PM Awas Yojana 2024 Information In Marathi प्रधानमंत्री आवास योजना 2024 मराठी माहिती
PM Awas Yojana 2024 देशातील सर्व बेघर नागरिकांना केंद्र सरकार द्वारे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घर देण्यात येत आहे. PMAYv प्रधानमंत्री आवास अंतर्गत ज्या लोकांकडे आपले स्वतःचे हक्काचे घर नाही सरकार त्यांना आर्थिक मदत देऊन घर घेण्यास मदत करत आहे. 25 जून 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना चे उद्घाटन केले होते. 2023 पर्यंत PMAY प्रधानमंत्री आवास योजनेचे मुख्य लक्ष होते की, गरिबी रेषेखालील जीवन जगणाऱ्या परिवारांना आपले स्वतःचे घर देणे यामुळे त्यांना किरायाचे घर घेण्याची गरज पडणार नाही, हे लक्ष जवळपास पूर्ण करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयामध्ये अनेक जनकल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत, यात प्रधानमंत्री किसान योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री मानधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, जनसमर्थ योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि अटल पेन्शन योजना आदी योजना केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आल्या आहेत.
PM Awas Yojana 2024 प्रधानमंत्री आवास योजना यापूर्वी इंदिरा आवास योजना या नावाने ओळखली जात होती.
PM Awas Yojana 2024 पंतप्रधान आवास योजना ही 25 जून 2015 पासून सुरू करण्यात आली. ही योजना आधी 2022 पर्यंत होती परंतु नंतर तिचे मुदत वाढ करण्यात आली. पंतप्रधान आवास योजना ही दोन भागात विभागण्यात आलेली योजना आहे. PMAY ही योजना ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात विभागण्यात आली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. PM Awas Yojana 2024 Maharashtraया योजनेअंतर्गत आतापर्यंत गरीब कुटुंबांसाठी एकूण 3.21 कोटी घर बांधण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत अजून 3 कोटी घर बांधण्याचा निर्णय जून महिन्यात पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
PM Awas Yojana 2024 Maharashtra पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा?, पंतप्रधान आवास योजनेचे पात्रता काय? याची माहिती जाणून घेऊ.
ठळक मुद्दे
प्रधानमंत्री आवास योजना 2024 मराठी माहिती
PM Awas Yojana 2024 Information In Marathi
प्रधानमंत्री आवास योजनेची थोडक्यात माहिती
PM Awas Yojana 2024 In Short
प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रकार
PM Awas Yojana 2024
प्रधानमंत्री आवास योजनेची पात्रता
PM Awas Yojana 2024 Eligibility
प्रधानमंत्री आवास योजनेची आवश्यक कागदपत्रे
PM Awas Yojana 2024 Documents
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया
PM Awas Yojana 2024 Online Apply
प्रधानमंत्री आवास योजनेची थोडक्यात माहिती
PM Awas Yojana 2024 In Short
योजनेचे नाव | प्रधानमंत्री आवास योजना |
कधी सुरू झाली | 25 जून 2015 |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
योजनेचा उद्देश | देशातील गरिबांना हक्काचे घर देणार |
राज्याचे नाव | महाराष्ट्र |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
वेबसाइट | pmayg.nic.in |
प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रकार
PM Awas Yojana 2024
पंतप्रधान आवास योजना ग्रामीण
पंतप्रधान आवास योजना शहरी
प्रधानमंत्री आवास योजनेची पात्रता
PM Awas Yojana 2024 Eligibility
- अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा सरकारी नोकरीत कार्यरत नसावा.
- अर्जदार हा आयकर दाता नसावा.
- अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- अर्जदार च्या नावाने स्वतःचे घर नसावे.
- अर्जदाराने या योजनेचा आधी लाभ घेतलेला नसावा.
- ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्ना 6 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 18 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नसावा.
- इ डब्ल्यू एस कोट्यातील लोकांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेची आवश्यक कागदपत्रे
PM Awas Yojana 2024 Documents
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- बँक खाते पासबुक
- जातीचे प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- रहिवाशी प्रमाणपत्र
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया
PM Awas Yojana 2024 Online Apply
- पंतप्रधान आवास योजनेसाठी योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल.
- त्यामध्ये असलेल्या ऑनलाईन अर्ज च्या लिंक वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल.
- अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरा.
- त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा.
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही पंतप्रधान आवास योजनेचा ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA