PM Kisan Yojana 20th Installment Update : किसान योजनेचा 20 वा हप्ता 9 जुलैला होईल जमा?

PM Kisan Yojana 20th Installment Update 2025 in marathi : काय आहे नवीन अपडेट

PM Kisan Yojana 20th Installment Update in marathi : देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. जाणून घेऊ 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होईल.

PM Kisan Yojana 20th Installment Update : देशातील अनेक नागरिक शेती करतात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये जमा होतात. हा लाभ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दिला जातो.

PM Kisan Yojana 20th Installment Update : या योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून आता करोडो शेतकऱ्यांना 20 व्या हाप्त्याचे प्रतीक्षा लागली आहे.

9 जुलै नंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20 वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत एका वर्षात 2000 रुपयांची तीन हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.

PM Kisan Yojana चार महिन्याला हे 2000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. मागील हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना मिळाला होता. त्याप्रमाणे आता चार महिन्यानंतर दुसरा हप्ता येणार असून चार महिन्यांची प्रतीक्षा ही पूर्ण झाली आहे.

आता सरकार कधीही घोषणा करेल परंतु मिळालेल्या माहितीनुसार 9 जुलै ही तारीख आलेली आहे.

असे चेक करा स्टेटस

PM Kisan Yojana योजनेचा हप्ता जमा झाला की नाही हे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. तिथून तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस हा पर्याय मिळेल. तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर कापचा कोड भरून get data यावर क्लिक कराव लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस दिसेल.