PM Internship Scheme update in marathi : टॉप कंपन्यांमध्ये मिळणार संधी
PM Internship Scheme update in marathi : केंद्र सरकारने तरुणांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. त्या योजनेचे नाव आहे पीएम इंटर्नशिप योजना. या योजनेच्या पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये 1.53 लाख युवकांना इंटर्नशिपची ऑफर मिळाली आहे.
PM Internship Scheme update केंद्र सरकारने ही योजना देशातील तरुणांसाठी सुरू केलेली एक योजना आहे. युवकांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी ही एक मोठी संधी सरकारने दिली आहे.
PM Internship Scheme update गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू झालेल्या या योजनेद्वारे देशभरातील टॉप कंपन्यांमध्ये तरुणांना इंटर्नशिप ची मौल्यवान संधी मिळत आहे. या योजनेची माहिती स्वतः केंद्र सरकारने संसदेमध्ये दिली आहे.
PM Internship Scheme वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले योजनेच्या पहिल्या टप्प्यात कंपन्यांनी 1.27 लाखांपेक्षा अधिक इंटर्नशिप च्या संधी युवकांना दिल्या आहेत.
PM Internship Scheme या टप्प्यात 1.81 लाख युवकांना 6.21 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 60 हजार युवकांना 82 हजार पेक्षा जास्त ऑफर देण्यात आल्या.
Government Youth Scheme यामध्ये 28 हजार युवकांनी ऑफर स्वीकारल्या आहेत आणि सुमारे 8700 तरुणांनी इंटर्नशिप सुरू देखील केली आहे.
पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीसाठी मोठा प्रतिसाद
Government Youth Scheme : 9 जानेवारी 2025 रोजी सुरू झालेल्या दुसऱ्या फेरीत तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. पहिल्या फेरीत ज्या तरुणांना संधी मिळाली नाही अशांसाठी दुसरी फेरी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी देशातील 327 कंपन्यांनी 735 जिल्ह्यांमध्ये 1.18 लाख इंटर्नशिप ची संधी उपलब्ध करून दिली आहे. दु
दुसऱ्या फेरीमध्ये 2.14 लाख तरुणांनी 4.55 लाख अर्ज केले आहेत. 17 जुलै 2025 पर्यंत कंपन्यांनी 71000 हजार पेक्षा जास्त ऑफर दिल्या असून त्यातील 22500 पेक्षा जास्त ऑफर स्वीकारल्या गेल्या आहेत.
अजूनही काही ऑफर दिल्या जात आहेत. उमेदवार त्यांचा स्वीकार करत आहेत. असे वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी
2024-25 च्या केंद्रीय बजेटमध्ये जाहीर झालेल्या पीएम इंटर्नशिप योजनेचा उद्देश पुढील 5 वर्षात देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी युवकांना इंटर्नशिप देण्याचे आहे.
ही योजना 3 ऑक्टोंबर 2024 रोजी पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली. पहिल्या वर्षी 1.25 लाख इंटर्नशिप देण्याचे लक्ष ठेवले गेले.
ही योजना राज्य सरकार, उद्योग संघटना आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने राबवली जाते.
इंटर्नशिप मध्ये किती पैसे मिळतात
पीएम इंटर्नशिप योजना या अंतर्गत इंटर्नशिप दरम्यान युवकांना 5000 रुपये दरमहा मिळतो. याशिवाय जॉइनिंग च्या वेळी 6000 रुपये दिले जातात. या 5000 पैकी 4500 रुपये केंद्र सरकारकडून आणि 500 रुपये कंपन्यांकडून म्हणजेच त्यांच्या CSR फंडातून दिले जातात. जर एखाद्या चे काम खूप चांगले असेल तर कंपन्या आपला CSR फंड वाढवू शकतात.
काय आहे वयोमर्यादा
Internship Eligibility India
21 ते 24 वयोगटातील तरुण युवक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता काय
Internship Eligibility India
हायस्कूल किंवा हायर सेकंडरी पूर्ण असावे.
आयटीआय सर्टिफिकेट किंवा पॉलिटेक्निक डिप्लोमा असावा.
अर्जदार युवक पदवीधर असणे आवश्यक आहे.