PM Kaushal Vikas Yojana 2024 in Marathi : बेरोजगार तरुणांसाठी व्यवसायाची सुवर्णसंधी

Table of Contents

PM Kaushal Vikas Yojana 2024 information प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2024 मराठी माहिती

PM Kaushal Vikas Yojana 2024 नमस्कार वाचकहो, आम्ही आज या लेखातून तुम्हाला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची PMKVY संपूर्ण माहिती देणार आहोत. देशातील बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ होणार असून, त्यांना त्यांच्या रोजगार संधी मिळवून देण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत जे प्रशिक्षण दिले जाणार आहे ते विनामूल्य असेल. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांना या संधीचा लाभ घेता येईल. या योजनांतर्गत उत्पादन, सेवा, कृषी, बांधकाम, आरोग्य सेवा आणि अशा इतर अनेक क्षेत्रांसह विविध क्षेत्रांमध्ये कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम देते.

आजच्या लेखात आपण प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना म्हणजे काय?, या योजनेचे फायदे काय आहेत, या योजनेचे उद्दिष्टे काय आहेत, या योजनेसाठी पात्रता काय असेल, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा PMKVYअर्ज कसा करावा, त्यासाठीची अधिकृत वेबसाईट कोणती आहे, याबद्दलचे संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत.

PM Kaushal Vikas Yojana

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना म्हणजे काय?

What is PM Kaushal Vikas Yojana

PM Kaushal Vikas Yojana 2024 केंद्र सरकारने आर्थिक दृष्ट्या मजबूत नसलेल्या नागरिकांचा विचार करून आणि त्यांच्या भविष्यासाठी व त्यांच्या जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत Work From Home रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. आपण पाहतो की, दिवसेंदिवस भारत देशाची लोकसंख्या वाढत चालली आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने तरुणांसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना PMKVY सुरू केली आहे. प्रत्येक तरुणाला, विद्यार्थी वर्गाला असे वाटते की, आपले करिअर खूप चांगले असावे. त्यासाठी शिक्षण भरपूर घ्यावे लागते. त्या शिक्षणासाठी लागणारा खर्च हा कुटुंबिक परिस्थितीच्या आवाक्या बाहेरचा असतो. त्यामुळे मुले दहावी, बारावी पास झाल्यानंतर शिक्षण सोडून देतात. आणि मोल मजुरी करतात. त्यामुळे त्यांचे करिअर तिथेच थांबते. परंतु आता त्यांना त्यांचे स्वप्न मोडायची आवश्यकता नाही. कारण प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना द्वारे सरकार विद्यार्थ्यांना मोफत कोर्सेस करण्याची संधी देत आहे.

PM Kaushal Vikas Yojana 2024 केंद्र सरकारने जुलै 2015 रोजी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची सुरुवात केली. आतापर्यंत देशातील लाखो तरुणांना रोजगार मिळून त्यांचे भविष्य उज्वल झाले आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे देशातील बेरोजगार तरुणांना जास्तीत जास्त रोजगार प्राप्त करून देणे. PMKVY या योजनेअंतर्गत तुम्हाला देशातील कोणत्याही राज्यामध्ये नोकरी किंवा रोजगार अगदी सहजपणे मिळू शकतो. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणारा विद्यार्थी हा हजर असल्याचा पुरावा म्हणून त्याची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाते त्यानंतर त्याला त्याची संपूर्ण ट्रेनिंग अशाच पद्धतीने द्यावी लागेल त्याची नियमित बायोमेट्रिक हजेरी घेतली जाईल.

ठळक मुद्दे :

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची थोडक्यात माहिती

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे उद्दिष्ट

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची वैशिष्ट्ये

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतील अभ्यासक्रम

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची पात्रता

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गतचे प्रशिक्षण केंद्र कसे शोधावे.

FAQ  वारंवार विचारले जाणारे प्रश्न

PM Kaushal Vikas Yojana

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची थोडक्यात माहिती

PM Kaushal Vikas Yojana in Short

योजनेचे नावप्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
कधी सुरू झालीजुलै 2015
लाभार्थीदेशातील तरुण नागरिक
उद्दिष्टबेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त करून देणे
वयोमर्यादा15 ते 43 वर्ष
विभागकौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://www.pmkvyofficial.org/

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे उद्दिष्ट

Purpose of PM Kaushal Vikas Yojana

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा Pradhanmantri Kaushal Vikas Yojana मुख्य उद्देश म्हणजे तरुण रोजगारांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करणे, त्यांच्या गरजेनुसार त्यांना प्रशिक्षण देणे हे आहे.

कौशल्या विकास प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थ्याला 8 हजार रुपये प्रति उमेदवार असे आर्थिक बक्षीस प्रदान केले जाते.

या योजनेमुळे देशातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतात. तसेच त्यांना या ट्रेनिंग मध्ये पगार देखील मिळतो.  

Pradhanmantri Kaushal Vikas Yojana या योजने अंतर्गत देशातील संघटित तरुणांना त्यांच्या कौशल्यामध्ये सुधारणा करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.

तरुणांना उद्योगाशी संबंधित अर्थपूर्ण आणि कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या कौशल्य प्राप्तीसाठी प्रोत्साहन दिले जाईल.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची वैशिष्ट्ये

Features of PM Kaushal Vikas Yojana

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना Pradhanmantri Kaushal Vikas Yojana अंतर्गत कौशल्याची मागणी आणि स्किल गॅप स्टडीज या मूल्यांकनावर आधारित हे प्रशिक्षण दिले जाते

तरुणांना या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यापूर्वी NSDC द्वारे जारी केलेल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार तेथील प्रशिक्षण देणारे योग्य परिश्रम घेतील आणि त्यानंतर प्रशिक्षणाची गुणवत्ता निश्चित करतील.

PMKVY या योजनेच्या प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये सॉफ्ट स्किल ट्रेनिंग वैयक्तिक ग्रुप स्वच्छता तसेच चांगल्या कामाची नैतिकता यांचा समावेश असतो.

लाभार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रानुसार प्रशिक्षण आणि मूल्यांकन केल्यानंतर आर्थिक उत्पादन, बांधकाम, प्लंबिंग या क्षेत्रातील प्रशिक्षणांना अधिक प्रोत्साहन दिले जाईल.  

आर्थिक बक्षीस हे थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जाईल.  

युनिक आयडेंटिफिकेशन साठी लाभार्थीचा आधार क्रमांक वापरला जाईल.  

ज्या उमेदवाराची प्रशिक्षण पूर्ण झाले आहे आणि त्यांना रोजगारांच्या संधी शोधत आहेत अशांना सरकार मार्गदर्शन करते.

किसान क्रेडिट कार्ड योजना

परंपरागत कृषि विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतील PMKVY अभ्यासक्रम

अपंग व्यक्तींसाठी कौशल्य परिषद अभ्यासक्रम

वैद्यकीय आणि टुरिझम कोर्स

टेक्सटाईल्स कोर्स

टेलिकॉम कोर्स

सेक्युरिटी सर्विस कोर्स

रबर कोर्स

रिटेल कोर्स

पॉवर इंडस्ट्री कोर्स

प्लंबिंग कोर्स

मायनिंग कोर्स

फर्निचर आणि फिटिंग कोर्स

इलेक्ट्रॉनिक्स कोर्स आणि कॅपिटल कोर्स

सौंदर्य आणि वेलनेस पोशाख अभ्यासक्रम

मनोरंजन आणि मीडिया कोर्स

जीवन विज्ञान अभ्यासक्रम

लोह आणि स्टील कोर्स

आरोग्य सेवा अभ्यासक्रम

ग्रीन जॉब कोर्स

जेम्स अँड ज्वेलरी कोर्स

कृषी अभ्यासक्रम

मोटार वाहन अभ्यासक्रम

विमा बँकिंग आणि वित्त अभ्यासक्रम

बांधकाम अभ्यासक्रम

अन्नप्रक्रिया उद्योग अभ्यासक्रम

आदि अभ्यासक्रम आहेत या योजनेचे

PM Kaushal Vikas Yojana

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ

Benifits of PM Kaushal Vikas Yojana

या योजनेअंतर्गत युवकांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

देशातील तरुणांना रोजगारासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो.

सरकारी नोकरी प्रमाणे या योजनेतही अपघात विमा दिला जातो.

ऑनलाईन पद्धतीने रोजगार प्राप्त करण्यासाठी ऑनलाइन शिक्षणासाठी तरुण प्रोत्साहित होतात.

देशातील दहावी, बारावी शिक्षण घेऊन थांबलेल्या तरुणांना या योजनेचा लाभ होतो.

या योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत तरुणांना त्यांच्या योग्यतेनुसार रोजगार उपलब्ध करून दिला जातो.

देशातील बेरोजगार तरुणांना बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, अन्नप्रक्रिया, फर्निचर आणि फिटिंग, आदी 40 तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते.

पुढील पाच वर्षासाठी तरुणांना अध्यय उद्योजकता शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम केंद्र सरकार आयोजित करते.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची पात्रता

Eligibility of PM Kaushal Vikas Yojana

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 15 वर्षे ते 45 वर्षे दरम्यान असावे.

बेरोजगार असल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

लाभार्थी हा भारत देशातील मूळ रहिवासी असावा.

लाभार्थ्याला इंग्रजी व हिंदी या दोन भाषेचे ज्ञान असावे.

PMKVY या योजनेचा लाभ फक्त बेरोजगार तरुणांना होईल.

दहावी तसेच बारावीनंतर शिक्षण सोडलेल्या सर्व तरुणांना एकाच ठिकाणी कौशल्य दिले जाईल.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Documents of PM Kaushal Vikas Yojana

आधार कार्ड

मतदान कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

ईमेल आयडी

मोबाईल नंबर

बँक खाते पासबुक

शैक्षणिक प्रमाणपत्र

अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र

कम्प्युटर कोर्स केल्यास त्याचे प्रमाणपत्र

पासपोर्ट आकाराचा फोटो

नॅशनॅलिटी प्रमाणपत्र

PM Kaushal Vikas Yojana

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

PM Kaushal Vikas Yojana Online Apply

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा Pradhanmantri Kaushal Vikas Yojana ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास तुम्हाला खालील पद्धतीचा वापर करावा लागेल.

सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटला https://www.pmkvyofficial.org/ भेट द्यावी लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर एक होमपेज ओपन होईल वेबसाईटचे होम पेज ओपन झाल्यावर तिथे तुम्हाला स्किल इंडिया असा पर्याय दिसेल.

त्या पर्याय वर क्लिक करतात तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल.

तिथे तुम्हाला नोंदणी करण्याचे पर्याय दिसतील.

तेथे रजिस्टर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला योजनेचा फॉर्म दिसेल.

या फॉर्ममध्ये दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.

त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

नंतर तुमच्याकडे तुमचा युजरनेम व पासवर्ड तयार असेल तर तो टाकावा. जर तयार नसेल तर तो नवीन तयार करावा लागेल.

पुढे लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करावे लागेल.

अशाप्रकारे तुम्ही पी एम के व्ही वाय प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

हेल्पलाइन नंबर 8800055555

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गतचे प्रशिक्षण केंद्र कसे शोधावे.

यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या Pradhanmantri Kaushal Vikas Yojana अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

तिथे गेल्यावर तुमच्या समोर एक होम पेज ओपन होईल.

त्यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण केंद्र शोधा या बटन वर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला सेक्टरनुसार शोधा, नोकरीच्या भूमिकेनुसार शोधा किंवा स्थानानुसार शोधा यापैकी कोणताही एक पर्याय निवडून त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल.

त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा.

सबमिट बटन वर क्लिक करतात तुमच्यासमोर प्रशिक्षण केंद्राची संबंधित माहिती उघडेल.

FAQ  वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची PMKVY सुरुवात कधी झाली?

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 2015 रोजी जुलै 2015 मध्ये झाली.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा PMKVY अर्ज करण्यासाठी काय आहे वयोमर्यादा?

15 ते 45 वर्षे या वयोगटातील वयोगटातील नागरिक या योजनेचा अभ्यासक्रमसाठी पात्र असतील.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा PMKVY उद्देश काय?

देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे,

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना PMKVY म्हणजे काय?

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना तरुणांना त्यांच्या रोजगार क्षमता वाढवण्यासाठी उद्योग संबंधित प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी तयार सुरू केलेली योजना आहे,

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा PMKVY अर्ज कसा करावा?

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येतो ज्याची अधिकृत वेबसाईट https://www.pmkvyofficial.org/ ही आहे.

आमचा हा तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA