Online Voter Id Card Information In Marathi : घरबसल्या बनवा मतदार कार्ड

Online Voter Id Card Information In Marathi : कसे काढाल घरबसल्या मतदार कार्ड

Online Voter Id Card Information In Marathi : नमस्कार वाचकहो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून घरबसल्या मतदार कार्ड ओळखपत्र Voter Id Card कसे काढायचे याची माहिती पाहणार आहोत.

आपण कोणतेही सरकारी काम करण्यासाठी सरकारी कार्यालयात जातो तेव्हा आपल्याला तासणतास रांगेत उभे राहावे लागते. त्यासाठी सर्वांच्या जीवाची फजिती होते. तर तुम्हाला आता एवढ्या रांगेत उभा राहायची गरज नाही. Voter Id Card

तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईल फोन मध्ये काही Voter Registration ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया करून सरकारी कामे करता येतील. त्याचबरोबर तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र देखील ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या काढू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल.

तुम्हाला Voter ID ओळखपत्र काढण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रक्रिया करावी लागेल. जर तुम्हाला मतदानाची ओळखपत्र काढायचे घरबसल्या काढायचे असेल तर कोणती प्रक्रिया आहे ती आज आपण या लेखाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहू.

वोटर हेल्पलाइन डाऊनलोड करा

Download Voter Helpline

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या प्ले स्टोअर मध्ये किंवा ॲपल स्टोअर मध्ये जावे लागेल.
  • तिथून तुम्हाला वोटर हेल्पलाइन Voter Helpline नावाचे ॲप इन्स्टॉल करावे लागेल.
  • ॲप इंस्टॉल झाल्यानंतर मतदार नोंदणीवर टॅप करा.
  • त्यानंतर तुम्हाला इंटरफेस दिसेल त्यातील नवीन मतदार नोंदणी यावर टॅप करा.
  • त्यानंतर फॉर्म 6 वर क्लिक करा तेथे तुम्हाला लेट्स स्टार्ट यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला नवा इंटरफेस दिसेल त्यावर तुम्हाला ‘होय मी प्रथमच अर्ज करीत आहे’ हा पर्याय निवडून नेक्स्ट यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमचं संपूर्ण तपशील अचूकपणे भरावा लागेल.
  • त्यानंतर तुमच्या दिलेल्या पर्यायात तुमचे राज्य, तुमच्या विधानसभा मतदारसंघ निवडावा लागेल.
  • त्यानंतर पर्यायांमध्ये आता तुमची जन्मतारीख प्रविष्ट करावी लागेल. त्यानंतर जन्मतारखेच्या नोंदणीसाठी डॉक्युमेंट या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार कार्ड चा फोटो तिथे अपलोड करावा लागेल.
  • फोटोचा आकार हा 200 केबी एवढा असावा त्यापेक्षा मोठा नसावा.
  • त्यानंतर नेक्स्ट यावर क्लिक करा. त्यानंतर आता तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करण्याचा ऑप्शन पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून फोटो अपलोड करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे जेंडर निवडावे लागेल. पुढे तुमचे नाव प्रविष्ट करा. तसेच मोबाईल नंबर आणि नंतर तुमचा ईमेल आयडी प्रविष्ट करावा लागेल.
  • त्यानंतर फॉलो करा
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर नवीन पर्याय दिसतील यावर तुम्हाला तुमचे नाते यावर क्लिक करावे लागेल उदाहरणार्थ तुम्ही तुमचे वडील हा पर्याय निवडू शकता.
  • त्यानंतर त्याखाली वडिलांचे नाव लिहा. त्यानंतर तुमचा संपूर्ण पत्ता भरून घ्या. त्यानंतर पुढे क्लिक करा.
  • तुमचे पोस्ट ऑफिस कोणते आहे ते लिहा.
  • त्यानंतर तुमचा पिन कोड टाका.
  • आता तुम्हाला ऍड्रेस प्रूफ निवडावा लागेल.
  • अशा रीतीने तुमची मतदान ओळखपत्र तयार होईल.

लक्षात ठेवा:- Voter Registration एक महत्त्वाची गोष्ट या दरम्यान लक्षात ठेवा की तुम्हाला मतदार ओळखपत्र काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही.