PM Awas Yojana 2.0 Apply In Marathi : प्रधानमंत्री आवास योजना 2.0 साठी असा करा अर्ज

PM Awas Yojana 2.0 Apply In Marathi : कशी आहे या योजनेसाठीचे अर्ज प्रक्रिया

PM Awas Yojana 2.0 Apply In Marathi : नमस्कार वाचकहो, प्रधानमंत्री आवास योजना 2.0 नुकतीच सुरू झाली आहे. 9 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात ने शहरी आणि मध्यमवर्ग कुटुंबीयांसाठी PMAY या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत एक कोटी नवीन घर बनवले जाणार आहेत. यासाठी 2.5 लाख रुपयांची मदत या योजनेअंतर्गत केली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना योजनेचा हा दुसरा टप्पा आहे.

Awas Yojana 2.0 सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहे. यामध्येच एक योजना म्हणजेच पीएम आवास योजना होय. या योजनेच्या माध्यमातून सरकार गरीब आणि गरजवंतांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करते. केंद्र सरकारने या योजनेचा पुढील टप्पा म्हणजेच पीएम आवास योजना 2.0 सुरू केली आहे.

पीएम आवास योजना 2.0 म्हणजे काय

What Is PM Awas Yojana 2.0

PM Awas Yojana 2.0 In Marathi मोदी सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील गरीब नागरिकांना स्वतःचे घर मिळवून देणे हा आहे. PMAY या योजनेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे घर नाहीत अशांना घर घेण्यासाठी आर्थिक मदत सरकार या योजनेच्या माध्यमातून करते. पीएम आवास योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत देशातील जवळपास 2 कोटी घर बांधण्यात आले आहेत.

आता सरकारने पीएम आवास योजना 2.0 Awas Yojana 2.0 पण सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे मध्यमवर्ग आणि गरीब कुटुंबातील नागरिकांना घर घेण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेअंतर्गत शहरी भागात  किफायती दरामध्ये मध्यम कुटुंबातील नागरिक त्यांना घर देण्यात येणार आहे.

कोणाला मिळणार लाभ

PM Awas Yojana 2.0 Benefits

PM Awas Yojana 2.0 Apply In Marathi या योजनेच्या माध्यमातून झोपडी मध्ये राहणारे नागरिक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्यांक, विधवा, अपंग व्यक्ती आणि समाजातील अन्य वंचित वर्गातील नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त सफाई कर्मचारी, कारागीर, अंगणवाडी कार्यकर्ता त्यांनाही या योजनेअंतर्गत सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

काय लागतील कागदपत्रे

PM Awas Yojana 2.0 Documents

अर्जदाराचे आधार कार्ड
अर्जदार कुटुंबाचे आधार कार्ड
बँक खाते पासबुक
जातीचे प्रमाणपत्र
जमिनीचे कागदपत्रे
उत्पन्नाचे प्रमाणपत्र

कसा कराल अर्ज

PM Awas Yojana 2.0 Apply

PM Awas Yojana 2.0 Apply प्रधानमंत्री आवास योजना 2.0 या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम या योजनेच्या https://pmaymis.gov.in/ अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
त्यानंतर Apply for PMAY-U-2.0 यावर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरा.
त्यानंतर जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर, तुमचे नाव तेथे टाकावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल.
त्यानंतर तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता.