Paramparagat Krishi Vikas Yojana 2024 (PKVY) परंपरागत कृषी विकास योजना 2024 मराठी माहिती
Paramparagat Krishi Vikas Yojana 2024 परंपरागत कृषी विकास योजना 2024 अंतर्गत सरकारद्वारे सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. सेंद्रिय शेती केल्याने शेतातील मातीची गुणवत्ता वाढते आणि या शेतीत उगणारे पीक चांगले आणि आरोग्यदायी असते. रासायनिक आणि अन्य हानिकारक कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे परंपरागत कृषी विकास योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येत आहे. कशा पद्धतीने केली जाते या योजनेसाठी मदत? चला तर पाहू…
Krushi vikas yojana 2024 परंपरागत कृषी विकास योजना ही योजना राज्य सरकारने 2015-16 पासून सुरू केली आहे. तसेच या योजनेत केंद्र सरकारचा 60 टक्के तर राज्य सरकारचा 40 टक्के सहभाग आहे. रासायनिक आणि अन्य हानिकारक खतांचा वापर करून शेतकरी उत्पादन घेत असतात. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आणि त्या शेतातील उत्पादित झालेले पीक धान्य खाणारे लोकांचे आरोग्य ही बिघडते. ही एक गंभीर समस्या आहे. हे पाहता केंद्र सरकारने या परंपरागत कृषी विकास योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागतो अर्ज करण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया, पात्रता, आवश्यक असलेली कागदपत्रे, या योजनेचा मुख्य उद्देश, लाभ, वैशिष्ट्य, अधिकृत वेबसाईट या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत ही माहिती मिळवण्यासाठी संपूर्ण लेख वाचा…
परंपरागत कृषी विकास योजना म्हणजे काय?
What is Paramparagat Krishi Vikas Yojana
PKVY सध्याचा ग्राहक आरोग्याची काळजी घेण्यासाठी दर्जासंदर्भात कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाही. धान्य, फळे, भाजीपाला आदी खरेदी करण्यासाठी ग्राहक निरखून आणि खात्री करूनच खरेदी करतो. काही वर्षांपासून शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर आणि कीटकनाशकांचा वापर होत आहे. फळे, भाजीपाला ताजा दिसण्यासाठी अनेक प्रकाराच्या औषधाचा वापर केला जातो. मात्र त्याचे आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतात. याबद्दलचे दुष्परिणाम संशोधनातूनही समोर आलेले आहेत. सरकारच्या कृषि विभागानेही याचा अभ्यास केला असून ग्राहक आणि शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून परंपरागत कृषी विकास सेंद्रिय शेती योजना Paramparagat Krishi Vikas Yojana सुरू केली आहे.
आरोग्य, पर्यावरणासाठी सेंद्रीय शेती खूप महत्वाची बनली आहे. देशात याबद्दल जस जसी जागृती होत आहे, तसे ग्राहकही सेंद्रिय शेतातील उत्पादीत फळे, भाजीपाला, अन्नधान्यांची खरेदी करत आहे. त्यामुळे आता सेंद्रीय शेती करण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. सेंद्रिय शेतीत उत्पादनांना स्थानिक बाजारासह देशभरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अनेक बाजारपेठामध्ये स्वतत्र स्टॉलवर सेंद्रिय पद्धतीने विकवलेल्या भाज्या, फळे विक्री होत आहे. या माध्यमातून शेतकऱ्याचे उत्पन्नही वाढत आहे आणि नागरिकांचे आरोग्यावर दुष्परिणाम होत नाहीत.
परंपरागत कृषि विकास योजनेद्वारे शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. सेंद्रीय शेती विकसित करणे, सेंद्रीय संबंधी प्रशिक्षण, प्रात्याक्षिके, शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांना सेंद्रीय शेतीची माहिती देणे, शेतीमालाचे प्रमाणीकरण करत विक्री व व्यवस्थापन करणे आदी Paramparagat Krishi Vikas Yojana 2024 या योजनेचे उद्देश आहेत.
PKVY या योजनेद्वारे ५० एकर शेती असलेल्या ५० शेतकऱ्यांचा समूह / गट तयार केला जातो. त्यानंतर ५० शेतकऱ्यांच्या गटातून एकाची गटनेता म्हणून निवड केली जाते. निवडलेला शेतकरी इतर गटातील सदस्यांना प्रशिक्षण देऊ शकेल. शेतकऱ्यांच्या उत्पादन पिकांची माहिती शेतकरी, व्यापारी, किरकोळ विक्रेते व ग्राहकांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध केली जाते. सेंद्रीय उत्पादनांचे प्रमाणीकरण करून ग्राहकांमध्ये विश्वासार्हत निर्माण करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेत एकाच गावातील ५० शेतकऱ्यांची निवड झाल्यास ही योजना राबवणे सुलभ होते. सेंद्रिय शेतीतील उत्पादने, प्रमाणीकरण, व्यवस्थापन, विक्री आदीचे नियोजन अचूक पद्धतीने करता येते. यात सेंद्रीय व्यवस्थापनाला अधिक महत्व दिले आहे.
जास्तीत जास्त शेतीत जैविक खते, स्फुरदयुक्त सेंद्रीय खते, गांडूळ खत, उत्पादन युनिट आदींना एकत्रित करून सेंद्रीय शेतीखाली अधिक क्षेत्र आणण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. अनेकदा शेतकऱ्यांना मशागतीसाठी लागणारी अवजारे विकत घेणे शक्य होत नाही, त्यामुळे योजनेच्या अनुदानातून गटपातळीवर अवजारे भाड्याने घेण्याची तरतूद आहे.
सोलापूर जिल्ह्यात एका गटात ५० शेतकरी यानुसार २८ गटात एकूण १४०० लाभार्थी संख्या आहे. त्यामुळे १४०० एकर शेती सेंद्रिय शेती करण्यात येणार आहे. या योजनेचा कालावधी ३ वर्षांचा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी तालुका कृषि अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा यांच्याशी संपर्क साधू शकता. सेंद्रिय शेतीमुळे पर्यावरणाच्या सरक्षणासाठी, जमिनीची पोत चांगली ठेवण्यासाठी, आणि शेतीचे उत्पादन वाढ करण्यासाठी सेंद्रीय शेती फायद्याची ठरत आहे. नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी याद्वारे घेतली जाईल.
ठळक मुद्दे :
परंपरागत कृषी विकास योजना म्हणजे काय?
परंपरागत कृषी विकास योजनेची थोडक्यात माहिती
परंपरागत कृषी विकास योजना काय आहे
परंपरागत कृषी विकास योजनेचा उद्देश
परंपरागत कृषी विकास योजनेचे वैशिष्ट्ये
परंपरागत कृषी विकास योजनेची पात्रता
परंपरागत कृषी विकास योजनेच्या अटी
परंपरागत कृषी विकास योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
परंपरागत कृषी विकास योजनेची अधिकृत वेबसाईट
परंपरागत कृषी विकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
FAQ’S
परंपरागत कृषी विकास योजनेची थोडक्यात माहिती
Paramparagat Krishi Vikas Yojana PKVY in Short
योजनेचे नाव | परंपरागत कृषी विकास योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
कधी सुरू झाली | 28 मार्च 2016 |
लाभार्थी कोण | देशातील शेतकरी |
आर्थिक मदत | 31 हजार |
योजनेचा उद्देश काय | सेंद्रिय शेतीला प्रोत्साहित करणे |
अर्ज कसा करावा | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://pgsindia-ncof.gov.in.PKVY/Index.aspx |
परंपरागत कृषी विकास योजना कायआहे
Paramparagat Krishi Vikas Yojana परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन करण्यात येते. सरकार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारचे कीटकनाशक आणि सेंद्रिय खते खरीदी साठी प्रती हेक्टरी 31 हजार रुपयाची आर्थिक मदत करते. परंपरागत पद्धतीने शेती केल्याने शेतीचे नुकसान होत नाही. आणि त्यामध्ये उत्पादक होणारे पीकही चांगली येते. आणि ते खाल्ल्याने लोकांचे आरोग्य ही चांगले राहण्यास मदत होते. आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही.
परंपरागत कृषी विकास योजनेचा उद्देश
Purpose of Paramparagat Krishi Vikas Yojana
PKVY या योजनेचा मुख्य उद्देश रासायनिक आणि अन्य हानिकारक खतांचा वापर करून जे पिक घेतले जाते त्यावर नियंत्रण मिळून परंपारिक पद्धतीने सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आर्थिक मदत करणे. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आणि त्यांच्या आरोग्यावर कुठल्याही प्रकारचा वाईट परिणाम या पिकामुळे होत नाही.
परंपरागत कृषी विकास योजनेचे वैशिष्ट्ये
Features of Paramparagat Krishi Vikas Yojana
देशातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रोत्साहित करून आर्थिक मदत केली जात आहे.
जैविक शेती केल्याने शेतातील जमिनीची गुणवत्ता वाढते आणि त्या शेतात घेण्यात येणारे पीकही चांगले येते तसेच त्या शेतातील भाजीपाला ही आरोग्यासाठी चांगला असतो.
Paramparagat Krishi Vikas Yojana या योजनेअंतर्गत सरकार मूल्यवर्धन आणि वितरण तसेच क्लस्टर निर्मितीसाठी 8 हजार 800 रुपये देते तसेच क्षमता निर्माण करण्यासाठी 3000 रुपये प्रति हेक्टरी मदतही दिली जाते.
PKVY या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारचे कीटकनाशक सेंद्रिय खते खरेदी करण्यासाठी प्रती हेक्टरी 31 हजार रुपयाची मदत करण्यात येते.
