new aadhaar app launch by UIDAI : कसं वापरायचं हे नवीन आधार ॲप
new aadhaar app launch by UIDAI सध्याच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र झाले आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आधार कार्ड असणे आवश्यक असते. लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाजवळ आता आधार कार्ड आहे.
new aadhaar app launch by UIDAI आता आधार कार्ड साठी UIDAI ने एक नवीन ॲप लॉन्च केले आहे. या ॲपमुळे आधार संबंधित सर्व कामे एकाच ठिकाणी करता येणार आहे. तुम्हाला डिजिटल आधार कार्ड तुमच्या फोनमध्ये ठेवता येणार आहे. यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड ची हार्ट कॉपी घेऊन जायची गरज नाही.
new aadhaar app launch जवळपास सर्वांच्या मोबाईल मध्ये आधार कार्ड चा फोटो असतो. पण जर तुम्ही आधार ॲप घेतले तर त्यामध्ये तुमचे आधार कार्ड शेअर देखील करता येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही ॲप मधून फेस स्कॅन करून व्हेरिफिकेशन करू शकतात.
UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार तुम्ही अँड्रॉइड आणि आयफोन या दोन्हीवर देखील हे aadhaar app ॲप इन्स्टॉल करू शकता. या नवीन आधार ॲपमुळे तुम्ही डिजिटल पद्धतीने हे आधार कार्ड शेअर करू शकता. यामध्ये क्यूआर कोड पडताळणी, फेस आयडी आणि फेस रिकग्निशन असे अनेक फीचर्स असणार आहेत. आता हे आधार ॲप कसं डाउनलोड करायचं आणि कसं वापरायचं हे आपण आज पाहणार आहोत.
कसं वापरणार आधार ॲप?
new aadhaar app
तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आधार ॲप कसं वापरायचं हे आज आपण पाहणार आहोत.
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर वरून आधार ॲप डाऊनलोड करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला सर्व अटी शर्ती स्वीकाराव्या लागतील.
त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या फोन नंबरची पडताळणी करून घ्यावी लागेल.
त्यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आधार ॲप सेटअप करता येणार आहे.
यानंतर तुम्हाला फेस ऑथेंटीकेशन करावे लागणार आहे.
आधार ॲप साठी तुम्हाला पिन सेट करावा लागेल.
त्यानंतर तुम्ही हे ॲप अगदी सहजरित्या वापरू शकता.
या नवीन ॲप मध्ये तुम्हाला QR कोडद्वारे डिजिटल आधार कार्ड शेअर करता येणार आहे. त्यासोबतच आयडी शेअर करताना कोणती माहिती समोरच्याबाबत शेअर करायची हे तुम्ही निवडू शकता. आधार कार्ड मधील सर्व डेटा शेअर करू शकता. या ॲपमध्ये बायोमेट्रिक माहिती लॉक आणि अनलॉक करण्याचे देखील फीचर आलेले आहे. त्यामुळे अगदी सहजरित्या तुम्ही हे ॲप हाताळू शकता.