Parbhani Band : परभणीतील आंदोलनाला आलंय एक आक्रमक वळण
Parbhani Band : आज दिनांक 11 डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली आहे. परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची एका माथेफिरुने विटंबना केली. त्यानंतर परभणी शहरातील आंबेडकर अनुयायी संतप्त झाले आहेत.
Parbhani Band आज या आंदोलनाला आक्रमक वळण लागले आहे. काही आंदोलकांकडून दुकानांची जाळपोळ करण्यात आली. यामुळे सध्या परभणीत तणावपूर्ण वातावरण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची, घटनेची प्रत ठेवण्यात आली आहे. काल 10 डिसेंबर मंगळवार रोजी एका माथेफिरुने संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. Parbhani Band
Parbhani Ambedkar Statue News संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्याला उपस्थितांकडून जोरदार चोप देण्यात आला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. त्यामुळे आंबेडकर अनुयायी संतप्त झाले आहेत आणि त्यांनी आंबेडकर पुतळा परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलकांकडून काल रेल्वे रोको करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत परभणीत आंदोलन सुरू होते, तर आज परभणी बंदची हाक देण्यात आली.
Parbhani Band जिंतूर रोडवरील विसावा फाटा येथे आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोको केले आहे. आंदोलन अतिशय आक्रमक झाले असून त्यांनी दुकानांची जाळपोळ केली, तसेच रस्त्यावर असलेल्या गाड्यांची देखील जाळपोळ करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली आहे. Parbhani News
Parbhani Ambedkar Statue News काही आंदोलक महिलांनी पोलिसांवर दगडफेक केली पोलिसांनीही मग अश्रूधारांच्या नळकांड्या फोडत आक्रमक झालेल्या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसत आहे. सध्या पोलिसांकडून आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. सध्याची परिस्थिती सांगायचे झाले तर परभणीत दंगल नियंत्रण पथकही दाखल झाले आहेत. Parbhani News