Mukhyamantri Varkari Mahamandal वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ

Mukhyamantri Varkari Mahamandal मुख्यमंत्री वारकरी महामंडळ

Mukhyamantri Varkari Mahamandal पंढरीचा विठ्ठल राज्यातील वारकऱ्यांचे आराध्य दैवत आहे. पंढरपूरच्या विठुरायाची यात्रा व आषाढी एकादशी दोन दिवसावर आली आहे. त्यातच आता महाराष्ट्र सरकारने राज्यातील वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

Mukhyamantri Varkari Mahamandal

Mukhyamantri Varkari Mahamandal 2024आता महाराष्ट्रातील कीर्तनकार व वारकऱ्यांना चांगल्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय 14 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झाला आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूरला असणार आहे, जेणेकरून राज्यातील वारकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल.

Mukhyamantri Varkari Mahamandal वारी म्हणजे पवित्र स्थळांची नियतकालिन यात्रा आणि वारकरी म्हणजे नियतकालीन वारी करणारा वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय असून त्याने तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला आहे.

Mukhyamantri Varkari Mahamandal 2024 वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे श्रेय संत ज्ञानेश्वरांना दिले जाते संत बहिणाबाई यांनी (1628 ते 1700) संत कृपा झाली, इमारत फळा आली या आपल्या प्रसिद्ध अभंगात म्हटले आहे,

ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया

नामा तयाचा किंकर, तेणे रचिले ते आवार

जनार्दन एकनाथ खांब, दिधला भगवंत

तुका झालासे कळस, भजन करा सावकाश…

Mukhyamantri Varkari Mahamandal महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेली आहे. राज्यातील गावागावातून मोठ्या प्रमाणात भाविक-वारकरी दरवर्षी न चुकता वारीला पायी जातात. या वारीमध्ये प्रामुख्याने कष्टकरी, कामगार, शेतकरी यांचा मोठ्या प्रमाणे समावेश असतो.

मात्र काळानुरूप दिंडीची संख्या वाढल्याने वारीच्या व्यवस्थापनाचे नियोजन महत्त्वाचे आहे. यासाठी वारकरी महामंडळाची संकल्पना समोर आली आणि राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. याचा लाभ राज्यभरातील वारकऱ्यांना होणार आहे.

Mukhyamantri Varkari Mahamandal

Mukhyamantri Varkari Mahamandal 2024 महाराष्ट्रातील भाविक शेकडो वर्षापासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी दिंडीच्या माध्यमातून पवित्र वारी करतात. तीर्थक्षेत्राचा विकास, कीर्तनकार वारकऱ्यांना अन्न, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमा कवच, पायाभूत सुविधा इत्यादीं सोयी सुविधा पुरवण्यासाठी व कल्याणकारी योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mukhyamantri Varkari Mahamandal यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणीची प्रश्न सोडवणे, सर्व पालखी सोहळा मार्गाची सुरक्षा करणे, वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्यासाठी अनुदान देणे, पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्रिंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्ती ऋषी संत सावता माळी समाज मंदिर, अरण तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर व इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याबरोबरच चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व अन्य नद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी देखील उपाययोजना या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. Mukhyamantri Varkari Mahamandal 2024.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

स्त्री शक्ति योजना

फ्री लॅपटॉप योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

प्रधानमंत्री जनमन योजना

अस्मिता योजना

उद्योगिनी कर्ज योजना

किशोरी शक्ति योजना

रोजगार हमी योजना 

बाल संगोपन योजना

निर्धुर चूल योजना

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

श्रावण बाळ योजना

बालिका समृद्धी योजना

वन नेशन वन रेशन कार्ड योजना

ट्रॅक्टर अनुदान योजना

कुक्कुट पालन योजना

कुसुम सोलार पंप योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

अंत्योदय अन्न योजना

स्वामित्व योजना