या योजनेअंतर्गत केली जाणारी मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते
परंपरागत कृषी विकास योजनेची पात्रता
Eligibility of Paramparagat Krishi Vikas Yojana
अर्जदाराकडे रहिवासी प्रमाणपत्र असावे म्हणजेच भारतीय शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असावे.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी केवळ शेतकरीच पात्र मानले जातात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे शेती करण्यायोग्य जमीन असणे आवश्यक आहे.
परंपरागत कृषी विकास योजनेच्या अटी
Paramparagat Krishi Vikas Yojana Terms and Conditions
50 एकर क्षेत्राचा 50 शेतकऱ्यांचाएक गट तयार करावा.
या गटामद्धे जे शेतकरी भाग घेतील त्यांना 3 वर्षीय सेंद्रिय शेतीत भाग घेणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ हा एका शेतकऱ्यास 1 एक्कर ते 2.5 एक्कर शेती पर्यंतच घेता येतो.
शेतकऱ्याने कोणत्याही प्रकारचे रासायनिक किटकनाशके, रासायनिक खते वापरणार नाही याचे प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक आहे.
ज्या शेतकऱ्याने या पूर्वी सेंद्रिय शेती कार्यक्रमात भाग घेतलेला आहे. अशांना प्राधान्य दिले जाईल.
गटात समाविष्ट असणाऱ्या शेतकऱ्याकडे किमान 2 जनावरे असावेत.
शेतकऱ्याचे बँक खाते पासबूक असावे.
कोरडवाहू आणि बागायती असे दोन स्वतंत्र गट करावे, त्यात कोरडवाहू क्षेत्राला प्राधान्य द्यावे.
लाभार्थ्याने प्रत्येक वर्षी पाणी, माती तपासणे आवश्यक आहे.
अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यास प्राधान्य.
एक गट / समूह हा शक्यतो भौगोलिक व दळणवळणचे दृष्टीने सोयीचे असलेल्या क्षेत्रातील असावा.
आदिवासी तसेच डोंगराळ क्षेत्रात प्रादेशिक परिषदेच्या मदतीने गट तयार करावा.
सौर कृषी पंप च्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत घ्या कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन
परंपरागत कृषी विकास योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
Documents of Paramparagat Krishi Vikas Yojana
आधार कार्ड
राशन कार्ड
रासायनिक खते वापरणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र
जमिनीचा 7/12 उतारा
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
रहिवासी प्रमाणपत्र
बँक खाते पासबूक
जातीचे प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
पासपोर्ट साईज फोटो
परंपरागत कृषी विकास योजनेची अधिकृत वेबसाईट
Paramparagat Krishi Vikas Yojana Official Website
PKVY परंपरागत कृषी विकास योजने संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून मिळाली असेल. किंवा या योजने संबंधित अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी तुम्ही या योजनेच्या अधिकृत साईडला भेट देऊनही माहिती मिळू शकतात. त्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://pgsindia-ncof.gov.in.PKVY/Index.aspx ही आहे
परंपरागत कृषी विकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
Paramparagat Krishi Vikas Yojana (PKVY) Online Apply
सर्वात प्रथम परंपरागत कृषी विकास योजनेच्या Paramparagat Krishi Vikas Yojana अधिकृत वेबसाईटच्या होम पेज ला भेट द्या.
होम पेजवर गेल्यानंतर लॉगिन पर्याय निवडा.
त्यानंतर पुढील पेजवर जाल त्यावर विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही नोंदवा.
त्यानंतर तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड त्या मदतीने लॉगिन करा.
त्यानंतर या योजनेच्या अधिकृत साइटवर च्या होम पेजवर येऊन आपले नाव हा पर्याय निवडावा लागेल.
त्यानंतर पहिल्या पेज वर तुम्हाला या योजनेचा अर्ज मिळेल.
अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही अचूक भरावी.
संपूर्ण अर्ज भरल्यानंतर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात या वेबसाईटवर अपलोड करावीत.
अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकदा अर्ज तपासून घेऊन सबमिट या बटनावर क्लिक करावे.
अशा प्रकारच्या सरळ प्रक्रियेद्वारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकता.
FAQ’S
परंपरागत कृषी विकास योजनेचा PKVY उद्देश काय?
शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
परंपरागत कृषी विकास योजना PKVY कधी सुरू झाली?
परंपरागत कृषी विकास ही योजना 2016 मध्ये सुरू झाली असून या योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के तर राज्य सरकारचा 40 टक्के हिस्सा आहे.
परंपरागत कृषी विकास योजनेचा PKVY अर्ज कसा करावा?
परंपरागत कृषी विकास योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने
https://pgsindia-ncof.gov.in.PKVY/Index.aspx या अधिकृत वेबसाइटवर जाऊन करू शकता.