PM Aasha Yojana 2024 Information In Marathi : पीएम आशा योजना 2024 संपूर्ण माहिती
PM Aasha Yojana नमस्कार वाचकहो, केंद्र सरकार नागरिकांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असते. त्यामुळे सतत नवनवीन योजना राबवत असते. आज आपण एका योजनेची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे पीएम आशा योजना.
नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेनुसार 2025 -26 च्या वर्षासाठी पीएम आशा योजनेअंतर्गत 35 हजार कोटी रुपयांचे बजेट मंजूर झाले आहे. भारतातील शेतकऱ्यांना व ग्राहकांना पीएम आशा योजनेअंतर्गत भरपूर फायदा होईल असे केंद्र सरकारने सांगितले.
PM Aasha Yojana 2024 आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण पीएम आशा योजना म्हणजे काय?, पीएम आशा योजनेचे काय आहेत फायदे, उद्दिष्टे? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहू.
पीएम आशा योजना म्हणजे काय
What Is PM Aasha Yojana
पीएम आशा योजनेचा पूर्ण अर्थ प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान असा आहे. पीएम आशा योजना ही केंद्र सरकारने सप्टेंबर 2018 रोजी सुरू केली आहे. या योजना शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. शेतकऱ्यांना चांगले दर मिळावे व ग्राहकांना महागाईमुळे अडचण येऊ नये यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे.
2025 -26 वर्षांमध्ये केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून तेलबियांच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या 25% उत्पादन हमीभावानुसार खरेदी करणार आहे. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव व अधिक प्रमाणातील बिया खरेदी करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कडधान्य पिकांमधील मसूर, उडीद व तुर 100 टक्के प्रमाणात केंद्र सरकार योजनेच्या मार्फत खरेदी करणार आहेत.
ठळक मुद्दे
पीएम आशा योजना 2024 संपूर्ण माहिती
PM Aasha Yojana 2024 Information In Marathi
पीएम आशा योजना म्हणजे काय
What Is PM Aasha Yojana
पीएम आशा योजनेची थोडक्यात माहिती
PM Aasha Yojana In Short
पीएम आशा योजनेचे घटक
PM Aasha Yojana 2024 Componants
पीएम आशा योजनेचे उद्दिष्ट
PM Aasha Yojana Purpose
पीएम आशा योजनेची वैशिष्ट्य
PM Aasha Yojana Features
पीएम आशा योजनेचे फायदे
PM Aasha Yojana Benefits
पीएम आशा योजनेची थोडक्यात माहिती
PM Aasha Yojana In Short
योजनेचे नाव | प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
कधी सुरू केली | सप्टेंबर 2018 |
लाभार्थी | भारतातील शेतकरी |
विभाग | कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय |
उद्दिष्ट | शेतकऱ्यांना योग्य दरात आर्थिक मदत करून उत्पन्न दुप्पट करणे |
बजेट | 2024 मध्ये 35 हजार कोटी रुपये |
पीएम आशा योजनेचे घटक
PM Aasha Yojana 2024 Componants
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विविध प्रकारे आर्थिक मदत करण्यासाठी पीएम आशा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तीन घटक समाविष्ट आहेत ते खालील प्रमाणे
प्राईज सपोर्ट स्कीम – अंतर्गत शेतकऱ्यांकडून फिजिकल मार्गातून डाळी, तेलबिया, खोबरे विकत घेता येतील. यामध्ये NAFED व FCI चॅनेल अंतर्गत शेतकऱ्यांकडून माल खरेदी करता येईल यादरम्यान होणारे नुकसान केंद्र सरकार भरेल.
प्राईज डेफिशियन्सी पेमेंट स्कीम – अंतर्गत शेतकऱ्यांना बाजारामध्ये पिकांची विक्री करत असताना जेवढा तोटा झाला आहे त्याची भरपाई MSP व मॉडेल प्राईस प्रमाणे केंद्र सरकार भरेल.
Pilot of Private Procurement and Stockist Scheme अंतर्गत केंद्र सरकार भारतातील मोठ्या खाजगी कंपन्यांना शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन करेल त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दलात हमीभाव प्राप्त होईल व त्यांची आर्थिक परिस्थिती बदलेल.
पीएम आशा योजनेचे उद्दिष्ट
PM Aasha Yojana Purpose
शेतकऱ्यांचा कृषी क्षेत्रातील सहभाग वाढावा शेतकऱ्यांचा जास्त फायदा करून देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.
या योजनेमुळे शेतकरी वर्गाला बाजारामध्ये पीक विक्रीसाठी प्रोत्साहन मिळेल.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला दाम दुप्पट करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
पीएम आशा योजनेची वैशिष्ट्य
PM Aasha Yojana Features
पीएम आशा योजनेअंतर्गत फिजिकल पद्धतीने शेतकऱ्यांकडून तेलबिया त्यासारख्या पिकांची खरेदी करण्यात येईल
शेतकऱ्यांकडून पिके खरेदी करण्यासाठी सिस्टीम योजनेमधून सुरू करण्यात आली आहे.
MSP मधील होणाऱ्यांना कमी त्यांच्यामधील गॅप भरण्यासाठी योजनेचा फायदा होणार आहे.
शेतकरी वर्गाला बाजारामध्ये अपयश आल्यास या योजनेच्या माध्यमातून आर्थिक हातभार लागेल.
या योजनेमुळे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे व त्यांची आर्थिक स्थिती बदलणार आहे.
पीएम आशा योजनेचे फायदे
PM Aasha Yojana Benefits
या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.
शेतकऱ्यांना जरी बाजारामध्ये हमीभाव असेल तरी केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून मदत करेल.
केंद्र सरकारने जास्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान योजना राबवली आहे.
या योजनेचा कालावधी 2025 -26 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने 35000 कोटी रुपयांच्या बजेट मंजूर केले आहे.
MSP अंतर्गत 22 पिकांची खरेदी केंद्र सरकार मार्फत करण्यात येते.
शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार खाजगी कंपनींना प्रोत्साहित करते.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना
वस्त्रोद्योग विणकर बक्षीस योजना
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना