्रा करण्याची स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे त्यांना देशभरातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 मराठी माहिती
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 Information In Marathi
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची थोडक्यात माहिती
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 In Short
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची उद्दिष्टे
Mukhyamantri Teerth Darshan Yojana Purpose
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे लाभार्थी
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 Benefisior
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या तरतुदी
Mukhyamantri Teerth Darshan Yojana In Marathi
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत भारतातील तीर्थक्षेत्रे
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची पात्रता
Mukhyamantri Teerth Darshan Yojana Eligibility
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी कोण आहे अपात्र
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 In Marathi
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची कागदपत्रे
Mukhyamantri Teerth Darshan Yojana Documents
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची अर्ज प्रक्रिया
Mukhyamantri Teerth Darshan Yojana Online Apply
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची थोडक्यात माहिती
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 In Short
योजनेचे नाव | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
कधी सुरू झाली | जुलै 2024 |
लाभार्थी | राज्यातील 60 वर्षावरील नागरिक |
उद्दिष्ट | तीर्थस्थळांचे दर्शन |
लाभ | देशभरातील महत्त्वाच्या तीर्थस्थळांचे मोफत दर्शन |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची उद्दिष्टे
Mukhyamantri Teerth Darshan Yojana Purpose
- राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थ दर्शन करण्याचे स्वप्न पूर्ण होईल.
- ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन घेण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
- या योजनेचे अर्ज प्रक्रिया अत्यंत सोप्या पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे लाभार्थी
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 Benefisior
महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचे वय 60 वर्षे पूर्ण आहेत किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे सर्व नागरिक या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या तरतुदी
Mukhyamantri Teerth Darshan Yojana In Marathi
- 75 वर्षांवरील लाभार्थ्याला त्यांच्या सहाय्यकापैकी एकाला सोबत घेण्याची परवानगी असेल परंतु हे अर्जदाराला अर्जात नमूद करावे लागेल
- 75 वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय 60 वर्षापेक्षा कमी असले तरीही सहाय्यक प्रवासी अर्जदारासोबत प्रवास करण्यास पात्र असेल
- प्रवासात सहाय्यक प्रवासी घेण्याची सुविधा ही तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल
- जर दोन्ही पती-पत्नीचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांच्यासोबत एक सहाय्यक घेता येईल
- सहाय्यक प्रवासी चे वय 21 वर्ष ते 50 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे
- प्रवासी पती-पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवासाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024
महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे | जिल्हा |
सिद्धिविनायक मंदिर | मुंबई |
महालक्ष्मी मंदिर | मुंबई |
चैत्यभूमी दादर | मुंबई |
माउंट मेरी चर्च वांद्रे | मुंबई |
मुंबादेवी मंदिर | मुंबई |
वाळकेश्वर मंदिर मलबार हिल | मुंबई |
विश्व विपश्यना पॅगोडा गोराई | मुंबई |
चर्च ऑफ आवर लेडी ऑफ हेल्थ क्यॅवेल | मुंबई |
सेंट अँड्र्यू चर्च | मुंबई |
सेंट जॉन द ब्याप्टीस चर्च, सीपझ औद्योगिक क्षेत्र अंधेरी | मुंबई |
सेंट जॉन द बॅटरी चर्च मरोळ | मुंबई |
गोदीजी पार्श्वंत मंदिर | मुंबई |
नेसेट एलियाहू सिनेगॉग मस्जिद भंडार | मुंबई |
