Online Property Card 2025 Information Marathi : ऑनलाइन पद्धतीने प्रॉपर्टी कार्ड कसे काढावे?
Online Property Card 2025 In Marathi : आता महाराष्ट्रातील नागरिकांना मालमत्तेच्या कागदपत्रासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. कारण महाराष्ट्र सरकारने डिजिटल सही असलेले प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे.
Online Property Card त्यामुळे आता तुम्ही घरबसल्या मोबाईलच्या मदतीने प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करू शकता. मात्र ते कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत.
प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय
What Is Online Property Card
शेतीसाठी ज्याप्रमाणे सातबारा उतारा दिला जातो त्याच पद्धतीने बिगर शेती जमिनीसाठी (जागेसाठी) प्रॉपर्टी कार्ड देण्यात येत आहे. यामध्ये जागा, घर, बंगला, दुकान किंवा अन्य स्थावर मालमत्तेची माहिती दिलेली असते. या प्रॉपर्टी कार्डच्या आधारे तुम्हाला कर्ज घेणे ही सोपे जाते.
असे काढा प्रॉपर्टी कार्ड
Process Of Online Property Card
Property Card Online जर तुम्हालाही प्रॉपर्टी कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर डिजिटल सिग्नेचर प्रॉपर्टी कार्ड हा पर्याय तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल.
त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल त्याने तुम्ही लॉगिन करा. मोबाईल वर OTP आल्यावर व्हेरिफाय झाल्यानंतर विभाग, जिल्हा, भूमी, अभिलेख कार्यालय आणि गाव याची निवड करावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला सिटी सर्वे नंबर टाकावा लागेल. नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट शुल्क भरावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तिथून ऑनलाईन पद्धतीने प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करता येईल.
प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी किती खर्च येतो
Property Card Online
- महानगरपालिका क्षेत्रात 135 रुपये खर्च येतो.
- नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रामध्ये 90 रुपये खर्च येतो.
- ग्रामीण क्षेत्रांमध्ये 45 रुपये यासाठी खर्च येतो
असे वाचावे प्रॉपर्टी कार्ड
Property Card Online 2025 तुम्ही या योजनेअंतर्गत काढलेल्या प्रॉपर्टी कार्ड च्या वरती मालमत्ता पत्रक असा उल्लेख केला आहे. या कार्डमध्ये सर्वात प्रथम संबंधित गाव, जिल्हा, तालुका याची माहिती दिलेली असते. याबरोबरच नगर भूमापन क्रमांक त्या मालमत्तेचे क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये दिलेल्या असते संबंधित जागा प्लॉटचा मूळ मालक कोण आहे याची संपूर्ण माहिती दिलेली असते. याची नोंद हक्काचा मूळ धारक या विभागात असते.
Property Card Online 2025 याबरोबरच प्रॉपर्टी कार्डच्या खालील भागामध्ये एक महत्त्वाची माहिती सूचना दिलेली असते ज्यामध्ये सांगितलेले असते की, डिजिटल स्वरूपात प्रॉपर्टी कार्ड असल्यामुळे कोणती सही किंवा शिक्क्याची गरज लागणार नाही. त्यामुळे हे प्रॉपर्टी कार्ड अधिकृत असेल आणि ते कायदेशीर पद्धतीने शासकीय कामासाठी वापरता येईल.