PM Kisan Yojana 2024 Update In Marathi : पीएम किसान योजनेची मोठी अपडेट
PM Kisan Yojana 2024 Update In Marathi : पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार किंवा नाही यासंदर्भात केंद्र सरकारने माहिती दिली आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेमध्ये आपल्या लिखित उत्तरात म्हटले की, वर्तमान स्थितीमध्ये असा कुठल्याही प्रकारच्या प्रस्ताव नाही. पीएम योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 2 कोटी पेक्षा अधिक SC, ST शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आहे. या योजनेला 100% आर्थिक मदत केंद्र सरकार द्वारे केली जाते. PM Kisan Yojana
PM Kisan Yojana केंद्र सरकारने संसदेला सांगितले की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसानच्या अंतर्गत प्रति लाभार्थी ला 6000 रुपये प्रति वर्ष रक्कम दिली जाते. या रकमेमध्ये वाढ करण्याचा सध्या तरी कुठलाही प्रस्ताव नाही. या योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक 4 महिन्यानंतर 2000 रुपये ची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. म्हणजेच वर्षाला त्यांना 6000 रुपये दिले जातात आणि या रकमेमध्ये सध्या तरी कुठलीही वाढ करण्याचा केंद्राकडे प्रस्ताव आलेला नाही. PM Kisan Yojana 2024 Update
कृषिमंत्र्यांनी संसदेत काय म्हटले
national will amount of pm kisan yojana increase or not government told the future plan in parliament
PM Kisan Yojana केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभा मध्ये आपल्या लिखित उत्तरात म्हटले की वर्तमान स्थितीमध्ये रक्कम वाढवण्याचा असा कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे नाही. त्यांना विचारण्यात आले होते की पीएम किसान योजनेअंतर्गत रक्कम वाढवण्याचा काही प्रस्ताव आहे का? त्यावर त्यांनी उत्तर दिले की यावर्षी 30 जानेवारीपर्यंत कृषी आणि महागाई संबंधित खर्च लक्षात घेता आर्थिक मदत म्हणून पात्र शेतकऱ्यांना विविध हप्त्यामध्ये 2.24 लाख कोटी रुपये पेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.
PM Kisan Yojana 2024 Update पीएम किसान ही एक केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. यासाठी लागणारे आर्थिक सहाय्य संपूर्ण केंद्र सरकार द्वारे केले जाते. राज्यसरकार आणि केंद्रशासित प्रदेशात अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांचीच या योजनेसाठी निवड केली जाते. तर कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण म्हणाले की आतापर्यंत 2 कोटी पेक्षा अधिक एससी, एसटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला आहे.
18.74 कोटी शेतकऱ्यावर कृषी कर्ज
national will amount of pm kisan yojana increase or not government told the future plan in parliament
देशातील 18.74 शेतकऱ्यावर कृषी कर्ज आहे. यात सर्वाधिक कर्ज तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक मधील शेतकऱ्यांवर आहे. 37 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील शेतकऱ्या जवळ बँक खाते आहे आणि त्यात त्यांनी कर्जही घेतलेली आहे.
PM Kisan Yojana 2024 या यादीमध्ये तामिळनाडूतील शेतकरी सर्वात पुढे असून 2.78 कोटी शेतकऱ्यांवर कर्ज आहे, तर उत्तर प्रदेश मधील 1.88 कोटी आणि कर्नाटक मधील 1.62 कोटी शेतकरी आहेत. ज्यांच्यावर कृषी कर्ज आहे आणि मोठ्या प्रमाणावर जल कृषी करण्याचा पण कुठलाही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारकडे नसल्याची माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री ठाकूर यांनी संसदेत दिली.
ऑक्टोंबर मध्ये जमा झाला होता 18 वा हप्ता
national will amount of pm kisan yojana increase or not government told the future plan in parliament
PM Kisan Yojana 2024 उल्लेखनीय बाब म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोंबर रोजी जमा झाला होता. डीबीटी च्या माध्यमातून थेट 9.4 कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये चा लाभ देण्यात आला होता. यावर्षी पीएम मोदी यांनी महाराष्ट्राच्या वासिम येथून योजनेचा 18वा हप्ता जारी केला होता.