मॅगेन डेव्हिड सिनेमा ग भायखळा | मुंबई |
सेंट जॉन द ब्याप्टीस चर्च | ठाणे |
अग्यारी / अग्निमंदिर | ठाणे |
मयुरेश्वर मंदिर मोरगाव | पुणे |
चिंतामणी मंदिर थेऊर | पुणे |
गिरिजात्मज मंदिर लेण्याद्री | पुणे |
महागणपती मंदिर रांजणगाव | पुणे |
खंडोबा मंदिर जेजुरी | पुणे |
संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर आळंदी | पुणे |
भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर खेड | पुणे |
संत तुकाराम महाराज समाधी मंदिर देहू | पुणे |
संत चोखामेळा समाधी पंढरपूर | सोलापूर |
संत सावता माळी समाधी मंदिर अरण ता. माढा | सोलापूर |
विठोबा मंदिर पंढरपूर | सोलापूर |
शिखर शिंगणापूर | सातारा |
महालक्ष्मी मंदिर | कोल्हापूर |
ज्योतिबा मंदिर | कोल्हापूर |
जैन मंदिर कुंभोज | कोल्हापूर |
रेणुका देवी मंदिर माहूर | नांदेड |
गुरुगोविंद सिंग समाधी हुजूर साहेब नांदेड | नांदेड |
खंडोबा मंदिर मालेगाव | नांदेड |
श्री संत नामदेव महाराज देवस्थान उब्रज तालुका कंधार | नांदेड |
तुळजाभवानी मंदिर तुळजापूर | धाराशिव |
संत एकनाथ समाधी पैठण | छत्रपती संभाजीनगर |
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरूळ | छत्रपती संभाजीनगर |
जैन स्मारके एलोरा लेणी | छत्रपती संभाजीनगर |
विघ्नेश्वर मंदिर ओझर | नाशिक |
संत निवृत्तीनाथ समाधी त्रंबकेश्वर जवळ | नाशिक |
त्र्यंबकेश्वर शिवमंदिर त्रंबकेश्वर | नाशिक |
मुक्तिधाम | नाशिक |
सप्तशृंगी मंदिर वनी | नाशिक |
काळाराम मंदिर | नाशिक |
जैन मंदिरे मांगी तुंगी | नाशिक |
गजपंथ | नाशिक |
संत साईबाबा मंदिर शिर्डी | अहमदनगर |
सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक | अहमदनगर |
शनी मंदिर शनिशिंगणापूर | अहमदनगर |
श्रीक्षेत्र भगवानगड पाथर्डी | अहमदनगर |
बल्लाळेश्वर मंदिर पाली | रायगड |
संत गजानन महाराज मंदिर शेगाव | बुलढाणा |
एकविरा देवी कारला | पुणे |
श्री दत्त मंदिर औदुंबर | सांगली |
केदारेश्वर मंदिर | बीड |
वैजनाथ मंदिर परळी | बीड |
पावस | रत्नागिरी |
गणपतीपुळे | रत्नागिरी |
मारलेश्वर मंदिर | रत्नागिरी |
महाकाली देवी | चंद्रपूर |
श्री काळेश्वरी उर्फ काळुबाई मंदिर | सातारा |
अष्टदशभूज रामटेक | नागपूर |
दीक्षाभूमी | नागपूर |
चिंतामणी कळंब | यवतमाळ |
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत भारतातील तीर्थक्षेत्रे
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024
मंदिराचे नाव | स्थान |
वैष्णोदेवी मंदिर कटरा | जम्मू आणि काश्मीर |
अमरनाथ गुहा मंदिर | जम्मू आणि काश्मीर |
सुवर्ण मंदिर अमृतसर | पंजाब |
अक्षरधाम मंदिर दिल्ली | दिल्ली |
श्री दिगंबर जैनलाल मंदिर दिल्ली | दिल्ली |
श्री लक्ष्मी नारायण मंदिर | दिल्ली |
बद्रीनाथ मंदिर | चमोली उत्तर उत्तराखंड |
गंगोत्री मंदिर उत्तरकाशी | उत्तराखंड |
केदारनाथ मंदिर रुद्रप्रयाग | उत्तराखंड |
नीलकंठ महादेव मंदिर ऋषिकेश | उत्तराखंड |
यमुनोत्री मंदिर उत्तरकाशी | उत्तराखंड |
वैद्यनाथ धाम देवघर | झारखंड |
काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी | उत्तर प्रदेश |
इस्कॉन मंदिर वृंदावन | उत्तर प्रदेश |
श्रीराम मंदिर अयोध्या | उत्तर प्रदेश |
सूर्य मंदिर कोणार्क | ओरिसा |
श्री जगन्नाथ मंदिर पुरी | ओरिसा |
लिंगराज मंदिर भुवनेश्वर | ओरिसा |
मुक्तेश्वर मंदिर भुवनेश्वर | ओरिसा |
कामाख्या देवी मंदिर गुवाहाटी | आसाम |
महाबोधी मंदिर गया | बिहार |
रणकपुर मंदिर पाली | राजस्थान |
अजमेर दर्गा | राजस्थान |
राजस्थान सोमनाथ मंदिर वेरावल | गुजरात |
द्वारकाधीश मंदिर द्वारका | गुजरात |
नागेश्वर मंदिर द्वारका | गुजरात |
सांची तूप सांची | मध्य प्रदेश |
खजुराहो मंदिर खजुराहो | मध्य प्रदेश |
महाकाली मंदिर उज्जैन | मध्य प्रदेश |
ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर खंडोबा आणि ब्रह्मपुरी | मध्य प्रदेश |
श्री रंगनाथ स्वामी मंदिर श्रीरंगम | कर्नाटक |
गोमटेश्वर मंदिर श्रवणबेळगोळ | कर्नाटक |
विरुपाक्ष मंदिर हम्पी | कर्नाटक |
चेन्नई केशव मंदिर बेलूर | कर्नाटक |
अन्नपूर्णेश्वरी मंदिर होरानाडू | कर्नाटक |
महाबळेश्वर मंदिर गोकर्ण | कर्नाटक |
भूतनाथ मंदिर बदामी | कर्नाटक |
मुर्डेश्वर मंदिर मुर्डेश्वर | कर्नाटक |
आय हॉल दुर्गा मंदिर आय होल | कर्नाटक |
श्रीकृष्ण मंदिर उडुपी | कर्नाटक |
वीर नारायण मंदिर बेलावडी | कर्नाटक |
तिरुपती बालाजी मंदिर तिरुमला | आंध्र प्रदेश |
मल्लिकार्जुन मंदिर श्रीशैल्यम | आंध्र प्रदेश |
बृहदिशवर मंदिर तंजावर | तमिळनाडू |
मीनाक्षी मंदिर मदुराई | तमिळनाडू |
रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम | तमिळनाडू |
कांचीपुरम मंदिर कांचीपुरम | तमिळनाडू |
रंगनाथ स्वामी मंदिर स्त्रीची | तमिळनाडू |
अरुणाचलेश्वर मंदिर तिरुवन्ना मलाई | तमिळनाडू |
कैलास नाथ मंदिर कांचीपुरम | तमिळनाडू |
एकंबलेश्वर मंदिर कांचीपुरम | तमिळनाडू |
सारंगपाणी मंदिर कुंभकर्ण | तमिळनाडू |
किनारा मंदिर महाबलीपुरम | तमिळनाडू |
मुरुगण मंदिर तिरूचेंदूर | तमिळनाडू |
श्री पद्मनाभस्वामी मंदिर तिरुवनंतपुरम | केरळ |
गुरुवायूर मंदिर गुरुवायूर | केरळ |
वडकनाथ मंदिर त्रिशूल | केरळ |
पार्थसारथी मंदिर अरण मुला | केरळ |
शबरीमाला मंदिर पथनामथीट्टा | केरळ |
अट्टूकल भगवती मंदिर तिरुवनंतपुरम | केरळ |
श्रीकृष्ण मंदिर गुरुवायूर | केरळ |
तिरूमिल्ली मंदिर वायनाड | केरळ |
वेकोम महादेव मंदिर वर्कला | केरळ |
तिरवल्ला मंदिर तिरुमल्ला | केरळ |
शिवगिरी मंदिर वर्कल्ला | केरळ |
श्री सम्मेद शिखरजी गिरीडीह | झारखंड |
शत्रुंजय हिल गुजरात गिरनार | गुजरात |
देवगड उत्तर प्रदेश पावापुरी | बिहार |
रणकपुर राजस्थान भीलवाडा टेम्पल | राजस्थान |
उदयगिरी | मध्य प्रदेश |
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024
महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट
महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
आता मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना
पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची पात्रता
Mukhyamantri Teerth Darshan Yojana Eligibility
- अर्जदार लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे
- अर्जदाराचे वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त नसावे
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी कोण आहे अपात्र
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 In Marathi
- जो लाभार्थी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी नाही असा नागरिक या योजनेचा अर्ज करण्यासाठी अपात्र आहे
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे असे नागरिक या योजनेसाठी अपात्र आहेत
- ज्यांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत असे नागरिक या योजनेसाठी अपात्र आहेत
- जे नागरिक सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत अशांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य माजी खासदार / आमदार विद्यमान आहेत अशांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या प्रवासासाठी लाभार्थी हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. त्यांना कोणत्याही संसर्गजन्य रोग नसावा जसे की टीबी, हृदयाशी संबंधित रोग, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी
- अर्जदाराला अर्ज सोबत सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून मागील 15 दिवसांचेच असावे
- ज्यांच्या कडे चारचाकी वाहन आहे असे नागरिक या योजनेचा अर्ज करण्यासाठी अपात्र आहेत
- जे अर्जदार मागील वर्षांमध्ये प्रवासासाठी लॉटरी मध्ये निवडले गेले होते परंतु त्यांचा प्रवास पूर्ण झालेला नाही असे देखील या योजनेचा अर्ज करण्यासाठी अपात्र आहेत.
- अर्जात भरलेली माहिती चुकीची आढळून आल्यास ते नागरिक या योजनेच्या लाभासाठी अपात्र असतील.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची कागदपत्रे
Mukhyamantri Teerth Darshan Yojana Documents
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- ऑनलाइन अर्ज
- जन्म प्रमाणपत्र
- रहिवाशी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर
- हमीपत्र
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची अर्ज प्रक्रिया
Mukhyamantri Teerth Darshan Yojana Online Apply
या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. या योजनेचा अर्ज पोर्टल/ मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्र द्वारे ऑनलाईन पद्धतीने करता येईल. ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांनी अर्ज करण्यासाठी सेतू सुविधा केंद्रात जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA